Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    April 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : अशा प्रकारे पालक परोठे अन् कोबीची थालिपीठ भाजी करून पाहा…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : अशा प्रकारे पालक परोठे अन् कोबीची थालिपीठ भाजी करून पाहा…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, कोबी थालिपीठ भाजी, नवलकोल थालिपीठ भाजी, दुधी भोपळा थालिपीठ भाजी, लाल भोपळा थालिपीठ भाजी, मुळा थालिपीठ भाजी, मेथी परोठे, मेथी पराठे, पालक परोठे, पालक पराठे, टोमॅटो सूप, फणसाची भाजी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… ‘फूड कॉर्नर’मध्ये पालक किंवा मेथी पराठे तसेच कोबी, नवलकोल, दुधी भोपळ्याची थालिपीठ भाजी करण्यासंदर्भात दिलेल्या या टिप्स वापरून पाहा.

    • दोडकी (शिराळी) काही वेळा कडू निघण्याचा संभव असतो. ती चाखूनच भाजी करावी लागते. अशा वेळी त्याच्या देठासह भाजी केल्यास कडू लागत नाही.
    • टोमॅटोचे सूप बनवण्याच्या वेळेस टोमॅटो उकडून नंतर मिक्सरमध्ये फिरवताना त्यात ब्रेडचे एक-दोन स्लाइस टाकून मिक्स करणे, त्यामुळे सूप जाड होईल आणि टेस्ट (स्वाद) पण चांगली येईल.
    • कोबी आणि फ्लॉवर चिरून झाल्यावर भाजी करतेवेळी गरम पाण्याने धुऊन घ्यावेत. कोबीचा थोडा उग्र वास असतो, तो निघून जातो आणि फ्लॉवरमध्ये न दिसणाऱ्या बारीक अळ्या निघून जातात. भाज्यांना चवही चांगली येते.

    हेही वाचा – Kitchen Tips : कोबीची भाजी, मसालेभात, पालक-पनीर बनवताना हे करून पाहा…

    • मेथी, पालकाचे पराठे करताना निम्मी कच्ची जुडी, त्यात सात-आठ पाकळ्या लसूण, मिरची, एक कांदा चिरून घालावा आणि सगळे मिक्सरमधून काढून घ्यावे. तर, उरलेली जुडी बारीक चिरावी आणि दोन्ही एकत्र करून कणीक भिजवावी. पराठ्यांना छान हिरवा रंग येतो आणि चवही छान लागते.
    • भाजीसाठी वांगी घेताना त्याची डेखे न फेकता सुकवून ठेवावीत. सांबार अगर रसम् करताना घरात वांगे नसेल तर सांबार उकळताना त्यात 4-5 वांग्याची डेखे उकळीत टाकल्यास सुरेख स्वाद येतो.
    • कोबी, नवलकोल, दुधी भोपळा, लाल भोपळा, मुळा अशा ‘नावडत्या’ भाज्या किसून त्यांची थालिपीठ भाजणी पेरून भाजी करावी. उपयुक्त अन्नघटक असलेली ही भाजी थालिपिठाच्या आवडीने खाल्ली जाते.

    हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स

    • बहुतेक वेळा कांदा चिरताना कांदे तिखट असल्यामुळे डोळ्यांतून गंगा-जमुना सारख्या वाहात असतात. तेव्हा ‘नको हा कांदा’ असे वाटायला लागते. परंतु कांद्याशिवाय कशालाही चव लागत नाही. त्यावर उपाय म्हणून कांद्याच्या वरची साल काढून त्याचे दोन-दोन भाग करून एका बंद प्लॅस्टिक डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी तो कांदा चिरायला घ्यावा. अजिबात तिखटपणा जाणवत नाही आणि डोळ्यांतून पाणीही येत नाही. शिवाय, कांदे एकदम सोलून ठेवल्यामुळे गडबडीच्या वेळेस फ्रीजमधून कांदा काढून पटकन चिरता येतो आणि वेळेची बचत होते.
    • फणस कच्चा चिरण्यापेक्षा सालासकट दोन-तीन तुकडे करून कुकरमध्ये डाळभाताबरोबर उकडावा. नंतर साले काढून बारीक चिरावा.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताच्या चकल्या, मसालेभात, रस्साभाजी करताना…

    April 7, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    By माधवी जोशी माहुलकरApril 12, 2026

    उन्हाळा आला की, विदर्भात चिवळीची आणि घोळीची भाजी दिसायला लागते. पुष्कळ लोक घोळीलाच चिवळ समजतात.…

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताच्या चकल्या, मसालेभात, रस्साभाजी करताना…

    April 7, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    April 13, 2026

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    April 13, 2026

    IPL 2026 : परवानगी नसताना कोणी वापरला मोबाइल? कारवाई होणार का?

    April 12, 2026

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 266
    • अवांतर 181
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 3
    • पंचांग आणि भविष्य 383
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 550
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    April 13, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.