Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : मी कवण केतुला, कवणाचा कैं जाहला…

    March 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026

    March 19, 2026

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, March 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : मी कवण केतुला, कवणाचा कैं जाहला…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : मी कवण केतुला, कवणाचा कैं जाहला…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 20, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय दहावा

    प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे । पिके तरी वाहो नुबगिजे । पिकासी निवाडु देखिजे । अधिकाधिक ॥55॥ पुढतपुढती पुटें देतां । जोडे वानियेची अधिकता । तें सोनें पांडुसुता । शोधूंचि आवडे ॥56॥ तैसें एथ पार्था । तुज आभार नाहीं सर्वथा । आम्ही आपुलियाचि स्वार्था । बोलौनि आम्ही ॥57॥ अगा बाळका लेवविजे लेणें । तयाप्रमाणें तें काय जाणे । तो सोहळा भोगणें । जननीयेसी दृष्टी ॥58॥ तैसें तुझें हित आघवें । जंव जंव कां तुज फावे । तंव तंव आमुचें सुख दुणावे । ऐसें असे ॥59॥ आतां असो हे विकडी । मज उघड तुझी आवडी । म्हणोनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे ॥60॥ आम्हां येतुलियाचि कारणें । तेंचि तें तुजशीं बोलणें । परि असो हें अंतःकरणें । अवधान दे ॥61॥ ऐकें ऐकें सुवर्म । वाक्य माझें परम । जें अक्षरें लेऊनि परब्रह्म । तुज खेंवासि आलें ॥62॥ तरी किरीटी तूं मातें । नेणसी ना निरुतें । तरि गा जो मी येथें । तें विश्वचि हें ॥63॥

    न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः । अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥2॥

    एथ वेद मुके जाहाले । मन पवन पांगुळले । रातीविण मावळले । रविशशी ॥64॥ उदरींचा गर्भु जैसा । नेणे मायेची वयसा । देवांसि मी तैसा । चोजवेना ॥65॥ आणि जळचरां उदधीचें मान । मशकां नोलांडवे गगन । तैसें महर्षींचें ज्ञान । नेणे मातें ॥66॥ मी कवण केतुला । कवणाचा कैं जाहला । निरुती या करितां बोला । युगें गेलीं ॥67॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    अर्थ

    प्रत्येक वर्षाला शेताची पेरणी करावी आणि जर ते पिकले तर, त्याची मशागत करण्याचा कंटाळा करू नये, कारण त्यामुळे पिकाची निष्पत्ती अधिकाधिक झालेली दिसते. ॥55॥ ज्या सोन्याला वारंवार क्षाराची पुटे दिली असता, त्याचा कस अधिकाधिक वाढत जातो, अर्जुना, ते सोने शुद्ध करावेसेच वाटते. ॥56॥ अर्जुना, त्याप्रमाणे येथेही आहे. या सांगण्यात तुझ्यावर मुळीच उपकारांचे ओझे नाही. कारण आम्ही आपल्या स्वार्थासाठी बोलत आहोत. ॥57॥ अरे, मुलाला दागिने घालतात, पण ते मूल त्याप्रमाणे (दागिन्यांना) जाणते काय? दागिन्यांनी मुलाला आलेल्या शोभेचा आनंद आईने आपल्या दृष्टीने भोगावयाचा असतो, ॥58॥ त्याप्रमाणे तुझे सर्व हित जसजसे तुला समजेल, तसतसा आमचा आनंद दुप्पट होतो; अशी वस्तुस्थिती आहे. ॥59॥ आता हे अलंकारिक बोलणे राहू दे. तुझ्यावर माझे उघड प्रेम आहे, म्हणून तुझ्याशी बोलताना तृप्तीचा शेवट होत नाही (म्हणजे तुझ्याशी बोलणे पुरेसे वाटत नाही). ॥60॥ आम्हाला एवढ्याकरिता तेच ते फिरून तुझ्याशी बोलावे लागते. परंतु हे असू दे. तू मनापासून लक्ष दे. ॥61॥ तर ऐक मर्मज्ञ अर्जुना, आमचे श्रेष्ठ बोलणे ऐक. हे आमचे बोलणे म्हणजे ब्रह्मच अक्षरांचा अंगरखा घालून तुला आलिंगन देण्यास आले आहे. ॥62॥ तरी अर्जुना, तू मला खरोखर जाणत नाहीस ना? (जर जाणत नसलास तर सांगतो,) येथे जो मी तुझ्यापुढे उभा आहे, तो दिसतो एवढा मर्यादित नसून मी म्हणजे हे विश्वच आहे. ॥63॥

    देवांना किंवा महर्षींना माझी उत्पत्ती माहीत नाही. कारण देव आणि महर्षी या सर्वांचे आदिकारण मी आहे. ॥2॥

    या माझ्या स्वरूपी वेदांना बोलता येईना, मन आणि प्राण यांची गती माझ्या स्वरूपी चालेना. सूर्य आणि चंद्र हे माझ्या स्वरूपी रात्री शिवाय मावळले. (ते माझ्या स्वरूपाचे प्रकाशन करू शकत नाहीत.) ॥64॥ पोटात असलेला गर्भ ज्याप्रमाणे (आपल्या) आईचे वय जाणत नाही, त्याप्रमाणे देवांना माझे ज्ञान होत नाही ॥65॥ आणि ज्याप्रमाणे पाण्यात राहणार्‍या प्राण्यांना समुद्राचे माप कळत नाही, (किंवा) चिलटास आकाश ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे मोठाल्या ऋषींचे ज्ञान मला जाणू शकत नाही. ॥66॥ मी कोण आहे, केवढा आहे, कोणापासून आणि केव्हा उत्पन्न झालो आहे, या गोष्टींचा निर्णय करण्यात किती एक युगे निघून गेली. ॥67॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)


    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    By Team AvaantarMarch 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणें । तरि ओंविया होती लेणें…

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : मी कवण केतुला, कवणाचा कैं जाहला…

    March 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026

    March 19, 2026

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    March 19, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 242
    • अवांतर 171
    • आरोग्य 89
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 182
    • मैत्रीण 16
    • ललित 501
    • वास्तू आणि वेध 355
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn