भारतात विवाह जमण्यामागील मानसिकता ही प्रामुख्याने दोन व्यक्तींच्या मिलनापेक्षा दोन कुटुंबांचे मिलन या विचारावर आधारित असते. काळानुसार यात बदल होत असले, तरी आजही पारंपरिक मूल्ये आणि आधुनिक अपेक्षा यांचा संगम यात पाहायला मिळतो. आजही पत्रिका (गुणमिलन) जुळण्याला प्राधान्य दिले जाते. यामुळे भविष्यात मतभेद कमी होतात असा विश्वास असतो. मात्र सगळे गुण असून देखील विवाह जमण्यास विलंब होतो.
उशिरा विवाह जमण्यामागे काही प्रमुख योग कारणीभूत असतात. त्यासाठी पुढील महत्त्वाचे योग लक्षात ठेवावेत.
- सप्तमस्थानात मकर किंवा कुंभ रास असणे.
- लग्न, पंचम, सप्तम किंवा दशमस्थानात शनि असणे.
- शुक्र हा शनीच्या युतीत अथवा दृष्टीत असणे.
- सप्तमेश हा शनीच्या युतीत अथवा दृष्टीत असणे.
- शुक्र कन्या राशीत असणे.
- पंचमस्थानात मंगळ असणे.
- चंद्र हा शुक्र–शनीच्या केंद्रयोगात असणे.
- सप्तमस्थानात शनि–मंगळ युती असणे, तसेच हर्षल किंवा नेपच्यून यांचा प्रभाव असणे.
- शनि–चंद्र युती असणे.
- सप्तमेश व्ययस्थानात (12व्या स्थानात) असणे.
- लग्नेशावर शनि अथवा मंगळाची दृष्टी असणे.
- शुक्र नीच राशीत किंवा स्तंभी असणे.
- शुक्र राहू, केतू अथवा हर्षलच्या युतीत असणे.
- चंद्र आणि शुक्र यांच्या सप्तमस्थानी दोन पापग्रह असणे.
- सप्तमस्थानात वक्री किंवा नीच राशीतील शनि असणे.
हेही वाचा – वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – प्रभाव, करिअर
मुख्यतः शनि हा मंदगती ग्रह असल्यामुळे शुक्र किंवा सप्तमेश यांच्याशी त्याचा योग विवाहास विलंब करणारा मानला जातो. या योगांमुळे अनेक वेळा विवाहाचे बोलणे बराच काळ चालू राहते, परंतु अंतिम निर्णय होण्यास विलंब होतो.
विवाह जमविताना मुलगी किंवा मुलगा यांचा अनेक ठिकाणी दाखवण्याचा कार्यक्रम पार पडतो. कित्येक वेळा सर्व गुण अनुकूल असूनही केवळ या योगांमुळे विवाह अनेक वर्षे प्रलंबित राहू शकतो.
00000
लवकर विवाह जमण्यामागील प्रमुख योग
जन्मकुंडलीत पुढीलपैकी काही योग असल्यास जातकाचा विवाह लवकर होण्याची शक्यता मानली जाते.
- लग्नस्थानात किंवा सप्तमस्थानात शुक्र असणे.
- गुरु आणि शुक्र हे प्रतियोग (Opposition) योगात असणे.
- शुक्र आणि चंद्र हे दोन्ही ग्रह कर्क, वृश्चिक किंवा मीन या जलराशींमध्ये असणे.
- चतुर्थेश सप्तमस्थानात असणे.
- सप्तमस्थानाचा अधिपती शुभ ग्रहांच्या राशीत असणे आणि शुक्र स्वगृही किंवा बलवान असणे.
- द्वितीय (2) आणि एकादश (11) स्थानांचे अधिपती एकमेकांच्या स्थानात असणे.
- सप्तमस्थानात बलवान शुक्र, चंद्र किंवा गुरु असणे.
- दशमस्थानात शुक्र असणे.
- सप्तम, द्वितीय (धन) आणि लग्नस्थानात शुभग्रह असणे.
- पुरुषांच्या कुंडलीत चंद्र आणि शुक्र बलवान असणे, तसेच स्त्रियांच्या कुंडलीत रवि, मंगळ आणि शुक्र बलवान असणे.
हेही वाचा – वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – लाभ, मुक्तता


