Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘एम टी आयवा मारू’… समुद्रावरच्या जगाची कादंबरी

    October 11, 2026

    नवरात्री… आत्मिक शक्ती जागृत करण्याचे पर्व

    October 11, 2026

    संसार से भागे फिरते हो…

    October 11, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, October 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : ‘एम टी आयवा मारू’… समुद्रावरच्या जगाची कादंबरी
    ललित

    Bookshelf : ‘एम टी आयवा मारू’… समुद्रावरच्या जगाची कादंबरी

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारOctober 11, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, अस्मिता हवालदार, डॉ अस्मिता हवालदार, Bookshelf, लेखक अनंत सामंत, एम टी आयवा मारू, समुद्रावरच्या जगाची कादंबरी, नायिका उज्ज्वला, प्रामाणिक उज्ज्वला, उज्ज्वलाचा संघर्ष, अनंत सामंत आणि उज्ज्वला जीर्ण बोट आयवा मारू, कॅप्टन रॉस
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अनंत सामंत यांची ‘एम टी आयवा मारू’ कादंबरी मोठ्या तेलवाहू जहाजावरच्या जीवनाची कहाणी आहे… हे जग तसे अपरिचित असते. ही कादंबरी खूप गाजली, तिच्या आत्तापर्यंत सात आवृत्या निघाल्या आहेत. प्रस्तावनेत लेखक म्हणतात की, ‘’कोणीही छापणार नाही म्हणून अडगळीत टाकून दिली होती. नंतर तिला दिग्गजांनी गौरवले. ही कहाणी भिन्न राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध व्यक्तिरेखांच्या प्रतिक्रियांतून घडणारे शब्दशिल्प झालं. मानव आणि पंचमहाभूतांच्या एकरूपतेची आणि मानवी संस्कृतीमधील भिन्नतेमुळे उत्पन्न होणाऱ्या अपरिहार्य संघर्षाची कहाणी झाली.’’

    एम टी म्हणजे मोटर टँकर, मारू म्हणजे जहाज, आयवा म्हणजे प्रेम आणि एकरूपता… यांच्या भावूक चेतनेचे जहाज. कादंबरी दैनंदिनीच्या रुपात आहे. निवेदकाने दैनंदिनी लिहिली आहे. 1 डिसेंबर 1975, हाँगकाँग अशी पहिली नोंद आहे. वीस वर्षांचे लेखक परीक्षेसाठी एकटे राहत आहेत. पैशांची चणचण आहे. परीक्षा देऊन झाल्यावर निकालाची वाट पाहत आहेत, त्यावेळी एम टी आयवा मारू बोटीवरची नोकरी चालून येते. ही बोट जुनी गंजलेली ब्लॅकलिस्टेड एम टी ओरायन बोट आहे कळल्यावर त्याला राग येतो, पण तो नोकरी सोडून जात नाही. कॅप्टन रॉस, शोमीर सेनगुप्ता, दीपक उपाध्याय, डालिझे, बोसन, पिट, उज्ज्वला, अॅना, अॅडम्स अशी काही पात्रे यात येतात. वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी भाषा बोलणारी ही मंडळी बोटीवर एकत्र राहत आहेत. कॅप्टन रॉस बोटीचा जीर्णोद्धार करायचा निर्धार जाहीर करतो आणि सगळेच झटून कामाला लागतात. दीपकचे इंजिनीअरिंगचे कौशल्य कौतुकास्पद असते. त्यामुळे त्याच्या पत्नीला, उज्ज्वलाला बोटीवर आणण्याचा हट्ट मान्य होतो. खलाशी जहाजाला स्त्री मानत असल्यामुळे त्यावर दुसरी स्त्री आली तर संकट येते, अशी धारणा आहे. त्यामुळे साधारणत: कोणाला अशी परवानगी मिळत नाही. लेखक इथे पुढच्या कथानकाचे सूतोवाच करतो.

    समुद्रात असलेली आव्हाने कथेच्या ओघात येतात. वेगात जाणारे जहाज दुसऱ्या जहाजाला टक्कर देते, हा प्रसंग वाचताना उत्सुकता वाटू लागते. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असल्यामुळे प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असते आणि ती प्रत्येकाच्या स्वभावाला अनुसरून होती. सेनगुप्ताचा चटका लावणारा मृत्यू आणि समुद्रातले अंत्यसंस्कार, तो पाहायला आलेले बोटीवरचे खलाशी… हा प्रसंग सांगताना लेखक खलाशांची पुनर्जन्म आणि मृत्यूबद्दलची मते सांगतो. मृत्युनंतर खलाशी पांढरा सीगल पक्षी होतात, या श्रद्धेचा उल्लेख लेखकाने वेगवेगळ्या प्रसंगात केला आहे. त्यावेळी उज्ज्वला त्याला एक प्रखर सत्य सांगते, जे खरे असूनही तो ऐकू शकत नाही.

    हेही वाचा – Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    दीपकची पत्नी असलेली उज्ज्वला हळूहळू लेखकाकडे आकर्षित होते आणि तोही तिच्याकडे. दीपकचे तिच्याबरोबरचे विचित्र वागणे याला जबाबदार असते. ती साधीसुधी खेडवळ आणि सुंदर मुलगी बोटीवर येते, तेव्हा वेगळ्याच कल्पना घेऊन येते. दुष्ट गलिच्छ जगापासून निळ्या आकाशाखालचं इवलंसं जग आणि त्यात सागर पार करण्याच्या जिद्दीने एकत्र आलेली माणसे… पण वास्तव याच्या उलट असतं.

    दीपकला तिला मॉर्डन करायचं असल्याने तिच्या मनाविरुद्ध वागायला लावतो… तिची घुसमट होते. पण त्यानंतर ती बदलते. त्याला हवी तशी वागू लागते आणि नंतर त्याही पुढे जाते.

    उज्ज्वला, निवेदक आणि आयवा मारू ही तीन मुख्य पात्रे आहेत. निवेदक अनंत सामंत ज्यांना बोटीवर सेकंड म्हणतात, ते नायक आहेत. उज्ज्वला आणि आयवा मारू या दोघी  नायिका आहेत. दोघींच्या भोवती कथा विणली आहे. नायकाची अॅना बसिलीनो नावाची प्रेयसी आहे. लेखकाने ज्या काळात ही कादंबरी लिहिली, तेव्हा ती काळाच्या बरीच पुढची होती. आताच्या काळात ती सहज मान्य होण्यासारखी आहे. श्रृंगारिक वर्णने उघडपणे, ठळकपणे आणि विस्तृत लिहिली आहेत. मराठीत असे लेखन तेव्हा फारसे नव्हते.

    उज्ज्वलाचे वर्णन असे असले, तरीही तिच्याबद्दल मनात करुणा दाटून येते. तिच्यावर अगदी लहानपणीच विपरित परिस्थिती कोसळलेली असताना, ती उन्मळून जात नाही, तर सामोरी जाते… लढा देते. भविष्य घडवायचा प्रयत्न करते. नवऱ्याचा, दीपकचा दुराग्रह सहन करते. कधी शरण जाते, कधी विरोध करते… पण परिस्थितीशी, नशिबाशी झगडत राहते. ती तिच्या शारीरिक भावना मान्य करते, व्यक्त करते आणि नायकाला त्याच्या ढोंगीपणा, घाबरटपणाबद्दल सुनावते. हे पात्र फार ताकदीने निर्माण केले आहे. उज्ज्वला प्रामाणिक आहे, स्वतःशी सुद्धा! हे पात्र नैतिकतेची बंधने तोडून वागणारे असले तरी भडक वाटत नाही. लेखकाने एका मुलाखतीत उज्ज्वलाची तुलना जुन्या नग्न शिल्पांशी केली आहे. तिच्याबद्दल नकारात्मक भावना न वाटता करुणा दाटून येते.

    आयवा मारू बोट जुनी गंजकी मोडीत निघालेली असताना कॅप्टन रॉस जिद्दीने वापरात आणतो. तिला सजवायचा, नव्यासारखी करायचा आग्रह धरतो. बोट तिच्या जर्जर पार्ट्स बरोबर समुद्राशी,वा दळांशी झुंजत पाणी कापत पुढे जात राहते. बोटीवरच्या प्रत्येकाशी तिचे वेगळे नाते आहे. ती जुनी झालेली असूनही खलाशांच्या मनात तिचे आकर्षण आहे.

