Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 11 फेब्रुवारी 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 11 फेब्रुवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 11, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 11 फेब्रुवारी 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 22 माघ शके 1947; तिथि : नवमी 09:58; नक्षत्र : अनुराधा 10:51
    • योग : व्याघात 26:28; करण : वणिज 23:11
    • सूर्य : मकर; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 07:10; सूर्यास्त : 18:35
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    श्री रामदास नवमी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – नोकरी-व्यवसायात दिवस सामान्य राहील. स्वतःची तुलना इतरांशी करणे टाळा. नेटवर्किंग किंवा जुन्या मित्रांच्या मदतीने नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. यश मिळविण्यासाठी घोकंपट्टी करण्याऐवजी सखोल शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. कौटुंबिक वातावरण शांत आणि सौहार्दपूर्ण राहील. तब्येतीच्या कुरबुरी राहतील.

    वृषभ – घाईघाईने वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करण्याऐवजी तुम्ही काळजीपूर्वक नियोजन करून खरेदी केली पाहिजे. आज स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण राहील, मात्र सहकाऱ्यांची मदत मिळेल. सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

    मिथुन – कामाच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मेहनतीची आणि प्रयत्नांची प्रशंसा करतील. आज एखाद्या व्यवहारातून मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्या वाढतील, त्याबरोबरीने तुमचा आत्मविश्वासही वाढेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रलोभनांना भुलू नका.

    कर्क – एखाद्या साहसी निर्णयासाठी स्वतःला तयार करा. सकारात्मक उर्जेची लाट आज तुमच्यामध्ये बघायला मिळणार आहे. कौटुंबिक जीवनात तुमचे जोडीदाराशी संबंध मजबूत होतील. प्रवास करताना किंवा गाडी चालवताना बरोबरच्या सामग्रीची तसेच स्वतःची काळजी घेतली पाहिजे.

    सिंह – घाईघाईने कोणताही चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही याची काळजी घ्या. जीवनात संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आयुष्यात एक स्थिरता मिळेल. आज तुमच्यासारख्याच ज्ञानाची इच्छा असलेल्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित होऊ शकता. तथापि, शब्द जपून वापरा, अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते.

    कन्या – अनोळखी व्यक्तींमध्ये नाती शोधण्यापूर्वी आधी स्वतःच्या नेमक्या गरजा समजून घेणे महत्वाचे आहे. स्वतः:ची एक जीवनशैली विकसित करा, जी अंगीकारल्याने तुम्हाला आनंद वाटेल, मग ती छंद शिकून असो, मित्रांसोबत राहून असो किंवा नवीन गोष्टी एक्सप्लोर करून असो. नोकरी-व्यवसायात दुसऱ्यावर विसंबून राहू नका.

    तुळ – खचून न जाता अडचणींना अतिशय सकारात्मकतेने तोंड द्यावे. खूप छानछोकी नसली तरी आपले आयुष्य सुखी असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणूनच लहान लहान गोष्टींमध्ये तुम्ही आनंद शोधता, त्याचा आज खूप उपयोग होईल. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी झालेले संभाषण भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

    हेही वाचा – Bookshelf : वलय… सर्वच कथा सशक्त

    वृश्चिक – अनपेक्षितपणे अशा काही घटना घडतील, ज्यामुळे तुमचे आयुष्य आमूलाग्र बदलून जाणार आहे. आज घडणाऱ्या घटना स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करा. सकारात्मक विचारांमुळे तुम्हाला हव्या त्या गोष्टी घडण्याची शक्यता निर्माण होईल. आर्थिक स्थितीही सुधारेल, पण खर्चावर देखील नियंत्रण ठेवा.

    धनु – आज नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. सहकाऱ्यांमधले कोणतेही मतभेद किंवा गैरसमज समंजसपणे हाताळा. अन्यथा, मोठे प्रश्न निर्माण होईल. आज भागीदाराच्या बोलण्याकडे  बारकाईने लक्ष द्या आणि विचार व्यक्त केल्यावर त्यांना समजूतदारपणे प्रतिसाद द्या. तब्येतीची काळजी घ्या.

    मकर – घरच्यांशी असणारे मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याऐवजी, सारासार विचार करूनच पावले उचला. इतरांच्या अपेक्षांच्या दबावाखाली न येता स्वतःला नेमके काय हवे आहे, याचा विचार करून कृती करा. स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे.

    कुंभ – तुम्ही आनंदी असता तेव्हा भोवतालच्या लोकांना तुम्ही अधिक आवडता. आज आनंदी राहण्यासाठी अनेक कारणे मिळतील. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने नवीन लोकांच्या ओळखी होतील. या भेटी भविष्यातील अनेक योजनांसाठी फायदेशीर ठरतील. वाहन चालवताना वेगमर्यादा पाळा.

    मीन – आज रोजच्या चौकटीबाहेर जगण्याची प्रबळ इच्छा होईल. व्यवहारी जगात हे फारसे शक्य होणार नाही. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि कौतुक होईल. नवीन जबाबदारी सोपविली जाण्याचीही शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.


    दिनविशेष

    स्त्रीवादी लेखिका गौरी देशपांडे

    टीम अवांतर

    कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांश सगळे साहित्यप्रकार समर्थपणे हाताळणाऱ्या गौरी देशपांडे यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1942 रोजी झाला. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी – मराठी आणि मराठी – इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले. गौरी देशपांडे यांच्या आई लेखिका, संशोधक इरावती कर्वे तर दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील होते. इंग्रजी आणि मराठीतील लेखिका जाई निंबकर या त्यांच्या थोरल्या भगिनी. समाजसुधारक आणि स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील आणि गौरी देशपांडे यांचे आजोबा होते. तर ’समाजस्वास्थ्य’ या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे त्यांचे काका होते.

    हेही वाचा – आई… रक्ताच्या नात्यापलीकडचे प्रेम!

    सन 1968 साली प्रकाशित झालेला ‘Between Births’ हा काव्यसंग्रह हे त्यांचे पहिले पुस्तक होते. गौरी देशपांडे यांच्या लेखनात मुक्त विचारांचे प्रतिबिंब अगदी स्पष्टपणे दिसते. त्यांचे लेखन स्त्रीवादी असण्यापलीकडे जाऊन स्वातंत्र्यवादी, व्यक्तिवादी आहे. वेगवेगळ्या पातळीवरचे प्रेम, त्या प्रेमाची मोजावी लागणारी किंमत आणि त्या प्रेमाच्या मर्यादा याबद्दलचे विचार त्यांच्या लेखनात दिसतात. लेखणीच्या ’धीट’पणामुळे त्या विशेष गाजल्या. दिवाळी अंकांमधून त्यांनी लिहिलेल्या काही छोटेखानी ‘लोक’कथाही लक्षणीय आहेत.

    गौरी देशपांडे यांच्या साहित्याबद्दल जी चर्चा झाली, ती प्रामुख्याने त्यांनी रंगवलेल्या देशीविदेशी प्रियकरांबद्दल आणि नायिकेच्या शरीरसंबंधांबद्दल. गौरी देशपांडे यांच्या लेखनात या संबंधांबद्दल धीट भाष्य आहे. या धीटपणामुळे त्यांच्यावर ‘बंडखोर लेखिका’ हा शिक्का मारला गेला. या सगळ्या वर्णनातून त्यांनी स्त्रियांच्या मानसिक आंदोलनांबद्दल आणि त्यांच्या लैंगिकतेबद्दल जे भाष्य केले आहे, त्याकडे मात्र दुर्लक्ष झाले. अशा या स्त्रीवादी लेखिकेचे 1 मार्च 2003 रोजी निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    April 8, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 10, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 एप्रिल 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 20…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    April 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 एप्रिल 2026

    April 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…

    April 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 263
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 379
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 545
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026
    Most Popular

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.