Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    इंटरव्ह्यूसाठी नेहा ऑफिसमध्ये पोहोचली खरी…

    March 31, 2026

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    March 31, 2026

    ही वाट एकटीची…

    March 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 मार्च 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 31, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 31 मार्च 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 10 चैत्र शके 1948; तिथि : त्रयोदशी 06:55; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 15:20
    • योग : गंड 15:41; करण : गरज 18:58;
    • सूर्य : मीन; चंद्र : सिंह 21:32; सूर्योदय : 06:35; सूर्यास्त : 18:51;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    दमनक चतुर्दशी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    मराठीतील पहिले संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर

    टीम अवांतर

    मराठीतील पहिले संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म 31 मार्च 1843 रोजी धारवाड जिल्ह्यात गुर्लहोसूर गावी झाला. त्यांचे खरे नाव होते बळवंत पांडुरंग किर्लोस्कर. अण्णासाहेबांनी अगदी सुरुवातीला ‘अल्लाउद्दिनाची चितुडगडावरील स्वारी’  हे नाटक लिहावयास घेतले होते, मात्र ते अपुरेच राहिले. शिक्षक म्हणून कार्यरत असताना शांकरदिग्जय हे गद्य नाटक त्यांनी लिहिले.

    पुणे येथे एका पारशी नाटक मंडळीचे ऑपेराच्या धर्तीवरील एक नाटक त्यांच्या पाहण्यात आले. तसे नाटक मराठीत करून दाखवावे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातून त्यांनी कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतल या नाटकाचे भाषांतर केले. त्यामध्ये स्वतःची पदेही घातली आणि उत्तम नटसंच मिळवून ते रंगभूमीवर आणले. या नाटकास लाभलेले अपूर्व यश आणि लोकप्रियता पाहून पुढे त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीची स्थापना केली.

    हेही वाचा – आमचे आबा आणि त्यांची कुंभकर्णी झोप…

    त्यानंतर सुभद्राहरणावरील संगीत सौभद्र हे नाटक त्यांनी लिहिले. त्यांच्या सर्व नाटकांत हेच नाटक अधिक लोकप्रिय आहे.  सशक्त कथानक, अकृत्रिम संवाद, विलोभनीय व्यक्तिरेखा, प्रासादिक पदे या वैशिष्ट्यांमुळे या नाटकाचे आकर्षण मराठी प्रेक्षकांच्या मनात आजही टिकून आहे. अण्णासाहेब स्वतः उत्तम नट  आणि दिग्दर्शक होते. महाराष्ट्रात संगीत नाटकांचे नवे युग त्यांनी निर्माण केले. इतकेच नव्हे, तर उत्तम संगीत नाटके कशी असावीत, याचा आदर्श घालून दिला.

    अण्णासाहेबांनी काव्यरचनाही बरीच केली.  पौराणिक नाटक मंडळी आणि कीर्तनकार यांना त्यांनी आख्याने रचून दिली. याशिवाय, ते शीघ्रपणे कवने रचू शकत असत. त्यांच्या सर्व लेखनाचा संग्रह ‘समग्र किर्लोस्कर’  या नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. रामराज्यवियोग या अखेरच्या नाटकाचे तीन अंक लिहिल्यानंतर 2 नोव्हेंबर 1885 रोजी गुर्लहोसूर येथे त्यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस धावपळीचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. सुरुवातीला थोडा दबाव जाणवेल, पण तुम्ही तो सांभाळून घ्याल. तुमच्या मेहनतीची वरिष्ठांना दखल घ्यावी लागेल. आर्थिक बाबींबाबत सावधगिरी बाळगा, अनपेक्षित खर्च उद्भवू शकतो. घरात वाद होऊ शकतात. त्यामुळे शांत राहणेच उत्तम.

    वृषभ – आज गोष्टी हळूहळू पुढे सरकतील. घाई केल्यास गोष्टी बिघडू शकतात. पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळण्याची चिन्हे आहेत. ऑफिसमधील आपले काम वेळेवर पूर्ण करा. इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप करू नका. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. आज संयम तुमचा सर्वात मोठा आधार ठरेल.

    मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज नवीन लोकांशी संपर्क साधला जाईल, जे भविष्यात उपयुक्त ठरू शकते. तुमची मेहनत ऑफिसमध्ये दिसून येईल. काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. फक्त अनावश्यक खर्च टाळा. आरोग्य सामान्य राहील. तुम्ही मित्रांशी भेटण्याचे नियोजन कराल.

    कर्क – आज मन थोडे गोंधळलेले असू शकते. एकाच वेळी आज अनेक गोष्टींचा विचार कराल. कामाचा ताण असेल, पण  परिस्थिती हळूहळू निवळेल. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती पूर्वपदावर यईल. संध्याकाळपर्यंत मन हलके होईल. घरगुती बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कुटुंबाला वेळ द्या. आज कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा.

    सिंह – आज आत्मविश्वास वाढलेला असेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. कार्यालयात तुमच्या कामाबद्दल प्रशंसा होऊ शकते. लोक तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतील. सभोवतालच्या लोकांवर तुमचा प्रभाव दिसून येईल. खर्चात थोडी वाढ होऊ शकते. फक्त अत्यावश्यक वस्तूंवरच पैसे खर्च करा. नातेसंबंध चांगले राहतील. एकूणच, दिवस सकारात्मक असेल.

    कन्या – आज खूप काम असेल. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या येऊ शकतात. परिणामी, थकवा जाणवू शकतो, पण तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. तसेच, तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. व्यवसायात नवीन कराराच्या संधी समोर येतील, मात्र निर्णय शांतपणे, विचारपूर्वक घ्या.

    तुळ – आज नियोजन करून काम करणे महत्त्वाचे आहे. खूप घाई केल्यास नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून दबाव येईल, पण तुम्ही तो हाताळू शकाल. तुमच्या कल्पना वरिष्ठांना उपयुक्त ठरू शकतात; फक्त त्या योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी मांडा. आर्थिक व्यवहारांबाबत काळजी घ्या. उधार देणे किंवा घेणे टाळा. आहाराकडे लक्ष द्या.

    वृश्चिक – आजचा दिवस चांगला असेल. एका नवीन योजनेवर काम सुरू करू शकता. लोक तुमच्या कल्पनांचे कौतुक करतील. मित्र आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. खर्च थोडा वाढू शकतो, पण तो आवाक्यात असेल. आजचा दिवस सकारात्मक असेल. आरोग्याच्या समस्याही दूर होतील. तरीही बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळा.

    धनु – आजचा दिवस संतुलित असेल. कार्यालय आणि घरी दोन्ही ठिकाणी कामकाज सुरळीत चालेल. सहकाऱ्यांकडून आवश्यक ते सगळे सहकार्य मिळेल. नोकरीत प्रगतीची एक नवीन संधी निर्माण होऊ शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. भरपूर गप्पा, संभाषण यामुळे तुमच्यातील नाते अधिक घट्ट होईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

    हेही वाचा – न चुकलेली बस…

    मकर – आज थोडे सावध राहावे लागेल. अगदी लहानशा गोष्टीचेही वादात रूपांतर होऊ शकते. शांत राहण्याचा प्रयत्न करा. शब्द जपून वापरा. तुमचे लक्ष सहजपणे विचलित होऊ शकते. ते आज टाळण्याचा प्रयत्न करा. कामावर लक्ष केंद्रित करा. पैशांच्या बाबतीत कोणताही धोका पत्करणे टाळा. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती सामान्य होईल.

    कुंभ – आजचा दिवस चांगला असेल. कामात प्रगती दिसून येईल. नवीन संधी निर्माण होऊ शकतात, त्या ओळखणे महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास टिकून राहील. अवघड कामेसुद्धा सहजपणे पूर्ण करू शकाल. कुटुंबाकडून भक्कम पाठिंबा मिळेल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. त्यानिमित्ताने नव्या ओळखी होतील.

    मीन – आज कामाच्या ठिकाणी काहीतरी गोंधळ निर्माण होऊ शकतो. कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका. कामाच्या ठिकाणी संयम आवश्यक आहे. अन्यथा, प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतील. खर्च बेताने करा. आवश्यक तेवढाच खर्च करा. एकट्याने वेळ घालवणे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मार्च 2026

    March 30, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 29 मार्च ते 04 एप्रिल 2026

    March 29, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 29 मार्च 2026

    March 29, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 30, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 मार्च 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 09…

    साप्ताहिक राशीभविष्य : 29 मार्च ते 04 एप्रिल 2026

    March 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 29 मार्च 2026

    March 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मार्च 2026

    March 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    इंटरव्ह्यूसाठी नेहा ऑफिसमध्ये पोहोचली खरी…

    March 31, 2026

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    March 31, 2026

    ही वाट एकटीची…

    March 31, 2026

    Dnyaneshwari : जें काळकूटाचें सहोदर, जें मृत्युभेणें प्याले अमर…

    March 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 मार्च 2026

    March 31, 2026

    World Idli Day… इडलीकुमारीची कहाणी!

    March 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 253
    • अवांतर 180
    • आरोग्य 94
    • पंचांग आणि भविष्य 368
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 188
    • मैत्रीण 17
    • ललित 522
    • शैक्षणिक 74

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    इंटरव्ह्यूसाठी नेहा ऑफिसमध्ये पोहोचली खरी…

    March 31, 2026

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    March 31, 2026

    ही वाट एकटीची…

    March 31, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.