Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 नोव्हेंबर 2026

    November 21, 2026

    …अन् शर्वायने माफी मागितली

    November 20, 2026

    एक मॉर्निंग वॉक असाही….

    November 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, November 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 नोव्हेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 नोव्हेंबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 21, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 21 नोव्हेंबर 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 30 कार्तिक शके 1948; तिथि : द्वादशी 28:56; नक्षत्र : रेवती 29:54;
    • योग : सिद्धि 26:30; करण : बव 17:49;
    • सूर्य : वृश्चिक; चंद्र : मीन 29:54; सूर्योदय : 06:47; सूर्यास्त : 17:59;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2083; युगाब्द : 5128

    भागवत एकादशी

    तुलसीविवाहारंभ

    पंढरपूर यात्रा

    चातुर्मास्य समाप्ती

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    खलनायकाची भूमिका साकारणारे प्रेमनाथ

    टीम अवांतर

    हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे खलनायक म्हणून ज्यांची गणना केली जाते अशा प्रेमनाथ मल्होत्रा यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1926 रोजी पेशावरमधील घंटा घराजवळील करीमपुरा परिसरात झाला. ते त्यांचे वडील उच्चपदस्थ पोलीस अधिकारी होते, त्यामुळे प्रेमनाथ यांनी देखील देशसेवा करावी या हेतूने त्यांना सैन्यात भरती करण्यात आले होते. मात्र फाळणीनंतर त्यांचे कुटुंब जबलपूरला स्थलांतरित झाले आणि प्रेमनाथ मुंबईला गेले, जिथे एक अभिनेता म्हणून ते नावारूपाला आले.

    त्यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट  होता ‘अजित’. पुढे राज कपूर यांच्या ‘आग’ आणि ‘बरसात’ या चित्रपटांमुळे प्रेमनाथ यांना व्यापक ओळख मिळाली आणि त्यानंतर त्यांनी ‘बादल’ या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेल्या साहसी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. 1952 मध्ये, त्यांनी मेहबूब खान यांच्या ‘आन’ या साहसी चित्रपटात खलनायक शमशेर सिंग यांची भूमिका साकारली.

    हेही वाचा – पत्रिकेतील अष्टम भाव आणि तर्क

    चार दशकांच्या कारकिर्दीत प्रेमनाथ यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 1950 आणि 1960 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत त्यांनी मुख्य भूमिका साकारणे सुरू ठेवले, ज्यात सगाई, साकी, औरत, जागीर, पठाण, आणि रुस्तम सोहराब यांचा समावेश होता. 1970 च्या दशकात भारतीय चित्रपट इतिहासातील काही सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये मुख्य खलनायक किंवा सहाय्यक भूमिका साकारून त्यांना ओळख मिळू लागली. त्यांच्या काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये तिसरी मंझिल, जॉनी मेरा नाम, तेरे मेरे सपने, शोर, बॉबी, रोटी कपडा और मकान, धर्मात्मा, कालीचरण, क्रोधी आणि देश प्रेमी यांचा समावेश होता. त्यांनी सत श्री अकाल या धार्मिक पंजाबी चित्रपटातही काम केले.

    खलनायकाची भूमिका साकारत असताना त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली की चित्रपटाच्या नायकाऐवजी खलनायक म्हणून ते अधिक फी एका चित्रपटासाठी घेत असत. प्रेम नाथ यांनी केनरे या अमेरिकन चित्रपटातही काम केले होते. हा चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झाला होता. याशिवाय त्यांनी 1967 ते 1969 या काळात अमेरिकन टीव्ही शो ‘माया’मध्ये देखील त्यांनी काम केले.

    अभिनयाव्यतिरिक्त, प्रेमनाथ यांनी त्यांची अभिनेत्री-पत्नी बिना राय यांच्यासोबत स्थापन केलेल्या पीएन फिल्म्सच्या बॅनरखाली चित्रपट निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले. कंपनीच्या प्रमुख निर्मितींमध्ये शगुफा आणि प्रिझनर ऑफ गोलकोंडा  यांचा समावेश होता; गोवलकोंडा चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते.

    त्यांना शोर, बॉबी, अमीर गरीब आणि रोटी कपडा और मकान या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्मफेअर नामांकन मिळाले होते. 3 नोव्हेंबर 1992 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आजच्या दिवशी खर्चाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे तुम्हाला थोडी चिंता वाटणे स्वाभाविक आहे. जोडीदारासोबत कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळानंतर एखाद्या लाडक्या चुलत किंवा मामे भावाची भेट होईल. ज्याच्यासोबत तुम्ही तुमचे विचार शेअर करू शकाल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षित यश मिळेल. जर तुम्ही पूर्वी कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते आज परत मिळू शकतात.

    वृषभ – आजचा दिवस गोंधळ निर्माण करणारा असेल. मात्र नशिबाची साथ मिळाल्याने तुमची कामे सहजपणे पूर्ण होतील.  कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही एखाद्या कामासाठी भावंडांची मदत मागल आणि ते तुम्हाला नक्कीच पाठिंबा देतील. आज आरोग्याच्या तक्रारी राहतील, तुम्हाला मोसमी आजारांचा त्रास होऊ शकतो. घरी भजन, कीर्तन आणि पूजा यांसारख्या अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.

    मिथुन – आजचा दिवस फायदेशीर ठरेल. जोडीदाराच्या पाठिंब्याने तुम्ही एक महत्त्वाचे काम पूर्ण कराल. ज्यामुळे तुमचे उत्पन्नही वाढेल.  सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या कार्याचा गौरव म्हणून एखादा पुरस्कार मिळेल, ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण असेल.संध्याकाळी  कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या मनोरंजक कार्यक्रमात सहभागी व्हाल किंवा एखादा चित्रपट बघायला जाल. कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्याने तुम्ही काहीतरी नवीन करून पाहाल. जे शेअर बाजारात गुंतवणूक करतात, त्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

    कर्क – आजचा दिवस आनंदाचा असेल. तुम्हाला एकापाठोपाठ एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुमच्या मनाला आनंद होईल. जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमची ही इच्छा देखील पूर्ण होईल. एखादे कायदेशीर प्रकरणे अनुभवी व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होईल. व्यवसायातील काही समस्यांमुळे चिंतीत असाल, ज्यामुळे वेळेवर निर्णय घेणे कठीण होऊ शकते. अशावेळी निर्णय घेणे थोडेसे पुढे ढकला किंवा‌ संपूर्ण प्रकरणाचा साधक बाधक विचार करून मगच पुढे जा.

    सिंह – तुमची काही कामे भागीदारांच्या मदतीने आज पूर्ण होतील. भागीदारीत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठीही दिवस चांगला असेल. कामाच्या ठिकाणी कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. एखाद्या व्यवहारातून चांगला नफा मिळेल. कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. आज एखाद्या कौटुंबिक निर्णयात काका-काकूंकडून पाठिंबा मिळेल. घाईने कोणताही निर्णय घेऊ नका, कारण त्यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

    कन्या – आजचा दिवस खूप फायदेशीर असेल. ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल. आर्थिक बाबतीतही फायदा होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित असलेले कोणतेही महत्त्वाचे काम उद्या पूर्ण होऊ शकते. जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना मित्राकडून मदत मिळेल. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आज आवश्यक असेल.

    तुळ – आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.  एक चांगला व्यावसायिक करार पक्का होईल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना एक मोठी संधी मिळू शकते. कुटुंबातील सुरू असलेले वाद मिटण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. अविवाहित जातकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. संध्याकाळी स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्याल.

    वृश्चिक – आजचा दिवस संमिश्र असेल. नोकरी करणाऱ्यांना वाढत्या कामाच्या दबावाला सामोरे जावे लागेल, ज्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. अचानक अशी काही कामे येऊ शकतात, ज्यामुळे चिंता आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. परदेशात राहणाऱ्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून काही चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनात, जोडीदारासोबत समन्वय राखणे आवश्यक असेल; अन्यथा मतभेद निर्माण होऊ शकतात.

    हेही वाचा – महागडं लग्न… एक झगमगती, पण थकवणारी गोष्ट!

    धनु – आजचा दिवस अनुकूल अहे. बऱ्याच दिवसांनी जोडीदारासोबत मनासारखा वेळ घालवता येईल. भावांसोबतच्या गैरसमजामुळे नात्यात तणाव वाढू शकतो. स्वतःच्या कल्पकतेचा वापर करून, कामाच्या ठिकाणी तुमच्या शत्रूंना सहज पराभूत कराल. व्यवसायात प्रतिस्पर्धकांना नामोहरम करण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि तुम्ही काही व्यावसायिक प्रकल्प सुरू करू शकता. यासाठी वडिलांकडून पाठिंबा आणि भांडवलही मिळेल.

    मकर – आजचा दिवस उत्तम जाणार आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना एक फायदेशीर संधी मिळेल. आज कुटुंबात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. सहकाऱ्यांसोबत वाद झाल्यास, संयम बाळगा. जर तुम्हाला एखादी गोष्ट सतावत असेल, तर त्याबद्दल पालकांशी बोला; तुम्हाला त्यावर चांगला उपाय मिळण्याची शक्यता आहे. क्रीडा आणि संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा दिवस उत्साहवर्धक असेल. कुटुंबातील सदस्यासाठी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

    कुंभ – आजचा दिवस आनंद घेऊन येणारा आहे. तुम्हाला जोडीदाराकडून प्रचंड पाठिंबा आणि साथ मिळेल. स्वतःच्या आरोग्याची मात्र काळजी घ्या. जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा, पोटदुखी आणि इतर समस्या उद्भवू शकतात. जे जातक एखाद्या अनावश्यक गोष्टीमुळे तणावाखाली आहेत त्यांनी ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. व्यावसायिक त्यांच्या भागीदारांसोबत एखाद्या सहलीला जाऊ शकतात

    मीन – आजचा दिवस मीन  जातकांसाठी अनुकूल आहे. तुमच्या अनेक चिंता दूर होतील आणि एखादे कार्य पूर्ण झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. जर तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते आज पूर्ण होऊ शकते. तुम्ही तुमच्या कौटुंबिक संबंधांमधील मतभेद दूर करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. कोणासोबतही महत्त्वाची माहिती शेअर करणे टाळा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 नोव्हेंबर 2026

    November 20, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 नोव्हेंबर 2026

    November 19, 2026 पंचांग आणि भविष्य

    दक्षिण-पूर्व दिशेचा वास्तुदोष आणि उच्च रक्तदाब

    November 18, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 नोव्हेंबर 2026

    By Team AvaantarNovember 20, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 20 नोव्हेंबर 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 29…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 नोव्हेंबर 2026

    November 19, 2026

    दक्षिण-पूर्व दिशेचा वास्तुदोष आणि उच्च रक्तदाब

    November 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 नोव्हेंबर 2026

    November 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 नोव्हेंबर 2026

    November 21, 2026

    …अन् शर्वायने माफी मागितली

    November 20, 2026

    एक मॉर्निंग वॉक असाही….

    November 20, 2026

    Recipe : टेस्टी पालक आणि मुळा पॉकेट्स

    November 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : वाजतें वारें निवांत, जंव न राहे जेथिंचें तेथ

    November 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 नोव्हेंबर 2026

    November 20, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 नोव्हेंबर 2026

    November 21, 2026

    …अन् शर्वायने माफी मागितली

    November 20, 2026

    एक मॉर्निंग वॉक असाही….

    November 20, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.