नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
आज थोडा वेगळा विषय बरं का… फ्लर्टिंग (Flirting)! एक तो काळ होता, जेव्हा मुलगा मुलीशी बोलण्यासाठी, ओळख काढण्याकरिता ‘टिपिकल’ वाक्य बोलायचा… ‘लगता हैं हम पहले भी कभी मिले हैं…’ आणि तिथून संवाद सुरू व्हायचा… त्यातूनच मुले-मुली प्रेमात पडायचे किंवा वेगळे पण व्हायचे.
हा प्रकार माझ्या बाबतीत बरेचदा घडलाय. ‘यार, तू आधी भेटायला हवी होतीस. तुला पळवून नेलं असतं…’ मग मी किती वात्रट… “बरं झालं वाचले मी,” असे म्हणून तिथेच विषय बंद करायचे. एकदा तर एकाने कहरच केला, म्हणे, “तू थोडी उशिराने जन्म घ्यायला हवा होतास, आणि मी लवकर. म्हणजे मग मी तुझ्याशीच लग्न केलं असतं.” मी हसले. म्हटलं शांत राहूया. उगीच माझी सटकली तर राडे व्हायचे. पण तो धीट! म्हणतो कसा, “निदान माझ्या बाबांनी तरी तुला शोधून तुझ्याशी लग्न करायचं होतं. मी हँडसम तरी झालो असतो. तुझ्या मुलासारखा.” कप्पाळ! कपाळालाच हात लावला…
हेही वाचा – माझ्या सेकंड इनिंगचा कौतुक सोहळा!
अजून एक माझा आवडता कलाकार. वास्तविक, तो 3-4 वर्षांचा असताना मी त्याला भेटले होते, एका सेटवर. मी तेव्हा मी साधारण 17-18 वर्षांची असेन आणि आता तो वयाने, नावाने मोठा झाल्यावर आम्ही दोघांनी एका सिनेमात काम केलं. सिनेमाच्या पत्रकार परिषदेच्या वेळी हा बाबा म्हणतो कसा, “हर्षा तू किती उशिराने भेटलीस गं! खूप आधी भेटायला हवी होतीस.” मी टेन्शनमध्ये. ना त्याच्यावर ओरडू शकत होते, ना लागट बोलू शकत होते. मला जरा राग यायला लागला होता… तेवढ्यात तो म्हणाला की, “तू आसपास असलीस ना की, खूप छान वाटतं. Motherly feeling येतं. सेटवर तुझं सगळ्यांशी वागणं, काळजी घेणं, कोणाला काही हवं नको विचारणं. आई आसपास असल्यासारखं वाटतं.” हुश्श… जीव भांड्यात पडला!
हेही वाचा – हिंदी सीरियलची ऑडिशन अन्…
सगळे पुरुष फ्लर्ट नाही करत. प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात. त्या भावना मांडायची पद्धत सुद्धा वेगळी असते.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