    उज्ज्वला आणि आयवा मारू या दोघी स्त्रिया एकमेकींसारख्या आहेत किंवा उज्ज्वला जणू आयवा मारूचे मानवी रूप! दोघीही देखण्या, आकर्षक. त्यांच्यावर हक्क गाजवणाऱ्या माणसाच्या हट्टाच्या, दुराग्रहाच्या बळी ठरतात. दोघींचा प्रवास एकसारखा होत राहतो आणि शेवटसुद्धा. निवेदकाने रंगवलेल्या स्त्रीच्या चित्रात त्याला तीन स्त्रिया दिसतात आणि चौथी स्त्री रॉस दाखवून देतो. या प्रतीकाचाही समर्पक वापर केला आहे.

    हेही वाचा – Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    समुद्री वादळाचे चित्तथरारक वर्णन केले आहे. चाळीस ते साठ फूट उंच लाटा समुद्रात उठतात आणि एवढ्या प्रचंड बोटीला व्यापून टाकतात. साक्षात मृत्यूचे तांडव सुरू असते. वादळाचे नाव अॅना आणि नायकाच्या प्रेयसीचे नावही अॅना… दोन्ही अॅनात साम्य आहे!

    कादंबरीत लेखकाने अर्थपूर्ण संवाद पात्रांच्या तोंडी घातले आहेत. जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे, अर्थ उलगडून दाखवणारे संवाद… सागरात राहिल्यावर जमिनीवरच्या लोकांचा संपर्क सहन करू न शकणारे, रंगेल,पैसे उधळणारे, अविश्रांत काम करणारे, घरापासून महिनो-महिने दूर राहणारे खलाशी या वेगळ्याच विश्वाशी ओळख होते. आपणही आयवा मारूवर समुद्र सफर करत असतो.

    अपरिचित तरीही उत्सुकता वाटणाऱ्या समुद्रावरच्या जगाची ही कादंबरी वाचणे हाच एक अनुभव आहे. वाचल्यावर प्रत्येकाची प्रतिक्रिया भिन्न असेल. मला आवडली असली तरी, सर्वांना आवडेलच असे नाही. पण अनोखा अनुभव नक्की मिळेल.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    सहवास

    October 10, 2026 ललित

    बाई बाई… बाईपण

    October 10, 2026 ललित

    सप्तधान्य अन् घटस्थापना

    October 10, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सहवास

    By प्रदीप केळुस्करOctober 10, 2026

    मी सुमन मावशीच्या प्लॅटमध्ये बसलो होतो. ऑर्थोपेडिक सर्जनकडे मावशीला न्यायचे होते. तिच्या गुडघ्याचे ऑपरेशन करावे…

    बाई बाई… बाईपण

    October 10, 2026

    सप्तधान्य अन् घटस्थापना

    October 10, 2026

    शर्वाय-आराध्याबाबत आनंदी अनभिज्ञच!

    October 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘एम टी आयवा मारू’… समुद्रावरच्या जगाची कादंबरी

    October 11, 2026

    नवरात्री… आत्मिक शक्ती जागृत करण्याचे पर्व

    October 11, 2026

    संसार से भागे फिरते हो…

    October 11, 2026

    Homeopathy : भयावह ॲलोपॅथी उपचारपद्धती आणि हॅनिमन

    October 11, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 11 ते 17 ऑक्टोबर 2026

    October 11, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तेवींचि आक्रोशबळें, व्यापारे कोणे एके वेळे

    October 11, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 466
    • अवांतर 217
    • आरोग्य 158
    • पंचांग आणि भविष्य 624
    • फिल्मी 72
    • फूड काॅर्नर 258
    • मैत्रीण 30
    • ललित 986
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : ‘एम टी आयवा मारू’… समुद्रावरच्या जगाची कादंबरी

    October 11, 2026

    नवरात्री… आत्मिक शक्ती जागृत करण्याचे पर्व

    October 11, 2026

    संसार से भागे फिरते हो…

    October 11, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.