प्राजक्ता अनंत काथे
(ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)
मेष राशी
या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेवाईक किंवा मित्रांनी उधार घेतलेले पैसे परत मिळतील. या आठवड्यात मनाप्रमाणे खर्च करू शकाल, पण खर्चाचे नियोजन करा. ज्येष्ठ्यांच्या आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना नवीन आव्हानात्मक जबाबदारीची कामे मिळण्याची शक्यता आहे. अमावस्येच्या काळात कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल. महिलांना भावंडसौख्य मिळेल. भाऊ, बहिणीबरोबर छान वेळ घालवू शकाल. विद्यार्थ्यांनी महत्त्वाकांक्षी रहावे, नव्या संधीचे सोने करू शकाल.
वृषभ राशी
या आठवड्यात कामाचे नियोजन करणे खूप आवश्यक आहे. नवीन जबाबदारी आत्मविश्वासाने पूर्ण करू शकाल, मात्र स्वतः लक्ष देण गरजेचे आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. चिडचिड होऊ शकते. तुमच्या कामात जोडीदाराची साथ मिळू शकते. अमावस्या काळात छोटे प्रवास होऊ शकतात. महिला आपल्या रोजच्या कामात रमतील. नवीन काम हाती घेऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सोशल मीडियापासून लांब राहा.
मिथुन राशी
या आठवड्यात पैशांची आवक चांगली राहील. प्रवास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही फ्रेश होऊ शकता. या आठवड्यात योग्य ते अधिकार स्वतःकडे ठेवून कामाचे नियोजन करू शकता. काम आणि निर्णय क्षमता याबाबत नोकरदारांचे कौतुक होऊ शकते. महिलांनी अभ्यास करूनच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी. विद्यार्थी मित्रांबरोबर छोटी ट्रिप करू शकतील.
कर्क राशी
या आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल. काही कारणांनी नुकसान होण्याची शक्यता आहे. गरज नसताना वस्तूंची खरेदी करू शकता, नंतर वाईट वाटेल. त्यामुळे काळजीपूर्वक खरेदी करा. नोकरदारांचा संयम या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे शब्द जपून वापरावा, विखारी शब्द टाळावा. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
सिंह राशी
या आठवड्यात आपल्या धाडसी स्वभावाला पूरक असे ग्रहमान आहे. नोकरदारांना वरिष्ठांच्या अपेक्षा सांभाळून आणि त्यातून मार्ग काढून, स्वतःच्या इच्छेने पुढे जायचे आहे. स्वतःच्या कामात वेगळेपणा आणून कामाचा आनंद घेऊ शकता. महिलांच्या दृष्टीने संततीबाबत काही सुखदायक गोष्टी घडू शकतील. विद्यार्थ्यांनी आरोग्य सांभाळावे, नवीन उपक्रम हाती घेऊ शकाल.
कन्या राशी
या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या. पोट बिघडण्याची शक्यता आहे. नकारात्मक विचारही मनात येतील. मन:शांतीसाठी आपल्या इष्ट देवतेची उपासना करा. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य असले तरी, अधिकाराचा जपून वापर करणे योग्य राहील. नवे सामाजिक उपक्रम राबवण्याचा विचार कराल. महिलांना संततीसंदर्भात सुखावह बातमी मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करू शकाल. विद्यार्थ्यांना कष्टाशिवाय पर्याय नाही. मित्रांबरोबर ठरवलेले कार्यक्रम ऐनवेळी रद्द करावे लागतील.
हेही वाचा – नक्षत्र… मघा, फाल्गुनी, हस्त!
तुळ राशी
या आठवड्यात रोजच्या कामात व्यग्र असलात तरी पथ्ये पाळावीत. कुटुंबातील व्यक्तींची काळजी राहील. अचानक येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. तरी कामात यश मिळू शकेल. नोकरदारांना कामामध्ये स्वतः जातीने लक्ष द्यावे लागेल. महिलांना शारीरिक आणि बौद्धिक ताणाला सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांना काही मिळवण्यासाठी काही गमावावे लागते, याचा अनुभव येईल.
वृश्चिक राशी
संमिश्र घटनांचा हा आठवडा आहे. मन अशांत राहील. नकारात्मक विचार सतत मनात येतील. समोरच्याबद्दल द्विधा मनस्थिती राहील. नोकरदार कामाच्या ठिकाणी योग्य आणि उत्कृष्ट काम करतील. महिलांना वास्तूपासून लाभ मिळू शकतो. संततीबाबत चांगली बातमी मिळू शकते. अमावस्येदरम्यान वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांनी कामाचे आणि वेळेचे नियोजन करावे, त्याचा पुढील आठवड्यात फायदा होईल.
धनु राशी
या आठवढ्यात वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. अचानक आर्थिक खर्च उद्भवू शकतात. जोडीदाराची साथ मिळेल. संवाद जपून करावा. महिलांना स्वतःची इच्छा बाजूला ठेवून कामे करावी लागतील. विद्यार्थ्यांना खूप प्रयत्न करून यश मिळत नसेल तर मार्ग बदलून बघावा, आता वेळ वाया घालवू नये.
मकर राशी
या आठवड्यात टाळता येणार नाही, असा खर्च वाढणार आहे. तरी नियोजन व्यवस्थित करावे. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. त्यासाठी काळजी घ्यावी, जोडीदारासाठी वेळ द्यावा लागू शकतो. सोमवारपासून कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारी तुम्ही यशस्वीपणे निभावाल. महिलांचे घरातील मदतनीसांबरोबर मतभेद होऊ शकतात. मात्र, रागाला आवर घालावा. विद्यार्थीवर्गाने मौन बाळगावे, योग्य वेळ बघून व्यक्त व्हावे.
कुंभ राशी
या आठवड्यात कामाचा व्याप वाढू शकतो. त्याचा मोबदला मिळण्यास वेळ लागेल. कामाच्या ठिकाणी दुय्यम कामे मिळतील, पण त्याचा विचार न करता कार्य करत राहावे. जोडीदाराशी योग्य संवाद साधून पुढील नियोजन करावे. स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध आहेत, त्याचा उपयोग महिलांनी करून घ्यावा. विद्यार्थीवर्गाने संधीचा फायदा करून घ्यावा. मित्रांबरोबर व्यवहारात पारदर्शकता ठेवावी.
मीन राशी
या आठवड्यात शनी महाराजांमुळे नवीन जबाबदारी पार पाडावी लागेल. स्वतःकडे लक्ष द्यावे. आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि सूर्य उपासना करावी. इतरांच्या वागण्यामुळे कधी आनंद तर कधी खेद होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. महिलांना छोटे प्रवास घडतील. भाग्याची साथ राहील. तर, विद्यार्थीवर्गाने वाहन जपून चालवावे. मित्रांचे वाहन शक्यतो चालवू नका.
prajaktakathe3970@gmail.com
हेही वाचा – आकाशातील चित्रा आणि स्वाती नक्षत्र