Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 22 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 22 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 22, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 22 मे 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 01 ज्येष्ठ 1948; तिथि : षष्ठी 06:24, सप्तमी 29:04; नक्षत्र : आश्लेषा 26:07;
    • योग : वृद्धी 08:18; करण : गरज 17:38;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : कर्क 26:07; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:07;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाष्यकार विष्णू वामन बापट

    टीम अवांतर

    शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार विष्णू वामन बापट यांचा जन्म 22 मे 1871 रोजी कोकणातील धालवल (तालुका राजापूर जि. रत्नागिरी) येथे झाला. त्यांचे शिक्षण रामदुर्ग, शिरोळ आणि मिरज येथे इंग्रजी पाचवीपर्यंत झाले. त्यानंतर निरनिराळ्या रेल्वे कार्यालयांत काम करीत असताना, संस्कृतच्या अभ्यासाची ओढ निर्माण झाल्यामुळे संस्कृत शिकले आणि वाई येथील प्रज्ञानंद सरस्वतींकडे सुमारे अकरा महिने राहून त्यांनी वेदान्ताचे अध्ययन केले. अध्ययनकाळात चरितार्थासाठी वाईच्या मोदवृत्त छापखान्यात मुद्रितशोधकाची नोकरी केली.

    1903 ते 1912 या काळात सिंध हैदराबाद येथील संस्कृत पाठशाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले. 1912 साली पुण्यास येऊन ग्रंथप्रकाशनाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला (मासिक), आचार्य (पाक्षिक) आणि आचार्यकुल (मासिक) यासारखी नियतकालिके चालविली. याच्या माध्यमातून याज्ञवल्क्यस्मृती, मनुस्मृती या स्मृती, हरिवंश, भविष्यपुराण, आनंदरामायण हे पुराण ग्रंथ, आणि शंकराचार्यांची स्तोत्रे यांची भाषांतरे प्रकाशित केली. ग्रंथप्रकाशनाच्या बाबतीत वैदिक धर्माचा अभिमान असलेले दानशूर व्यापारी विठ्ठलदास दामोदर ठाकरसी यांचे बापटांना मोलाचे सहाय्य झाले. संस्कृतमधील बरेचसे प्राचीन तत्त्वज्ञानसाहित्य बापटांनी मराठीत आणले, ही त्यांची फार मोठी कामगिरी होय.

    हेही वाचा – नीला-विनायक प्रेमकहाणी अन् भूतबंगला..

    गीता, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्र या प्रस्थानत्रयीचा शांकरभाष्यानुसार परिचय त्यांनी मराठीतून घडविला. तसेच भारतीय तत्त्वज्ञानातील अद्वैतादी विविध दर्शनांवर मराठीतून लेखन केले. रामानुज, पूर्णप्रज्ञ, माहेश्वर, जैमिनी-पाणीनी या दर्शनांवर त्यांनी समतभेद लिहिले तर, जैन, बौद्ध, चार्वाक या दर्शनांचा परिचय घडविताना त्यांचे खंडनही केले. ब्रह्मसूत्रशारीरभाष्यार्थही त्यांनी तीन भागांत सांगितला. मूळ सूत्र, सूत्रार्थ, शांकरभाष्य, अवतरणे, स्पष्टीकरण आणि भामत्यादी टीकाकारांचा अधिक आशय व्यक्त करणाऱ्या टीपा यासह हा भाष्यार्थ त्यांनी दिला आहे.

    शंकराचार्यकृत आत्मबोध आणि अपरोक्षानुभूती या ग्रंथांचे त्यांनी केलेले अनुवादही उल्लेखनीय आहेत. त्यांनी मराठीत अनुवादिलेल्या ग्रंथात सोमदेवाच्या कथासरित्सागराचाही समावेश होतो. धर्मराजा ध्वरींद्रकृत वेदान्तपरिभाषा या ग्रंथाच्या विवरणाचे तसेच वेदान्त शब्दकोशाचे कामही त्यांनी हाती घेतले होते. तथापि ते त्यांच्याकडून अपूर्ण राहिले. या दोन्ही कामांचा उर्वरित भाग रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर यांनी पूर्ण केला आणि वेदान्तपरिभाषा आणि वेदान्तशब्दकोश हा ग्रंथ प्रसिद्ध झाला.

    बापट हे निष्ठावंत शांकरमतानुयायी असल्यामुळे टिळकांच्या गीतारहस्यातील कर्मयोगवादी भूमिकेला त्यांनी विरोध केला. बापटांनी 1925मध्ये ‘आचार्यकुल’ या नावाची एक अध्यापनसंस्थाही स्थापिली होती. हंपी मठाधिपतींकडून ‘आचार्यभक्त’ आणि बनारस येथील श्रीभारतधर्ममहामंडळातर्फे ‘शास्त्रसुधाकर’ अशा सन्मानाच्या पदव्या त्यांना मिळाल्या होत्या. 20 डिसेंबर 1933 रोजी या थोर शास्त्रसुधारकाचे पुणे येथे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – एखादे दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम अखेर पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे मन हलके होईल. नोकरीच्या ठिकाणी कल्पकतेने काम पूर्ण कराल आणि त्याची दखल वरिष्ठ घेतील. संभाषणामुळे जोडीदाराबरोबरचा दुरावा दूर होईल. राजकारणात असलेल्यांना महत्त्वाचे पद किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढेल.

    वृषभ – सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. त्यानिमित्त काही विशिष्ट व्यक्तींना भेटणे करिअर आणि व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकते. जुन्या प्रिय व्यक्तीसोबत अचानक पुनर्भेट होण्याची शक्यता आहे, परंतु त्यात वाहून न जाणेच उत्तम. बँक कर्ज किंवा आर्थिक बाबींशी संबंधित अडथळेही आज सहजपणे दूर होऊ शकतात. तब्येतीची काळजी घ्या.

    मिथुन – बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता यामुळे तुम्ही इतरांपेक्षा पुढे असाल. विरोधकांच्या प्रभावाखाली येऊन एखादी चूक करणे टाळा. संततीच्या करिअरबाबत महत्त्वाचे पाऊल उचलू शकता. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामासाठी कनिष्ठांकडून मिळणारा पाठिंबा देखील उपयुक्त ठरेल. घरात विवाहेच्छुकांच्या मंगल कार्याविषयीच्या चर्चांनाही वेग येऊ शकतो.

    कर्क – वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणाचा समतोल दिसून येईल. नवीन मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचे विचार येऊ शकतात, परंतु त्याबाबत अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. व्यवसायातील नवीन कल्पना तुम्हाला यशाच्या नव्या उंचीवर नेऊ शकतात. कार्यालयातही तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठ प्रभावित झालेले दिसतील.

    सिंह – एका महत्त्वाच्या माहितीमुळे तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. बऱ्याच काळापासून रखडलेले व्यावसायिक करार अंतिम टप्प्यात येण्याची शक्यता आहे. तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असाल, ज्यामुळे कामे वेळेच्या आधीच पूर्ण होण्यास मदत होईल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ नातेसंबंध अधिक दृढ करेल.

    कन्या – वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, उत्पन्नात वाढ झाल्याने आनंद होईल. जोडीदारासाठी एखादी खास खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल. गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे. जे जातक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.

    तुळ – आजचा दिवस व्यग्रतेचा आणि धावपळीचा असू शकतो. कामे स्वतःच हाताळण्याचा प्रयत्न करा, इतरांवर जास्त अवलंबून राहणे टाळा. एखाद्या पार्टी किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळू शकते, जिथे तुमचे संभाषण लोकांना प्रभावित करू शकेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जुन्या मित्राला भेटल्याने आनंद होईल.

    वृश्चिक – आज आरोग्यात किंचित चढ-उतार होऊ शकतो, त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष द्या. अनपेक्षितपणे प्रवास करावा लागू शकतो. भावांच्या मदतीने एखादी दीर्घकाळाची व्यावसायिक समस्या सुटेल. विद्यार्थी काहीतरी नवीन शिकण्याचा आणि करून पाहण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबात आपलेपणाची भावना वाढेल आणि रक्ताचे नाते अधिक घट्ट होईल.

    हेही वाचा – अखेर अग्रवाल शेठनीच अशोकला दिला न्याय!

    धनु – एखादी इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे थोडे अस्वस्थ वाटू शकते. काम करण्याची इच्छा देखील कमी होऊ शकते, त्यामुळे सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबद्दल जरा काळजी वाटू शकते. जोडीदारासोबत किरकोळ वाद होऊ शकतो, त्यामुळे संयम बाळगा. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.

    मकर – अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा झाल्याने आनंद होईल. पूर्वी गुंतवलेले पैसेही परत मिळू शकतील. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना चांगली बातमी मिळू शकते. घरी नवीन पाहुण्यांच्या आगमनाने आनंदात भर पडेल. जोडीदारासोबतच्या नात्यातील कटूता दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.

    कुंभ – आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला ठरू शकतो. अचानक प्रवासाला जावे लागण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. व्यवसायात नवीन करार, सौदे होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे नवीन मार्ग खुले होतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत कर्ज घेणे टाळणेच उत्तम ठरेल.

    मीन – व्यवसायातील चढ-उतारामुळे मन थोडे अस्थिर राहू शकते. भागीदारीमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण फसवणुकीची शक्यता आहे. इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा. ईश्वरभक्ती आणि आध्यात्मिक कार्यांमुळे मनःशांती मिळेल. नोकरी असो वा कुटुंब जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 22 ऑगस्ट 2026

    August 22, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    By प्राजक्ता काथेAugust 23, 2026

    मेष हा आठवडा मेष राशीसाठी उत्तम आहे. नोकरदारांच्या बाबतीत जागेत बदल संभवतो. नव्या कामाच्या ठिकाणी…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 22 ऑगस्ट 2026

    August 22, 2026

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 546
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 867
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.