Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : देवकीया उदरीं वाहिला, यशोदा सायासें पाळिला…

Dnyaneshwari : देवकीया उदरीं वाहिला, यशोदा सायासें पाळिला…

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

अध्याय सहावा

पाहा पां अनुरागें भजे । जे प्रियोत्तमें मानिजे । ते पतीहूनि काय न वर्णिजे । पतिव्रता ॥129॥ तैसा अर्जुनुचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा । जे तो त्रिभुवनाचिया दैवां । एकायतनु जाहला ॥130॥ जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ति आवगे । पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ॥131॥ तंव श्रोते म्हणती दैव । कैसी बोलाची हवाव । काय नादातें हन बरव । जिणोनी आली ॥132॥ हां हो नवल नोहे देशी । मऱ्हाटी बोलिजे तरी ऐसी । वाणें उमटताहे आकाशीं । साहित्यरंगाचें ॥133॥ कैसें उन्मेखचांदिणें तार । आणि भावार्था पडे गार । हेचि श्लोकार्थकुमुदी तरी फार । साविया होती ॥134॥ चाडचि निचाडां करी । ऐसी मनोरथीं ये थोरी । तेणें विवळले अंतरी । तेथ डोलु आला ॥135॥ तें निवृत्तिदासें जाणितलें । मग अवधान द्या म्हणितलें ॥ नवल पांडवकुळीं पाहलें । कृष्णदिवसें ॥136॥ देवकीया उदरीं वाहिला। यशोदा सायासें पाळिला ॥ कीं शेखीं उपेगा गेला । पांडवासी ॥137॥ म्हणऊनि बहु दिवस वोगळावा । कां अवसरु पाहोनि विनवावा । हाही सोसु तया सदैवा । पडेचिना ॥138॥

हेही वाचा – Dnyaneshwari : तो ज्ञानियांचा बापु, देखणेयांचे दिठीचा दीपु…

अर्थ

पाहा, जी नवर्‍याला प्रेमाने भजते आणि जिला नवरा मानतो, त्या पतिव्रतेचे वर्णन तिच्या नवर्‍यापेक्षा देखील जास्त करावयास नको का? ॥129॥ त्याप्रमाणेच अर्जुनाचेच विशेष वर्णन करावे, असेच माझ्या मनाला पसंत पडते. कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिले आहे. ॥130॥ ज्याच्या प्रेमाच्या स्वाधीन होऊन निराकार परमात्मा सगुणरूप घेतो आणि तो (देव) पूर्ण आहे. परंतु त्याला देखील ज्याचा वेध लागतो. ॥131॥ तेव्हा श्रोते म्हणतात, काय भाग्य आमचे! काय बोलण्याचा रंग आहे! याच्या बोलण्याची शोभा नादब्रह्मास जिंकून आली की काय, न जाणो! (म्हणजे याच्या बोलण्याच्या शोभेपुढे नादब्रह्म फिके पडले!) ॥132॥ अहो, देशी भाषारूपी आकाशात अलंकाररूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट येत (होत) आहेत, अशी मराठी भाषा बोलता येते, हे आश्चर्य नव्हे काय? ॥133॥ ज्ञानरूपी चांदणे कसे स्वच्छ आणि टपोर पडले आहे! (पाहा,) त्या व्याख्यानातील निरनिराळे अभिप्राय, हाच त्या चांदण्यांचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्रविकासी कमळे सहज विकसित होत आहेत! ॥134॥ हे व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी एवढी आहे की, निरिच्छ पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल, असा श्रोत्यांच्या मनात व्याख्यानाविषयी प्रकाश पडल्यामुळे ते डोलू लागले. ॥135॥ निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले आणि मग श्रोत्यांस म्हणाले, महाराज, लक्ष द्या. पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे.॥136॥देवकीने आपल्या उदरात त्याला वाढविले, यशोदेने त्याचे कष्टाने पालन केले, (पण) शेवटी तो पांडवांच्या उपयोगाला आला. ॥137॥ म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा (योग्य) वेळ पाहून विनंती करावी, एवढाही प्रयास त्या भाग्यवान (अर्जुनास) पडला नाही ॥138॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : पाहा पां नवल कैसे चोज, कें उपदेशु केउतें झुंज…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!