Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 ऑगस्ट 2025
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 ऑगस्ट 2025

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 7, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    आज, दिनांक : 07 ऑगस्ट 2025; वार : गुरुवार

    भारतीय सौर : 16 श्रावण शके 1947; तिथि : त्रयोदशी 14:27; नक्षत्र : पूर्वाषाढा 14:00

    योग : विष्कंभ 06:41, प्रीति 29:38; करण : गरज 26:24

    सूर्य : कर्क; चंद्र : धनु 20:10; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:11

    पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन

    संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

    बृहस्पती पूजन

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस अपेक्षित लाभ मिळवून देणारा असेल. व्यवसायाच्या दृष्टीने एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार जातकांना एखादी चांगली संधी मिळेल. तथापि, कामावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून मुक्तता मिळेल. संततीच्या करिअरबद्दल एखाद्या चांगल्या समुपदेशकाचा सल्ला घ्या.

    वृषभ – आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. वरिष्ठांच्या मदतीने एखाद्या चांगल्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. मात्र काही शारीरिक समस्या चिंतेत टाकतील. भावनांमध्ये वाहून जात कोणत्याही कामाला होकार देऊ नये. सासरच्या मंडळींपैकी कोणाला पैसे उधार दिले असतील तर, ते परत मिळू शकतील.

    मिथुन – आजचा दिवस आदर आणि सन्मान वाढवणारा असेल. प्रतिष्ठेत वाढ झाल्याने खूप आनंदी असाल. मात्र आनंदाच्या भरात घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे समस्या निर्माण होतील. दुसऱ्याच्या बाबतीत अनावश्यक हस्तक्षेप करू नका. लहान प्रवासाचे योग आहेत, ज्यातून फायदा होईल.

    कर्क – कामाच्या प्रचंड दबावामुळे त्रासलेले असाल. तरी अशा प्रसंगी निर्णय घेण्याची क्षमता चांगली राहील. घाईघाईने कोणतेही काम केल्यास नुकसान होईल. कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन गुंतवणूक करणे टाळा. कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड करण्याचा आज सर्वतोपरी प्रयत्न कराल. नोकरीची चिंता असलेल्या लोकांना चांगली संधी मिळेल.

    सिंह – आजचा दिवस अनुकूल असणार आहे. कोणत्याही कामाबद्दल गोंधळ असेल तर तो दूर होईल. राजकारणात काम करणाऱ्या लोकांनी त्यांच्या विरोधकांपासून सावध राहावे, अन्यथा ते प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. कामाच्या ठिकाणी काही तांत्रिक समस्येमुळे चिंता वाढेल. मात्र प्रगतीचा मार्ग सोडून नका.

    कन्या – आजचा दिवस सुखसोयींमध्ये वाढ करणारा आहे. छंदांवर आणि सुखसोयींवर आज बऱ्यापैकी खर्च कराल. आतापर्यंत पैसे कुठे अडकले असतील तर, ते परत मिळण्याची शक्यता आहे. पालकांकडून भक्कम पाठिंबा मिळेल. सहकाऱ्याशी एखाद्या गोष्टीवरून भांडण होऊ शकते. भूतकाळात केलेल्या एखाद्या कामाचा चांगला मोबदला मिळेल.

    हेही वाचा – Nakshatra : श्रवण, धनिष्ठा आणि शततारका

    तुळ – आजचा दिवस जबाबदारीने काम करण्याचा असेल. कामाच्या ठिकाणी अनपेक्षितपणे एखाद्या नातेवाईकाचा पाठिंबा मिळेल. पैशाशी संबंधित व्यवहार करणाऱ्या जातकांना कामावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल. लांबच्या प्रवासाचा योग आहे. आज जर कोणाला पैसे उधार दिलेत तर ते परत मिळण्याची शक्यता खूप कमी असेल.

    वृश्चिक – आजचा दिवस सुखसोयींमध्ये वाढ करणारा आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत मजेत वेळ घालवाल. तुमच्या निर्णयांनी लोक आश्चर्यचकित होतील. पालकांच्या आशीर्वादाने प्रलंबित काम पूर्ण होईल. व्यवहाराशी संबंधित कोणतेही प्रकरण वेळेवर निकाली काढण्याचा प्रयत्न करा. निर्णयक्षमता चांगली होईल.

    धनु – आजचा दिवस अतिशय उत्तम जाणार आहे. जे काही काम हाती घ्याल त्यात चांगले यश मिळेल, मात्र आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. काही महत्त्वाच्या लोकांशी भेटीगाठी होतील. कामात कोणतेही धोकादायक निर्णय घेऊ नका. अत्यंत संयमा़ने सगळी कामे पूर्ण करा. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे.

