Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपल्यांचा आपलेपणा…

    April 4, 2026

    Dnyaneshwari : ययां नरांमाजीं राजा, तो विभूतिविशेष माझा…

    April 4, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 एप्रिल 2026

    April 4, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 4
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : ययां नरांमाजीं राजा, तो विभूतिविशेष माझा…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : ययां नरांमाजीं राजा, तो विभूतिविशेष माझा…

    Team AvaantarBy Team AvaantarApril 4, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय दहावा

    अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।   गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥26॥ उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्‍भवम् । ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥27॥

    कल्पद्रुम हन पारिजातु । गुणें चंदनुही वाड विख्यातु । तरि ययां वृक्षजातां आंतु । अश्वत्थु तो मी ॥235॥ देवऋषी आंतु पांडवा । नारदु तो मी जाणावा । चित्ररथु मी गंधर्वां । कळिकांमाजीं ॥236॥ ययां अशेषांही सिद्धां- । माजीं कपिलाचार्यु मी प्रबुद्धा । तुरंगजातां प्रसिद्धां- । आंत उच्चैःश्रवा मी ॥237॥ राजभूषण गजांआंतु । अर्जुना मी गा ऐरावतु । पयोराशी सुरमथितु । अमृतांशु तो मी ॥238॥ ययां नरांमाजीं राजा । तो विभूतिविशेष माझा । जयातें सकळ प्रजा । होऊनि सेविती ॥239॥

    आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् । प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥28॥  अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् । पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥29॥

    पैं आघवेयां हातियेरां- । आंत वज्र तें मी धनुर्धरा । जें शतमखोत्तीर्णकरा । आरूढोनि असे ॥240॥ धेनुमध्यें कामधेनु । तें मी म्हणे विष्वक्सेनु । जन्मवितयां आंतमदनु । तो मी जाणें ॥241॥ सर्पकुळाआंतु अधिष्ठाता । वासुकी गा मी कुंतीसुता । नागांमाजी समस्तां । अनंतु तो मी ॥242॥ अगा यादसांआंतु । जो पश्चिमप्रमदेचा कांतु । तो वरुण मी हें अनंतु । सांगत असे ॥243॥ आणि पितृगणां समस्तां- । माजीं अर्यमा जो पितृदेवता । तो मी हें तत्त्वतां । बोलत आहें ॥244॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा, नाहीं शेवटु माझिया विस्तारा…

    अर्थ

    सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष, देवर्षींमध्ये नारद, गंधर्वांमध्ये चित्ररथ, सिद्धांमध्ये कपिल महामुनी (मी आहे) ॥26॥ अश्वांमध्ये अमृतप्राप्त्यर्थ केलेल्या मंथनापासून उत्पन्न झालेला उच्चै:श्रवा मी आहे, गजेंद्रांमध्ये ऐरावत मी आहे आणि नरांमध्ये राजा मी आहे, असे जाण. ॥27॥

    कल्पवृक्ष, पारिजातक वृक्ष आणि गुणांनी अतिशय प्रसिद्ध असलेला चंदन हे जरी श्रेष्ठ वृक्ष आहेत, तरी या सर्व वृक्षांमध्ये जो पिंपळ, ती माझी विभूती आहे. ॥235॥ अर्जुना, देवर्षींमध्ये जो नारद, तो माझी विभूती आहे, असे समज आणि सर्व गंधर्वांमध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व माझी विभूती आहे. ॥236॥ हे बुद्धिमान अर्जुना, या संपूर्ण सिद्धांमध्ये कपिलाचार्य ही माझी विभूती आहे. प्रसिद्ध असलेल्या सर्व घोड्यांमध्ये (चौदा रत्नांतील एक) जो उच्चै:श्रवा नावाचा घोडा, ती माझी विभूती आहे. ॥237॥ अर्जुना राज्याचे भूषण असलेल्या हत्तींमध्ये ऐरावत ही माझी विभूती आहे. तो देवांनी मंथन केलेल्या क्षीरसमुद्रातून अमृताबरोबर निघाला. ॥238॥ ज्याला सर्व लोक आपण प्रजा बनून कारभार देतात, असा जो या सर्व मनुष्यांमध्ये राजा आहे, तो माझी महत्त्वाची विभूती आहे. ॥239॥

    आयुधांमध्ये वज्र मी आहे, धेनूंमध्ये कामधेनू मी आहे, प्रजोत्पत्तीला कारण जो काम तो मी आहे, सर्पांमध्ये वासुकी मी आहे. ॥28॥ नागांमध्ये अनंत मी आहे, जलदेवतांमध्ये वरुण मी आहे, पितरांमध्ये अर्यमा मी आहे, नियमन करणारांमध्ये यम मी आहे. ॥29॥

    अर्जुना, सर्व हत्यारांमध्ये, जे शंभर यज्ञ पार पाडलेल्या इंद्राच्या हातात असते, ते वज्र माझी विभूती आहे. ॥240॥ सर्व गायींमध्ये स्वर्गातील कामधेनू ही माझी विभूती आहे, असे श्रीकृष्ण म्हणाले. जन्म देवविणार्‍यांमध्ये काम तो मी आहे, असे समज. ॥241॥ सापांच्या कुळामध्ये मुख्य असलेला जो वासुकी नावाचा साप, तो अर्जुना माझी विभूती आहे. सर्व नागांमध्ये अनंत नावाचा नाग, ती माझी विभूती आहे. ॥242॥ अगा अर्जुना, जलचरांमध्ये पश्चिम दिशारूप तरुण स्त्रीचा स्वामी जो वरुण, तो मी आहे, असे अनंत सांगतात, ॥243॥ आणि सर्व पितरांच्या समुदायांमध्ये अर्यमा नावाची पितृदेवता आहे, ती माझी विभूती आहे, हे मी खरे खरे सांगत आहे. ॥244॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    April 3, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा, नाहीं शेवटु माझिया विस्तारा…

    April 2, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : हां गा सूर्य काय शिळा, अग्नि म्हणों येत आहे वोंविळा…

    April 1, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    By Team AvaantarApril 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा याहीवरी त्या विभूती । सांगणें ठेलें तुजप्रती । सांगेन म्हणितलें तुज…

    Dnyaneshwari : एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा, नाहीं शेवटु माझिया विस्तारा…

    April 2, 2026

    Dnyaneshwari : हां गा सूर्य काय शिळा, अग्नि म्हणों येत आहे वोंविळा…

    April 1, 2026

    Dnyaneshwari : जें काळकूटाचें सहोदर, जें मृत्युभेणें प्याले अमर…

    March 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    आपल्यांचा आपलेपणा…

    April 4, 2026

    Dnyaneshwari : ययां नरांमाजीं राजा, तो विभूतिविशेष माझा…

    April 4, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 एप्रिल 2026

    April 4, 2026

    टेंन्डो एकियालीस आणि ए. सी. एल.

    April 3, 2026

    गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    April 3, 2026

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 257
    • अवांतर 179
    • आरोग्य 96
    • पंचांग आणि भविष्य 373
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 190
    • मैत्रीण 17
    • ललित 532
    • शैक्षणिक 75

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपल्यांचा आपलेपणा…

    April 4, 2026

    Dnyaneshwari : ययां नरांमाजीं राजा, तो विभूतिविशेष माझा…

    April 4, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 एप्रिल 2026

    April 4, 2026
    Most Popular

    आपल्यांचा आपलेपणा…

    April 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.