Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    Team AvaantarBy Team AvaantarApril 10, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय दहावा

    यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥41॥

    जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया असती ठाया । ते ते जाण धनंजया । विभूती माझी ॥307॥

    अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन । विष्टभ्याहमिदं कृत्स्‍नमेकांशेन स्थितो जगत् ॥42॥

    अथवा एकलें एक बिंब गगनीं । तरी प्रभा फांके त्रिभुवनीं । तेवीं एकाकियाची सकळ जनीं । आज्ञा पाळिजे ॥308॥ तयांतें एकलें झणी म्हण । ते निर्धन या भाषा नेण । काय कामधेनूसवें सर्व साहान । चालत असे ॥309॥ तियेतें जें जेधवां जो मागे । तें ते एकसरेंचि प्रसवों लागे । तेवीं विश्वविभव तया अंगें । होऊनि आहाति ॥310॥ तयातें वोळखावया हेचि संज्ञा । जे जगें नमस्कारिजे आज्ञा । ऐसें आथि ते जाण प्राज्ञा । अवतार माझे ॥311॥ आतां सामान्य विशेष । हें जाणणें एथ महादोष । कां जे मीचि एक अशेष । विश्व आहे म्हणोनि ॥312॥ तरी आतां साधारण आणि चांगु । ऐसा कैसेनि पां कल्पावा विभागु । वायां आपुलियेचि मती वंगु । भेदाचा लावावा ॥313॥ एऱ्हवीं तरी तूप कासया घुसळावें । अमृत का रांधूनि अर्धें करावें । हा गां वायूसि काय डावें- । उजवें अंग आहे ॥314॥ पैं सूर्यबिंबासि पोट पाठीं । पाहतां नासेल आपुली दिठी । तेवीं माझां स्वरूपीं गोठी । सामान्यविशेषाची नाहीं ॥315॥ आणि सिनाना विभूतीं । मज अपारातें मविसील किती । म्हणोनि किंबहुना सुभद्रापती । असो हें जाणणें ॥316॥ आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे । यालागीं भेदु सांडूनि सरिसें । साम्यें भज ॥317॥ ऐसें विबुधवनवसंतें । तेणें विरक्तांचेनि एकांतें । बोलिलें जेथ श्रीमंतें । श्रीकृष्णदेवें ॥318॥ तेथ अर्जुन म्हणे स्वामी । येतुलें हें राभस्य बोलिलेती तुम्ही । जे भेदु एक आणि आम्हीं । सांडावा एकीं ॥319॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु…

    अर्थ

    जी जी वस्तू वैभवाने, संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल, ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे, असे जाण. ॥41॥

    अर्जुना, ज्या ज्या (पुरुषाच्या) ठिकाणी ऐश्वर्य आणि दया ही दोन्ही राहावयास आलेली असतील, तो तो पुरुष माझी विभूती आहे, असे समज. ॥307॥

    अथवा हे अर्जुना, हे (प्रत्येक वस्तूचे) वेगवेगळे ज्ञान तुला काय करायचे? (कारण असा तू मला कोठवर जाणशील? तर, थोडक्यात सांगतो -) मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे. ॥42॥

    अथवा सूर्यबिंब जसे आकाशात एकटे एकच असते, पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात पसरतो, त्याप्रमाणे या एका पुरुषाची आज्ञा सर्व लोक मानतात. ॥308॥ त्या पुरुषांना तू कदाचित एकटे असे म्हणशील तर, असे म्हणू नकोस. ते निर्धन आहेत, असे समजू नकोस. (जरी त्यांच्याजवळ साधने प्रत्यक्ष दिसली नाहीत, तरी ती त्यांच्या अंगभूत आहेतच.) कामधेनूबरोबर सर्व सामग्री चालत असते की काय? ॥309॥ तिच्याजवळ जो जे जेव्हा मागेल, ते ती एकदम प्रसवू लागते. त्याप्रमाणे विश्वातील ऐश्वर्ये त्यांच्या अंगभूत होऊन राहतात. ॥310॥ त्यांना ओळखायची खूण हीच की, त्यांची आज्ञा जगाला शिरसावंद्य असते. बुद्धिवान अर्जुना, असे जे आहेत, ते माझे अवतार समज. ॥311॥ आता हे संपूर्ण विश्व मीच आहे, म्हणून या विश्वात एक साधारण आणि एक मुख्य, अशी निवड करणे म्हणजे मोठे पाप आहे. ॥312॥ तर आता एक साधारण आणि एक चांगला असा भेद कसा कल्पावा? आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक व्यर्थ का लावावा? ॥313॥ नाहीतर तूप कशाला घुसळावयाचे? अमृताला शिजवून काय अर्धे करावयाचे? बाबा अर्जुना वार्‍याला उजवे-डावे असे वेगवेगळे अंग आहे काय? ॥314॥ सूर्यबिंबाबाला पोट-पाठ आहे का म्हणून पाहावयास गेले तर, आपल्याच दृष्टीचा बिघाड होईल. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेषांची नुसती गोष्टही नाही. ॥315॥ आणि निरनिराळ्या विभूतींद्वारा अमर्याद जो मी, त्या मला किती मोजशील? यास्तव अर्जुना, फार बोलून काय करावयाचे आहे? हा विभूती जाणण्याचा प्रकार राहू दे. ॥316॥ माझ्या एकाच अंशाने हे सर्व जग व्यापलेले आहे, याकरिता आता भेदभावना टाकून ऐक्यदृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखे भज. ॥317॥ ज्ञानी पुरुषरूपी वनाचा वसंत आणि वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठेचे ठिकाण, असे जे श्रीमंत श्रीकृष्णदेव ते याप्रमाणे बोलले. ॥318॥ तेव्हा अर्जुन म्हणाला, महाराज, भेद हा एक वेगळा असून त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे, असे आपण अविचाराने बोलला. ॥319॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : पैं पर्जन्याचिया धारां, वरी लेख करवेल धनुर्धरा…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : पैं पर्जन्याचिया धारां, वरी लेख करवेल धनुर्धरा…

    April 9, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु…

    April 8, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : जो प्रळयतेजा देत मिठी, सगळिया पवनातें गिळी किरीटी…

    April 7, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : पैं पर्जन्याचिया धारां, वरी लेख करवेल धनुर्धरा…

    By Team AvaantarApril 9, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा मुनींआंत व्यासदेवो । तो मी म्हणे यादवरावो । कवीश्वरांमाजीं धैर्या रावो…

    Dnyaneshwari : सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु…

    April 8, 2026

    Dnyaneshwari : जो प्रळयतेजा देत मिठी, सगळिया पवनातें गिळी किरीटी…

    April 7, 2026

    Dnyaneshwari : मी आघवियेचि सृष्टी, आदिमध्यांतीं किरीटी…

    April 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…

    April 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 263
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 379
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 545
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026
    Most Popular

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.