Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 25 मार्च 2026

    March 25, 2026

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : कारल्याची भाजी, मसालेदार भाज्या, मिरचीचा ठेचा बनविताना…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : कारल्याची भाजी, मसालेदार भाज्या, मिरचीचा ठेचा बनविताना…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 19, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मी मराठी, अभिजात मराठी, कारल्याची भाजी, मसालेदार भाज्या, कोशिंबीर, मिरचीचा ठेचा, टोमॅटोचा चोथा, जुने लोणचे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये कारल्याची भाजी, मसालेदार भाज्या, कोशिंबीर, मिरचीचा ठेचा करताना या टिप्स वापरून पाहा.

    • टोमॅटो सॉस किंवा सूप केल्यावर आपण टोमॅटोचा रस गाळून घेतो. त्या वेळी गाळणीच्या वर राहिलेला टोमॅटोचा चोथा फेकून न देता त्याचा असा उपयोग करता येईल – चमचाभर तेलावर थोडा कांदा लाल होईतो परतून त्यात चमचाभर लसूण-आल्याची पेस्ट आणि थोडे मीठ टाकावे. नंतर त्यात वरील चोथा टाकून चांगले परतावे. हे मिश्रण पिझ्झावर पसरायला, ब्रेडवर पसरायला किंवा भाजीचा रस्सा दाट आणि लाल करण्यासाठी उपयोगी पडेल.
    • या दिवसांत आंब्याचं लोणचं जुने झालेलं असते. तर त्याच्या खारात (दोन टेबल स्पून, पाव किलो कारल्यासाठी) धणे पूड, कोथिंबीर, एक चमचा गरम मसाला घालून हे सारण कारल्यात भरून फोडणीस टाकावं. झाकणावर पाणी ठेवून शिजवावं तसेच शेवटी भरपूर गूळ घालावा आणि उतरवावं. असा उरलेल्या खाराचा उपयोग खूप छान होतो आणि भाजी अजिबात कडू होत नाही.

    हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना…

    • मसाल्याच्या भाज्या (जसे वांगी, छोले, आलू, मटार) रसरशीत आणि खमंग लागण्याकरिता एक किंवा छोटी दोन वांगी वाफवून कुस्करून फोडणीत टाकावीत. भाज्या मसालेदार दिसतात, रंग छान येतो आणि तेल संपूर्ण वर येते.
    • कुठलीही कोशिंबीर असो, ती जास्त वेळ टिकून राहण्यासाठी कोशिंबिरीत पोह्याचा थोडा चुरा किंवा पोहे टाकावेत. कोशिंबिरीला पाणी न सुटता ती जास्त वेळ टिकते आणि अजिबात वास येत नाही, कुठलाही कार्यक्रम, विशेषतः आता लग्नप्रसंगी विशेष उपयुक्त आहे.
    • वांग्याचे भरीत करावयाचे असेल, तर वांगी भाजून घेतल्यावर श्रीखंडाच्या यंत्रातून काढून घ्यावे म्हणजे त्यात रेषा मुळीच राहत नाही. यामुळे खाताना छान वाटते.
    • जुने मिरचीचे लोणचे काही दिवसांनंतर चवीमध्ये बदलते. अशा वेळी त्या मिरच्या लागेल तेव्हा थोड्याशा तळून घ्याव्यात. खमंग लागतात, भेळ-मिसळीबरोबर चांगल्या लागतात.

    हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स

    • काकडी चोचविण्यासाठी खमंग काकडी किंवा काकडीच्या कोशिंबिरीसाठी काकडीचे तुकडे मिक्सरमध्ये फिरवावेत. एकदा चमच्याने फिरवून (खाली-वर करून) पुन्हा मिक्सर चालू करावा. झटपट सुंदर काम होते. (मिक्सरचे लहान किंवा मोठे भांडे चालू शकते) मुळा आणि गाजराच्या कोशिंबिरीसाठीही असाच उपयोग वेळ आणि कष्ट वाचवितो.
    • हिरव्या मिरच्या ताज्या बघितल्या की, मराठी माणसाला मिरचीचा खर्डा/ठेचा आठवतो. पण बऱ्याचशा लोकांना तो तिखटपणामुळे खाता येत नाही. अशा वेळी ठेचा करताना हिरव्या मिरच्या थोड्याशा घेऊन बाकीच्या कोवळ्या गवारीच्या शेंगा घ्याव्यात आणि तेलावर परतून मीठ-लसूण घालून ठेचा केल्यास तिखटपणा कमी होऊन भरपूर खाता येईल.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026 फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    By Team AvaantarMarch 24, 2026

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही…

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 25 मार्च 2026

    March 25, 2026

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 509
    • वास्तू आणि वेध 361
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn