Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शिवने रामकडे काय कबुली दिली?

    April 5, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 एप्रिल 2026

    April 5, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 5
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 एप्रिल 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेApril 5, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    या आठवड्यात सरकारी कामे विनासायास पूर्ण होतील. नोकरदारांसाठी कामाच्या ठिकाणी वातावरण साधारण राहील. तथापि, आर्थिक परिस्थिती भक्कम राहील. व्यावसायिक वर्गाला नवीन संकल्पना उपयोगी पडतील. जुनी येणी वसूल होतील. व्यवसाय विस्तार करू शकाल. महिलांना कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल, त्याचबरोबर परिश्रमही हवेत.

    वृषभ

    या आठवड्यात मान-सन्मान मिळेल. नोकरदारांना पगारवाढ आणि प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. वरिष्ठ खूश राहतील. कार्यालयातील सहकाऱ्यांना पार्टी द्याल. व्यावसायिक वर्गाला नफा होईल, व्यवसायात तेजी जाणवेल. महिला अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करू शकतील. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा आनंद मिळेल.

    मिथुन

    या आठवड्यात कलाकारांचा भाग्योदय होईल. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल. श्रेय मिळेल. काम चांगल्याप्रकारे पूर्ण केल्याबद्दल विशेष बक्षीसही मिळेल. व्यावसायिक वर्गाला व्यवसायवृद्धीसाठी खूप परिश्रम करावे लागतील. नवीन योजना वापराव्या लागतील. स्पर्धात्मक परीक्षेत घरातील तरुणांना मिळालेल्या यशाचे श्रेय महिलांना मिळेल. विद्यार्थ्यांच्या नवीन ओळखी होतील. चौकस स्वभावाचा फायदा त्यांना होईल.

    कर्क

    या आठवड्यात नवीन घराचे स्वप्न साकार होऊ शकते. नोकरदारांना नवीन जॉबच्या संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदी असेल. नवीन प्रोजेक्ट मिळतील. व्यावसायिक वर्गाचे नवीन करार होतील. नवीन योजना अमलात आणून प्रगती करू शकाल. तसेच, नवीन खरेदीही कराल. महिलांना अचानक प्रवास घडेल. ज्या कामासाठी प्रवास कराल ते काम यशस्वीपणे पूर्ण करतील. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल, सगळीकडून कौतुक होईल.

    सिंह

    या आठवड्यात कोर्ट-कचेरी संदर्भात यश मिळेल. नोकरदारांना दबावाखाली काम करावे लागू शकते. ज्येष्ठ सहकाऱ्यांना योग्य तो मान द्यावा. शब्द जपून वापरावेत. व्यावसायिक वर्गाला हितशत्रूंवर मात करता येईल. अडथळे आणि समस्या उभ्या राहतील; त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जा. महिलांनी स्वभावातील दिखाऊपणा कमी करावा. तसेच, चांगली संगत ठेवावी. विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनपेक्षित शुभ घटना घडतील. त्यामुळे आनंदी रहाल.

    हेही वाचा – या डोळ्यांची दोन पाखरे…

    कन्या

    या आठवड्यात फसवणुकीपासून सावध रहा. नोकरदारांनी सहकारी तसेच वरिष्ठांच्या गोड बोलण्यावर भुलू नये. कधी जास्त काम तुमच्यावर सोपवतील ते कळणार नाही. व्यावसायिक वर्गाने नवीन करारावर सही करण्याची घाई करू नये. नवीन योजना सध्या लांबणीवर टाका. कायद्याचे काटेकोर पालन करा. महिलांनी दारावर येणाऱ्या वस्तू विकत घेऊ नका. तसेच ऑनलाइन ॲपपासून सावध रहा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

    तुळ

    या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरदारांच्या बाबतीत स्थिती सामान्य राहील. नवीन नोकरीसंबंधित मुलाखती सफल होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यावसायिक वर्गाला खूप धावपळ करावी लागेल. तथापि, उत्पन्नात वाढ होईल. हितशत्रूंच्या कारवाया वाढतील; त्याकडे लक्ष द्यावे लागेल. महिला घरच्या व्यवसायात महत्त्वाची जबाबदारी पार पाडतील. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाशी संबंधित आनंदाची बातमी मिळेल. परिणामी उत्साह वाढेल.

