Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा

    March 21, 2026

    Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ…

    March 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, March 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…
    फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 21, 2026Updated:March 21, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मी मराठी, अभिजात मराठी, लज्जतदार पुलाव, लज्जतदार व्हेज पुलाव, बासमती व्हेज पुलाव, स्तरांचा व्हेज पुलाव, व्हेज लेअर पुलाव, व्हेज पुलाव, टेस्टी व्हेज पुलाव, व्हेज पुलाव विथ लेअर,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    साहित्य

    • जुने बासमती अगर बारीक लांब तांदूळ – चार वाट्या
    • फरसबी – पाव वाटी तुकडे
    • गाजर –  पाव वाटी तुकडे
    • फ्लॉवर – पाव वाटी तुकडे
    • बटाटे – पाव वाटी तुकडे
    • मटार – दाणे पाव वाटी
    • मिरे – 10-12
    • एक इंच लांबीचे दालचिनीचे तुकडे – 2-3
    • जिरे – 1 टीस्पून
    • शहाजिरे – 1 टीस्पून
    • धणे – 1 टीस्पून
    • तमालपत्र – 5-6 पाने
    • लवंगा – 4-5,
    • बडीशेप – 1 टीस्पून
    • जायफळ – 1
    • वेलदोडे – 5-6
    • बेदाणा – अर्धी वाटी
    • बदाम – 10-15
    • काजू – 10-15
    • कांदे – 2
    • सायीचे दही – एक वाटी
    • केशर –  1 ग्रॅम
    • खाण्याचा सोडा – पाव चमचा
    • कणीक – दोन वाट्या
    • मावा – 200 ग्रॅम
    • मीठ – चवीनुसार
    • साखर – चवीनुसार
    • मैदा – 2 चमचे
    • आल्याचा रस – दीड चमचा
    • पाणी – सात वाट्या (अंदाजे)
    • तूप – एक वाटी

    हेही वाचा – Recipe : ओल्या हरभऱ्याची पोळी अन् मुळ्याची पोळी

    कृती

    1. तांदूळ एक तास आधी धुऊन ठेवावेत.
    2. जिरे, शहाजिरे, बडीशेप आणि धणे भाजून पूड करून ठेवावी.
    3. लवंगा, मिरे आणि दालचिनीचे तुकडे हे जिन्नस अर्धी चमचाभर तुपात परतून त्यांची जाडसर पूड करावी.
    4. भाज्यांना दोन चमचे दही आणि चिमूटभर सोडा लावून 15 मिनिटे ठेवाव्यात.
    5. कांदा उभा चिरून, काजू आणि बदाम (सोलून) तुपात तळून घ्यावेत.
    6. त्याच तुपात तमालपत्र टाकून, त्यावर तांदूळ परतावेत आणि अर्धवट भात करून घ्यावा.
    7. या भातावर मीठ, साखर, उरलेले दही, सोडा, आल्याचा रस आणि वरील कुटलेल्या सर्व मसाल्याच्या पूड, उरलेले मिरे हे सर्व घालून, भात सारखा करून घ्यावा.
    8. दुसऱ्या एका पातेल्यात दोन-तीन चमचे तूप घालून, वरील भातापैकी निम्म्या भाताचा थर घालून, त्यावर सर्व भाज्या पसराव्या.
    9. राहिलेल्या भातापैकी पुन्हा निम्म्या भाताचा थर पहिल्या थरावर घालून, त्यावर बेदाणा, जायफळाची भरड पूड, बदाम (सोललेले), काजू आणि तळलेला कांदा पसरावे. त्यावर राहिलेला भाताचा थर घालावा.
    10. नंतर उलथन्याच्या टोकाने पाच-सहा ठिकाणी तळापर्यंत भातात भोके पाडावीत. प्रत्येक भोकावर केशराच्या काड्या आणि उरलेले तूप घालावे.
    11. नंतर त्या पातेल्याच्या तोंडावर बरोबर बसेल, असे झाकण अथवा जाड तवा ठेवावा.
    12. पातेले आणि झाकण यांच्या जोडावर भिजलेली कणीक लावून सर्व बाजूंनी तोंड बंद करावे.
    13. नंतर ते पातेले मंद विस्तवावर ठेवून, वरही मंद निखारे ठेवून 15 मिनिटे ठेवावे.
    14. मावा आणि मैदा मिसळून, चांगले मळून त्याचे लहान सुपारीएवढे गोळे तयार करावेत आणि तुपात बदामी रंगावर तळून घ्यावेत.
    15. भात तयार झाल्यावर वाढावयाच्या वेळी भातात उभे उलथने किंवा झारा घालून पुलाव काढून घ्यावा, म्हणजे त्यातल्या भाज्या आणि मसाला यामुळे निरनिराळ्या रंगांचा भात आकर्षक दिसेल.
    16. हा पुलाव वाढताना त्यावर माव्याचे गोळे पसरून वाढावे.

    हेही वाचा – Recipe : अशी वरी तांदळाची खिचडी करून पाहिली आहे का?

    (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)


    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर,

    avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा.

    या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


     

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    By Team AvaantarMarch 19, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना… रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा…

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा

    March 21, 2026

    Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ…

    March 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 मार्च 2026

    March 21, 2026

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    March 21, 2026

    आराध्याला सापडलेल्या बॉक्समध्ये काय गूढ होतं?

    March 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 243
    • अवांतर 172
    • आरोग्य 90
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 183
    • मैत्रीण 16
    • ललित 504
    • वास्तू आणि वेध 356
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn