Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    April 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 एप्रिल 2026

    April 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    Team AvaantarBy Team AvaantarApril 3, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय दहावा

    याहीवरी त्या विभूती । सांगणें ठेलें तुजप्रती । सांगेन म्हणितलें तुज प्रीती । त्या प्रधाना आइकें ॥220॥

    आदित्यानाममहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् । मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥21॥

    हें बोलोनि तो कृपावंतु । म्हणे विष्णु मी आदित्यांआंतु । रवी मी रश्मिवंतु । सुप्रभांमाजीं ॥221॥ मरूद्‍गणांचां वर्गीं । मरीचि म्हणे मी शारङ्गी । चंद्र मी गगनरंगीं । तारांमाजीं ॥222॥

    वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।  इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥22॥

    वेदाआंतु सामवेदु । तो मी म्हणे गोविंदु । देवांमाजी मरुद्‍बंधु । महेंद्र तो मी ॥223॥ इंद्रियांआंतु अकरावें । मन तें मी हें जाणावें । भूतांमाजीं स्वभावें । चेतना ते मी ॥224॥

    रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् । वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥23॥

    अशेषांही रुद्रांमाझारीं । शंकर जो मदनारी । तो मी येथ न धरीं । भ्रांति कांहीं ॥225॥ यक्षरक्षोगणांआंतु । शंभूचा सखा जो धनवंतु । तो कुबेरु मी हें अनंतु । म्हणता जाहला ॥226॥ मग आठांही वसूंमाझारीं । पावकु तो मी अवधारीं । शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी ॥227॥

    पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् । सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥24॥ महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् । यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥25॥

    जो स्वर्गसिंहासना सावावो । सर्वज्ञते आदीचा ठावो । तो पुरोहितांमाजीं रावो । बृहस्पती मी ॥228॥ त्रिभुवनींचिया सेनापतीं- । आंत स्कंदु तो मी महामती । जो हरवीर्यें अग्निसंगती । कृत्तिकाआंतु जाहला ॥229॥ सकळिकां सरोवरांसी । माझारि समुद्र तो मी जळराशी । महर्षींआंतु तपोराशी । भृगु तो मी ॥230॥ अशेषाही वाचा- । आंतु नटनाच सत्याचा । तें अक्षर एक मी वैकुंठींचा । वेल्हाळु म्हणे ॥231॥ समस्तांही यज्ञांचां पैकीं । जपयज्ञु तो मी ये लोकीं । जो कर्मत्यागें प्रणवादिकीं । निफजविजे ॥232॥ नामजपयज्ञु तो परम । बाधूं न शके स्‍नानादि कर्म । नामें पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थें ॥233॥ स्थावरां गिरीवरां आंतु । पुण्यपुंज जो हिमवंतु । तो मी म्हणे कांतु । लक्ष्मीयेचा ॥234॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : हां गा सूर्य काय शिळा, अग्नि म्हणों येत आहे वोंविळा…

    अर्थ

    माझे व्यापक स्वरूप सांगितल्यावरही तुला माझ्या विभूती काही निराळ्या सांगावयाच्या राहिल्या आहेत काय? परंतु तुला प्रेमाने सांगतो म्हणून म्हटले तर, आता तुला मुख्य मुख्य विभूती सांगतो, त्या ऐक. ॥220॥

    (बारा) आदित्यांमध्ये मी विष्णू आहे, प्रकाशमान पदार्थांमध्ये मी किरणवान रवी आहे, मरुद्गणांपैकी मरीचि मी आहे, नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे ॥21॥

    हे बोलून तो कृपाळू श्रीकृष्ण म्हणाला, आदित्य नावाच्या बारा देवतांत विष्णू नावाची देवता माझी विभूती आहे आणि चांगल्या तेजस्वी पदार्थांमध्ये किरणे असलेला सूर्य माझी विभूती आहे. ॥221॥ मरुद्गणांच्या (एकोणपन्नास) प्रकारांत मरीचि ही माझी विभूती आहे. असे शारंङ्गधर श्रीकृष्ण म्हणाले. आकाशरूपी रंगणातील नक्षत्रांमध्ये चंद्र ही माझी विभूती आहे. ॥222॥

    वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवांमध्ये इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे, भूतांच्या ठिकाणी चेतना मी आहे. ॥22॥

    ऋग्वेदादी चार वेदांमध्ये सामवेद हा माझी विभूती आहे. असे गोविंद म्हणाले आणि देवांमध्ये मरुद्गणांचा भाऊ महेंद्र तो मी आहे. ॥223॥ इंद्रियांमध्ये अकरावे असणारे जे मन, ती माझी विभूती आहे, असे समज आणि सर्व प्राण्यांमध्ये स्वाभाविक असलेली जी चेतना ती माझी विभूती आहे. ॥224॥

    (अकरा) रुद्रांमधे शंकर मी आहे, यक्ष-राक्षसांमधे कुबेर मी आहे, (आठ) वसूंमध्ये अग्नी मी आहे आणि पर्वतांमध्ये मेरू मी आहे. ॥23॥

    सगळ्या रुद्रांमध्ये कामाचा शत्रू जो शंकर, ती माझी विभूती आहे. याविषयी काही शंका ठेवू नकोस. ॥225॥ यक्ष-राक्षसांच्या समुदायांमध्ये शंकराचा परम मित्र असलेला जो धनवान कुबेर, ती माझी विभूती आहे, असे श्रीकृष्ण म्हणाले. ॥226॥ मग आठ वसूंमध्ये जो अग्नी ती माझी विभूती आहे, असे समज. मोठाली शिखरे असलेल्या पर्वतात सर्वांपेक्षा उंच असणारा जो मेरू पर्वत, ती माझी विभूति आहे. ॥227॥

    हे पार्था, पुरोहितांमध्ये मुख्य जो बृहस्पती, तो मी आहे असे जाण. सेनानायकांमध्ये कार्तिकेय मी आहे, जलाशयांमध्ये सागर मी आहे. ॥24॥ महर्षींमध्ये भृगू मी आहे, वाणीमध्ये एकाक्षर (ॐ) मी आहे. यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे. स्थावर पदार्थांमध्ये हिमालय मी आहे. ॥25॥

    जो स्वर्गाच्या राज्याला सहाय्य करणारा आहे आणि जो सर्वज्ञतेमध्ये अग्रगण्य आहे, असा जो कुलोपाध्यायांमध्ये श्रेष्ठ असलेला बृहस्पती, ती माझी विभूती आहे. ॥228॥ हे बुद्धिमान अर्जुना, शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीने कृत्तिकांच्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो कार्तिकस्वामी, तो त्रिभुवनातील सेनापतींमध्ये माझी विभूती आहे. ॥229॥ सर्व जलाशयांमध्ये पाण्याचा मोठा साठा असणारा जो समुद्र, ती माझी विभूती आहे आणि महर्षींमध्ये तपाचा राशी जो भृगू ती माझी विभूती आहे. ॥230॥ सर्व वाणींमध्ये ज्या अक्षरांत सत्याचा उत्कर्ष असतो, ते एक अक्षर (ॐ) मी आहे, असे वैकुंठप्रिय श्रीकृष्ण म्हणाले. ॥231॥ या मृत्युलोकामध्ये कर्माच्या त्यागात ॐकारादिकांच्या योगाने ज्यास उत्पन्न करतात, तो जपरूपयज्ञ सर्व यज्ञांमध्ये माझी विभूती आहे. ॥232॥ नामजपयज्ञ हा सर्व श्रेष्ठ आहे. यास स्नानादि कर्मे अडकवू शकत नाहीत. (स्नानादि कर्मांवाचून नाम घेतले तरी चालते). नामाने धर्म आणि अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे. ॥233॥ अचल असलेल्या मोठ्या पर्वतांमध्ये पुण्याचा केवळ राशी जो हिमालय, ती माझी विभूती, असे लक्ष्मीचे पती म्हणाले. ॥234॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा, नाहीं शेवटु माझिया विस्तारा…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा, नाहीं शेवटु माझिया विस्तारा…

    April 2, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : हां गा सूर्य काय शिळा, अग्नि म्हणों येत आहे वोंविळा…

    April 1, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : जें काळकूटाचें सहोदर, जें मृत्युभेणें प्याले अमर…

    March 31, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा, नाहीं शेवटु माझिया विस्तारा…

    By Team AvaantarApril 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा तरि तुवां पुसलिया विभूती । तयांचें अपारपण सुभद्रापती । ज्या माझियाचि…

    Dnyaneshwari : हां गा सूर्य काय शिळा, अग्नि म्हणों येत आहे वोंविळा…

    April 1, 2026

    Dnyaneshwari : जें काळकूटाचें सहोदर, जें मृत्युभेणें प्याले अमर…

    March 31, 2026

    Dnyaneshwari : जरी थोरी तुझी पाहत आहों…

    March 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    April 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 एप्रिल 2026

    April 3, 2026

    Ayurveda : वसंत ऋतूत आळस आणि जडपणा

    April 2, 2026

    जातीभेदापलीकडचे आप्पा अन् अलीकडचा रवीदादा!

    April 2, 2026

    Recipe : एकदम टेस्टी दही मिसळ!

    April 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 256
    • अवांतर 179
    • आरोग्य 95
    • पंचांग आणि भविष्य 371
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 189
    • मैत्रीण 17
    • ललित 530
    • शैक्षणिक 75

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    April 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 एप्रिल 2026

    April 3, 2026
    Most Popular

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.