    वृश्चिक

    या आठवड्यात क्रीडा क्षेत्रातील लोकांना चांगल्या संधी मिळतील. नोकरदारांना अपेक्षित असलेल्या गोष्टी पूर्ण होतील. सहकारी वर्ग मदत करेल. स्वतःच्या निर्णयावर ठाम रहा. व्यावसायिक वर्गाची उलाढाल वाढून उत्पन्नात वाढ होईल. नवीन जाहिरात करणे हिताचे राहील. कामानिमित्त परदेशी जाण्याचा योग आहे. महिलांना अधिक श्रम पडतील, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. तसेच, वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल.

    धनु

    या आठवड्यात महत्त्वाचे करार होतील. नोकरदारांना परत आपल्या मूळ पदावर येण्याचा मार्ग मिळण्याची शक्यता आहे. पूर्ण माहिती करून घेतल्यानंतरच कामाची जबाबदारी स्वीकारा. व्यावसायिक वर्गाची प्रलंबित खटले मार्गी लागतील, निर्णय तुमच्या बाजूने येईल. व्यवसायात चांगली उलाढाल होईल. महिलांच्या कामाचे कौतुक होईल. नवीन आवडीचे काम मिळेल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, निर्णयक्षमता वाढेल.

    मकर

    या आठवड्यात सुवार्ता मिळतील. नोकरदारांना अनपेक्षित लाभ मिळतील. प्रमोशन आणि त्याअनुषंगाने पगारवाढ असे फायदे मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाच्या उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कामगारांचे प्रश्न अचानक उद्भवू शकतात, वेळीच ते सोडवा. कोणाला उसने दिलेले पैसे महिलांना ते परत मिळतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल, आवडीचे काम करण्याची संधी मिळेल.

    कुंभ

    या आठवड्यात घरातील व्यक्तीच्या आरोग्यासाठी खर्च होईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना जास्त त्रास जाणवेल. व्यावसायिक वर्गाची बुद्धिमत्ता आणि संवादकौशल्याने प्रभावित होऊन नवीन कामे मिळतील. व्यवसायवृद्धी होईल. भागीदार खूश होतील. महिलांच्या बाबतीत वडिलोपार्जित संपत्तीची कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करावे, वाद घालू नये.

    हेही वाचा – आपल्यांचा आपलेपणा…

    मीन

    या आठवड्यात उदास वाटेल. नोकरदारांची मनासारखी कामे होणार नाहीत. उगीच चिडचिड होईल. तुमच्या कामाचे श्रेय दुसरेच घेऊन जाण्याची शक्यता आहे; सावध रहा. जुनी येणी वसूल करताना व्यावसायिक वर्गाला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. ते काम करण्यासाठी एखादी व्यक्ती ठेवा; स्वतः करू नका. महिलांना कुटुंबातील तरुणांचे प्रश्न योग्य मार्गाने तसेच व्यवस्थितपणे समजावून सोडवावे लागतील, वाद घालू नका. विद्यार्थ्यांना घरातून तसेच शिक्षकांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळेल. शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 05 एप्रिल 2026

    April 5, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 एप्रिल 2026

    April 4, 2026 पंचांग आणि भविष्य

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 05 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 5, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 एप्रिल 2026; वार : रविवार भारतीय सौर : 15…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 एप्रिल 2026

    April 4, 2026

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 एप्रिल 2026

    April 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    शिवने रामकडे काय कबुली दिली?

    April 5, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 एप्रिल 2026

    April 5, 2026

    Dnyaneshwari : जेणें देवांचा मानु गिंवसिला, धर्मासि जीर्णोद्धार केला…

    April 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 05 एप्रिल 2026

    April 5, 2026

    युवराजने मागितली धोनी, कपिल देव यांची माफी; नेमकं काय घडलं?

    April 4, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 258
    • अवांतर 180
    • आरोग्य 97
    • पंचांग आणि भविष्य 375
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 191
    • मैत्रीण 17
    • ललित 534
    • शैक्षणिक 75

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शिवने रामकडे काय कबुली दिली?

    April 5, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 एप्रिल 2026

    April 5, 2026
    Most Popular

    शिवने रामकडे काय कबुली दिली?

    April 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.