    मकर – उत्पन्नात वाढ होणार आहे. दुसऱ्या चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. कौटुंबिक बाबींमुळे काही तणाव असेल तर, तोही दूर होईल. मिष्टान्नाचा योग आहे. इच्छित वस्तूंच्या खरेदीसाठी सहज खर्च करू शकाल. बजेट प्लॅनचे पालन करणे चांगले होईल, जेणेकरून खर्च नियंत्रणात राहतील.

    कुंभ – काही नवीन ओळखींमुळे फायदा होईल. काही समस्या असतील तर त्यावर उपाय मिळण्याची शक्यता आहे. कोणाशीही बोलताना खूप काळजी घ्या, अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्राधान्याने प्रयत्न कराल. मामाच्या बाजूने आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

    मीन – व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. महत्त्वाच्या कामाकडे पूर्ण लक्ष द्याल. मन एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ असेल तर संयम बाळगा. काही नवीन प्रयत्नांचे फळ नक्कीच मिळेल. संततीबद्दल काही काळजी वाटत असेल तर ती समस्या देखील दूर होईल. नवीन मालमत्ता खरेदीचा योग आहे, जी तुमच्यासाठी फलदायी ठरेल.

    हेही वाचा – Nakshatra : पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती


    दिनविशेष

    डॉ. आनंद दिनकर कर्वे

    टीम अवांतर

    भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ आणि ग्रीन ऑस्कर समजला जाणारा ॲश्डेन पुरस्कार 2002 आणि 2006 असा दोनवेळा मिळविणाऱ्या पुण्यातील ॲप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (ARTI) या संस्थेचे प्रवर्तक असणाऱ्या डॉ. आनंद कर्वे यांचा जन्म 7 ऑगस्ट 1936 रोजी पुण्यात झाला. वडील दिनकर धोंडो कर्वे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते, तर आई डॉ. इरावती कर्वे या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ होत्या. पुणे विद्यापीठातून वयाच्या विसाव्या वर्षी आनंद कर्वे यांनी बी.एस्सी. पदवी मिळविली. नंतर उच्च शिक्षणासाठी ते जर्मनीच्या ट्यूबिंगन विद्यापीठात गेले आणि 1960मध्ये त्यांनी वनस्पतिशास्त्रातील पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर चार वर्षे ते भारतामध्ये पंजाब विद्यापीठात व्याख्याते होते. 1964-66 या काळात ते शिवाजी विद्यापीठात वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यानंतर 1982 सालापर्यंत ते फलटण येथील निंबकर सीड्स संशोधन संस्थेचे संचालक होते. म्यानमार येथे युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन या संघटनेच्या वतीने भुईमूगतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम पहिले होते. करडई तेलबियावरील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या सेंटर फॉर ॲप्लिकेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रूरल डेव्हलपमेंट (केस्टफोर्ड) या प्रकल्पात 1988 मध्ये ते सहभागी झाले. 1992 मध्ये कर्वे हे त्या प्रकल्पाचे उपसंचालक आणि नंतर संचालक झाले. पारंपरिक जैवइंधन वापरून घरी स्वयंपाक कसा करता येईल, यावर त्यांनी संशोधन केले. त्यांनी विकसित केलेल्या संयंत्रामधून फक्त एक किलो जैवखाद्यापासून 500 ग्रॅम इंधन वायू मिळविता येत होता. इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी डॉ. कर्वे यांना ब्रिटनच्या राजवाड्यात या संयंत्राची स्थापना करण्यासाठी आमंत्रित केले होते. महाराष्ट्रात अशा 1 हजारपेक्षा अधिक संयंत्रांची उभारणी करण्यात आली आहे. या संयंत्रातून मिळणारा मिथेन वायू अन्न शिजविण्यासाठी तसेच  पेट्रोल आणि डीझेल इंजिने तसेच विद्युत् जनित्रे चालविण्यासाठी वापरता येतो. याच काळात जैवखाद्यापासून जैवइंधन आणि शेतीतील कचऱ्यापासून कांडी कोळसा तयार करण्याची पद्धत डॉ.‌ कर्वे यांनी विकसित केली. तंदूर, बार्बेक्यू किंवा घरगुती कोळशाच्या शेगडीत तसेच लोहारकामासाठी हा कोळसा वापरता येतो. हा कोळसा जळताना फारसा धूर येत नसल्याने वायुप्रदूषण होत नाही. डॉ. कर्वे यांनी आतापर्यंत पन्नासपेक्षा अधिक संशोधन प्रकल्प राबविले. त्यांनी सुमारे 125 संशोधनपर निबंध आणि 125 शास्त्रीय शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    By Team AvaantarMay 9, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 मे 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 19…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 मे 2026

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 292
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 611
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026
    Most Popular

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.