दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 29 जुलै 2025; वार : मंगळवार
भारतीय सौर : 07 श्रावण शके 1947; तिथि : पंचमी 24:45; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 19:26
योग : शिव 27:03; करण : बव 12:00
सूर्य : कर्क; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 19:15
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
नागपंचमी
मंगळागौरी पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – व्यावसायिक जीवनात भावनांचा खूप जास्त प्रभाव पडू देऊ नका. दिलेली कामगिरी पूर्ण समर्पणाने पार पाडण्याकडे लक्ष द्या. त्यासाठी आपल्या क्षमता समजून घ्या. कार्यालयीन कामामुळे दिवस व्यग्र राहील. पुरेसे पाणी पित रहा. यामुळे शरीर डिहायट्रेट होणार नाही.
वृषभ – आज संपूर्ण ब्रम्हांडाकडून उत्कटतेचा पाठपुरावा करण्याचा आणि तुमच्या कल्पनांना नवसंजीवनी देण्याचा सल्ला देत आहे. आर्थिक दृष्टिकोनातून चांगली संधी आज दार ठोठावू शकते. संयमाने काम करा, बाहेरचे जंक फूड खाणं टाळा.
मिथुन – आर्थिक स्थिती सकारात्मक राहील. मात्र पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. शरीर आणि मन यांच्यात समन्वय राहील, याची काळजी घ्या. स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि ध्यान करण्यासाठी वेळ काढा, यामुळे मानसिक शांतता लाभेल.
कर्क – गुंतवणुकीचा प्रश्न येईल, तेव्हा विचारपूर्वक जोखीम घेण्याची गरज आहे. जगाला तुमच्या सर्जनशील कल्पनांची गरज आहे. यशस्वी होण्यासाठी नवीन मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे. आर्थिक निर्णय हुशारीने घ्या, कारण त्यावरून कुटुंबात वाद होऊ शकतात.
सिंह – मेहनतीचे फळ मिळेल, समृद्धीच्या पाऊलखुणा दिसायला सुरुवात होईल. नातेसंबंधातील आपलेपणा जागृत करण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. वाईट स्वप्नांपासून आणि तुम्हाला मागे खेचणाऱ्या गोष्टींपासून मुक्त होण्याचा हा दिवस आहे.
कन्या – जोखीम उचलण्याआधी पूर्ण विचार करण्याची गरज आहे. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल. कुटुंबात होणारे मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा. नवीन नोकरी हवी असेल किंवा पदोन्नती हवी असेल तर आजचा दिवस त्यासाठी उत्तम आहे.
हेही वाचा – Yoga is lifestyle : प्राणायाम हाच योग विद्येचा आत्मा
तुळ – जोखीम घेण्यास घाबरू नका, कारण ती दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकते. पैशांच्या बाबतीत यश मिळेल. मात्र, आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, खर्च नियंत्रणाबाहेर जाऊ देऊ नका. मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यान करा.
वृश्चिक – स्वप्नपूर्तीच्या दिशेने जाण्यासाठी आणि उत्कट इच्छांचा पाठपुरावा करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. निरोगी राहण्यासाठी जंक फूडपासून दूर रहा. पैशांशी संबंधित निर्णय घेण्यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता.
धनु – काही लोकांना राजकीय लाभ मिळू शकतात. आयुष्यातील ताण कमी करा. त्यासाठी योग आणि ध्यानधारणा करा. लग्न होऊन बराच काळ झाला असला, तरी आज जोडीदारासमवेत वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. त्यासोबतच आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
मकर – नवीन मार्ग शोधण्याच्या दृष्टीने उत्तम दिवस आहे. किती प्रतिभावान आहात, हे जगाला दाखवायला अजिबात घाबरू नका. दिवस आनंद आणि समृद्धीने भरलेला असेल. जंक फूडला नाही म्हणा, पुरेसे पाणी प्या आणि स्वतःवर प्रेम करण्यावर लक्ष केंद्रित करा.
कुंभ – आर्थिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी जोडीदाराचा सल्ला घ्या. गर्दीतून बाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख तयार करायला घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
मीन – आज सकारात्मक विचारांनी भारलेले असाल. नवीन आव्हाने स्वीकारण्यास घाबरू नका. नैसर्गिकरित्या असणारा आत्मविश्वास आणि संवाद कौशल्ये आज उपयोगी पडतील. त्यामुळे नवीन लोकांशी संभाषण सुरू करण्यास पुढे व्हा.
हेही वाचा – Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
दिनविशेष
ख्यातकीर्त भावगीत गायक सुधीर फडके
टीम अवांतर
प्रसिद्ध मराठी भावगीतगायक तसेच चित्रपटक्षेत्रातील निर्माते, संगीतदिग्दर्शक आणि पार्श्वगायक सुधीर फडके यांचा जन्म 25 जुलै 1919 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र तथा सुधीर विनायकराव फडके होते. पण बाबूजी या नावाने ते अधिक परिचित होते. गायनाचार्य पंडित वामनराव पाध्ये आणि बाबूराव गोखले यांच्याकडे बाबूजींनी काही वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी 1936 मध्ये अधिक संगीतसाधनेसाठी मुंबईला प्रयाण केले. त्यांच्या गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम 1931 साली मिरजेत झाला. तर, 1937मध्ये मुंबईत आकाशवाणीवरील त्यांचा पहिला कार्यक्रम झाला. 1945 साली त्यांनी हिज मास्टर्स व्हाइस (एचएमव्ही, मुंबई) या ध्वनिमुद्रिका संस्थेशी करार करून अनेक गीतांना संगीत दिले आणि ती गायली. 1946 सालापासून बाबूजींनी एकंदर 84 मराठी व 22 हिंदी चित्रपटांतील तसेच इतर अशी 877 गीते संगीतबद्ध केली, तर 144 मराठी आणि 9 हिंदी चित्रपटांतील तसेच इतर अशी 511 गीते गायिली. जगाच्या पाठीवर, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला, प्रपंच, संथ वाहते कृष्णामाई, भाभी की चूडियाँ या चित्रपटांचे संगीतदिग्दर्शक आणि पार्श्वगायक म्हणून त्यांना पारितोषिके मिळाली. 1955 साली पुणे आकाशवाणीवर प्रसिद्ध झालेल्या आणि ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या गीतरामायणातील गीतांना बाबूजींनी उत्स्फूर्त चाली दिल्या आणि स्वत: ती गीते गायिली. 1958पासून गीतरामायणाचे शेकडो कार्यक्रम महाराष्ट्रासह भारतात आणि परदेशात झाले. बाबूजींचा विवाह 1949मध्ये प्रसिद्ध पार्श्वगायिका ललिता देऊळगावकर यांच्याशी झाला. त्यांचे पुत्र श्रीधर फडके हे आघाडीचे संगीतकार-गायक आहेत. बाबूजींना चित्रपट संगीताबद्दल फाळके पारितोषिक, तसेच सर्वोत्कृष्ट संगीतदिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य पारितोषिकेही मिळाली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निस्सीम भक्त असलेल्या बाबजींनी सावरकर दर्शन प्रतिष्ठानची निर्मिती केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील चित्रपट हा त्यांचा ध्यास होता. अनेक अडचणी आणि लोकप्रवादांवर मात करून अखेर 2002 साली त्यांनी वीर सावरकर चित्रपट पूर्ण केला. 29 जुलै 2002 रोजी बाबूजींचे मुंबई येथे निधन झाले.