Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » प्रत्येक घराचा ‘आधारवड’!
    मैत्रीण

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरMarch 24, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, घराचा आधारवड, स्त्रीचे महत्त्व, घराचे घरपण, मायेची सायवली महिला, महिला सन्मान, स्त्री सन्मान, नेहाची स्वप्ने, नेहा मुलीसाठी प्रेरणास्थान, नेहा लेकीची प्रेरणा,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पहाटेचे साडेपाच वाजले होते. सूर्यनारायण अजून पूर्व क्षितिजावर अवतरला नव्हता; पण स्वयंपाकघरात आणि हॉलमध्ये मात्र दिवे लागले होते. हॉल आणि स्वयंपाकघर झाडून-पुसून स्वच्छ झाले होते. बाल्कनीतील झाडांनाही मायेने पाणी घालून झाले होते. गॅसवर चहा ठेवला होता, गाजर हलवा तयार होता आणि बिर्याणी बनत होती. बाकी घरात मात्र सामसूम पसरली होती, कारण बाकीचे अजून निद्राधीन होते…

    “नेहा… चहा झाला का?”

    आतून पतीदेवांचा आवाज आला.

    “हो, तयार आहे. तुम्ही ब्रश करून या. लगेच देते.”

    ती कपात चहा ओतताना सहज हसली. घरातल्या प्रत्येकाची सकाळ तिच्यामुळे सुरू होत होती.

    मुलगा उठला… “आई, माझ्या प्रोजेक्टची फाइल कुठे आहे?”

    “तुझ्या बॅगेत आहे… रात्रीच ठेवून दिली.”

    मुलगी म्हणाली,

    “आई, आज कॉलेजमधून यायला मला उशीर होईल.”

    “डबा घेऊन जा… बिर्याणी आणि गाजर हलवा केलाय,” नेहा हसत म्हणाली.

    थोड्याच वेळात घरातले सर्वजण आपापल्या कामाला निघून गेले. दरवाजा बंद झाला… आणि घरात शांतता पसरली. थकलेली नेहा खुर्चीवर बसली. चहा पिताना तिची नजर भिंतीवर टांगलेल्या फोटोवर पडली— तिच्या लग्नानंतरच्या गृहप्रवेशाचा फोटो!

    हेही वाचा – सदानंद सर अन् सावित्रीबाईंची स्वप्नपूर्ती!

    त्या फोटोतली नेहा आजच्या नेहापेक्षा खूप वेगळी दिसत होती. नवीन घराकडून बर्‍याच अपेक्षा होत्या. डोळ्यांत असंख्य स्वप्नं होती. तिने हलकेच स्वतःशीच म्हटलं —

    “स्वप्नं अजून आहेत… फक्त थोडी बाजूला ठेवली आहेत.”

    तेवढ्यात फोन वाजला.

    “आई…”

    मुलीचा आवाज होता.

    “आई, आम्ही आज कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन साजरा करतोय. मला ‘माझी प्रेरणा’ या विषयावर बोलायचं आहे.”

    नेहा हसली… “छान विषय आहे… तुला प्रोत्साहन देणाऱ्या सरांविषयी बोल.”

    मुलगी म्हणाली — “आई, मी तुझ्याबद्दल बोलणार आहे.”

    नेहा थोडी गोंधळली.

    “माझ्याबद्दल? मी काय केलंय एवढं?”

    पलीकडून मुलगी हसली…

    “आई… तू खूप काही केलंयस. आम्ही पडतो तेव्हा तू उभी असतेस. आम्ही रडतो तेव्हा तू धीर देतेस. आमचं आयुष्य घडवताना तू स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवलीस. तूच माझी प्रेरणा आहेस… माझा आधार आहेस.”

    नेहाच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं. फोन ठेवून ती पुन्हा त्या फोटोसमोर उभी राहिली.

    “माझ्या मुलांची स्वप्नं… तीच आता माझी स्वप्नं.”

    नकळत ती पुटपुटली…

    घराला चार भिंती असतात, पण त्या भिंतींना आधार देणारी एक स्त्री असते. तिचं नाव कधी मोठ्या अक्षरात लिहिलं जात नाही. तिच्यासाठी सन्मान सोहळे होत नाहीत. पण तिच्याशिवाय कोणाचंही आयुष्य पूर्ण होत नाही.

    हेही वाचा – दिसलीस तू फुलले ऋतू…

    नेहा आरशात स्वतःकडे पाहून हलकेच हसली. तारुण्य संपत आलं होतं; चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात झाली होती. आज तिला पहिल्यांदाच जाणवलं — ती फक्त घर सांभाळणारी स्त्री नव्हती… ती घर जिवंत ठेवणारी शक्ती होती… या घराचा आधारवड होती!

    मुलांच्या भविष्यासाठी स्वतःचं अस्तित्व विसरून धडपडणारी माता होती…

    आई म्हणोनी कोणी
    मजला हाक देई
    हृदयामधील वेदना
    नकळत लुप्त होई

    काही स्त्रिया इतिहास घडवतात… पण बर्‍याच जणी इतिहास घडवत नाहीत… त्या इतिहास घडवणारी माणसं घडवतात!

    खरं सांगायचं तर, स्त्री नसती तर जगालाच उभं राहता आलं नसतं, पुढे जाता आलं नसतं. घराला घरपण आलं नसतं… आणि उबदार मायेची सावलीही मिळाली नसती.

    आणि म्हणूनच जगात एक दिवस स्त्रीसाठी असला तरी आयुष्यभर तिचा सन्मान करावा.


     

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    सौंदर्याचा सुवर्णपाश!

    March 11, 2026 मैत्रीण

    मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!

    March 10, 2026 मैत्रीण

    जागतिक महिला दिन विशेष… तिचे असणे, तिचे नसणे!

    March 8, 2026 मैत्रीण
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    सौंदर्याचा सुवर्णपाश!

    By Team AvaantarMarch 11, 2026

    रेवती निलेश पांडे पंचवीस-एक वर्षांपूर्वी जवळपास सगळ्यांच्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या नातेवाईकांकडे जायच्या. काका, मामा, मावशी यांच्याकडे…

    मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!

    March 10, 2026

    जागतिक महिला दिन विशेष… तिचे असणे, तिचे नसणे!

    March 8, 2026

    स्वेटर… जुन्या विणी गेल्या विस्मरणात!

    March 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 509
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn