Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026

    March 19, 2026

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    March 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, March 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 19, 2026Updated:March 19, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 20 मार्च 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 29 फाल्गुन शके 1948; तिथि : द्वितीया 26:31; नक्षत्र : रेवती 26:27;
    • योग : ब्रह्मा 22:14; करण : बालव 15:44;
    • सूर्य : मीन; चंद्र : मीन 26:27; सूर्योदय : 06:44; सूर्यास्त : 18:48;
    • पक्ष : शुक्ल; मास : चैत्र; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    नाटककार, लेखक, कादंबरीकार वसंत कानेटकर

    टीम अवांतर

    लोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत वसंत शंकर कानेटकर यांचा जन्म 20 जानेवारी 1922 रोजी सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर या गावी झाला. प्रसिद्ध कवी शंकर केशव कानेटकर हे त्यांचे वडील. ते “गिरीश” या टोपणनावाने महाराष्ट्रात ओळखले जात आणि रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. वडिलांच्या आणि रविकिरण मंडळातील इतर कवी यांच्या सहवासातून वसंत कानेटकरांना साहित्यात रस निर्माण झाला.

    1946मध्ये कानेटकर नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या एच. पी. टी. आर्टस् कॉलेजमध्ये शिकवत असतानाच त्यांनी लघुकथा लेखक आणि कादंबरीकार म्हणून आपली लेखन कारकीर्द सुरू केली. 1950 ते 1957 याकाळात त्यांच्या घर, पंख आणि पोरका या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. 1957 मध्ये कानेटकरांनी आपले पहिले नाटक वेड्याचे घर उन्हात लिहिले. हे नाटक भालबा केळकर यांनी दिग्दर्शित केले, नाटकातील मध्यवर्ती भूमिका श्रीराम लागू यांनी निभावली होती. 1950च्या दशकात व्यावसायिक मराठी रंगभूमीचे पुनरुज्जीवन करण्याचे आणि पुढची चार दशके एकापाठोपाठ एक सरस आणि यशस्वी नाटके देऊन तिला समृद्ध करण्याचे श्रेयही मोठ्या प्रमाणात त्यांना जाते.

    हेही वाचा – एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापासून ते छत्रपती संभाजी राजेंच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रावर केलेली स्वारी या कालखंडावर आधारित पाच ऐतिहासिक नाटकांचे “नाट्यपंचक” त्यांनी साकारले. ही पाच नाटके म्हणजे – रायगडाला जेव्हां जागे येते, इथे ओशाळला मृत्यू, तुझा तू वाढवी राजा, आकाशमिठी आणि जिथे गवतास भाले फुटतात ही होत. संगीत नाटकातदेखील त्यांनी क्रांती घडवून आणली. कानेटकरांनी रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील पिता-पुत्राच्या संबंधांचे अंतरंग मांडले. हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले. या नाटकातील काशिनाथ घाणेकर यांची संभाजी महाराजांची भूमिका विशेष गाजली. कानेटकरांचे अश्रूंची झाली फुले हे नाटक त्यांचे सर्वांत यशस्वी नाटक. हिंदी चित्रपट अभिनेते आणि निर्माते अशोककुमार यांनी या नाटकावर आधारित आंसू बन गये फूल हा हिंदी चित्रपट बनविला. या चित्रपटासाठी कानेटकरांना सर्वोत्कृष्ट कथेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

    आपल्या 54 वर्षांच्या लेखन कारकीर्दीत त्यांनी 42 तीन अंकी नाटके, 4 कादंबर्‍या आणि अनेक एकांकिका, लघुकथा, चिंतनपर लेख, चित्रपट आणि टीव्ही मालिकांसाठी पटकथा लिहिल्या. त्यांची अनेक नाटके हिंदी आणि गुजराती भाषांमध्ये रूपांतरित झालेली आहेत. वसंत कानेटकर यांच्या कलाकृतींना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. संगीत नाटक अकादमीने रायगडाला जेव्हां जाग येते या नाटकाला “बेस्ट इंडियन प्ले” पुरस्काराने सन्मानित केले. या पुरस्काराचा भाग म्हणून या नाटकाचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले आणि आकाशवाणीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात प्रसारण झाले. हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या पदवीपूर्व कला अभ्यासक्रमातही सामील झाले आणि यामुळे अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून स्वत:चे नाटक शिकवण्याचा मान कानेटकरांना मिळाला. 1971मध्ये ते कुर्ला, मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 1984 साली त्यांना संगीत नाटक अकादमीने सर्व भारतीय भाषांमधील सर्वोत्कृष्ट नाटककार म्हणून गौरविले आहे. 1988 मध्ये ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गौरव (1990) आणि भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (1992). 30 जानेवारी 2001 रोजी नाशिक येथे वसंत कानेटकर यांचे निधन झाले.

     

    आजचे राशीभविष्य

    मेष – वाद, संघर्ष टाळा, अन्यथा मानसिक ताण वाढेल आणि तुमच्या आजारात भर पडेल. नातेवाईक तुमच्या उदार स्वभावाचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. म्हणून सतर्क राहा. अल्पसे अडथळे येतील, परंतु दिवसभरात बऱ्यापैकी यश मिळवाल, असे दिसते. असंतुष्ट सहकाऱ्यांकडे लक्ष द्या, त्याशिवाय तुमच्या कामाला गती मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी केवळ खेळ एके खेळ असे न करता शिक्षणाकडेही लक्ष द्यावे.

    वृषभ – आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. त्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. घरातील कार्यामुळे खर्चात वाढ होऊ शकते. तसेच, कोणाला पैसे उधार देताना, विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यग्र दिनचर्येचा असतानाही आज तुम्हाला स्वत:साठी वेळ काढावा लागेल.

    मिथुन – नोकरीच्या ठिकाणी संयम बाळगा, निरंतर प्रामाणिक प्रयत्नांमुळे हमखास यशप्राप्ती होणार आहे. धनलाभामुळे अनेक आर्थिक प्रश्न सुटू शकतील. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. व्यवसाय अधिक विस्तारण्यासाठी कल्पकतेवर भर द्या. कौशल्य विकसित करण्याकडेही लक्ष द्या. बोलताना जीभेवर ताबा ठेवा, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते.

    कर्क – विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. त्यामुळे यापुढे गुंतवणूक करताना कमी जोखीम आणि चांगला परतावा लक्षात घेऊनच निर्णय घ्या. स्वत:ची प्रशंसा करण्यात वेळ घालवू नका, त्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण असेल, पण वरिष्ठांसह सहकाऱ्यांचीगी मदत होईल

    सिंह – तुमच्या भावनांवर, खासकरून रागावर नियंत्रण ठेवा. प्रयत्न आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे वरिष्ठांची मर्जी राहील. तसेच कुटुंबीयही तुमचे कौतुक करतील. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. व्यावसायिक भागीदार आणि तुमच्यात काही गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने एखादा प्रकल्प रखडू शकतो.

    कन्या – तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे, अशा व्यक्तीची ओळख, मित्रामुळे होऊ शकते. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. कामच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात, त्यासाठी कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल.

    तुळ – तुमचा उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत माघू शकतात आणि त्यांना मदत केल्यावर तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकतात; तथापि, स्थिती लवकरच सुधारेल. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे.

    वृश्चिक – नोकरी आणि व्यवसायात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना वादग्रस्त मुद्दे टाळा. तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरतात परंतु, आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल.

    धनु – कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. बऱ्याच काळापासून वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशीर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. कौटुंबिक स्नेह मेळाव्यात मानमरातब मिळेल. ऑफिसच्या बऱ्याच समस्या तुम्हाला त्रास देत राहतील, पण वरिष्ठांचे पाठबळ मिळेल.

    हेही वाचा – त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    मकर – तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचारांच्या आणि पाठिंबा देणाऱ्या मित्रांबरोबर राहा. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तब्येतीची काळजी घ्या. बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळा, पथ्यपाणी सांभाळा.

    कुंभ – रम्य भटकंती, मेजवान्या यामुळे तुमचा मूड चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांना बचतीचे महत्त्व पटवून द्यावे लागेल, तेव्हा खर्चावर नियंत्रण येऊ शकते. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे अवतीभवतीची लोक प्रभावित होतील. पण त्याचवेळी भावनिक अडथळे निर्माण करू शकतात. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.

    मीन – आपल्यासाठी काय चांगले आहे, हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे; त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन देतील, पण अशा लोकांकडून काम होण्याची अपेक्षा ठेवू नका.


     

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मार्च 2026

    March 18, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 18, 2026

    गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 मार्च 2026;…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026

    March 19, 2026

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    March 19, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 241
    • अवांतर 171
    • आरोग्य 89
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 182
    • मैत्रीण 16
    • ललित 501
    • वास्तू आणि वेध 355
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn