Author: शोभा भडके

Avatar photo

मूळ गाव कांबी, जिल्हा बीड. मूळ राहण्याचे ठिकाण बीड. मी लेखनाला सुरुवात करायच्या आधी फक्त एक वाचक होते. म्हणून प्रतिलिपी ॲपवर कथा वाचनच करत होते. तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं मी एखादी स्टोरी लिहू शकेन. पण वाचन करत करता मनात आलं आणि लिहू लागले. लिहिलेलं वाचकांना आवडत गेलं, तसं माझा लिहिण्याचा हुरूप वाढत गेला... आज लेखनामुळे आर्थिकदृष्ट्या पण स्वावलंबी झाले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

भाग – 22 खूप वेळ आरू रडत होती. बऱ्याच वेळानंतर भावनाने तिला उठवून बेडवर बसवलं आणि तिला पाणी पाजलं. भावनाच्या मांडीवर डोक ठेवून आरू तशीच शून्यात नजर लावून बसली होती… भावना तिच्या केसांत हात फिरवत होती… कधीतरी उशिरा तिला तशीच झोप लागून गेली… आज लग्न होतं. सगळ्यांची घाईगडबड सुरू होती. मंडप सजला होता. सनई चौघड्याचे सूर सगळीकडे घुमत होते. डीजेवर गाणी वाजत होती. लहान-मोठी मुले त्यावर नाचत होती… राम आणि शिवची वाजतगाजत वरात निघाली होती, घोड्यावर बसून… ते मारुत च्या मंदिरात दर्शन करून लग्नमंडपात येणार होते. इकडे आरू आणि सिया, त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये तयार होत होत्या… “वॉव दि! खूप सुंदर…

Read More

भाग – 21 आरूने राम आणि पवनचं बोलणं पुन्हा एकदा ऐकलं होतं… ज्या व्यक्तीमुळे तिची पूर्ण गावात बदनामी झाली, ज्या व्यक्तीमुळे तिला शिक्षण… तिचं स्वप्न… सगळं सगळं अर्ध्यावर सोडून द्यावं लागलं… अशा व्यक्तीसोबत ती आयुष्यभरासाठी जोडली जाणार होती! ती जितकी अलड्ड होती, समजदारही तितकीच होती. वेळप्रसंगी भावनिक तर, राग आल्यावर कोणाचीच भिड ठेवत नव्हती… आणि आता तिला शिवचा खूप राग आला होता आणि त्याची झळ शिवला बसणार होती. सगळे हॉलवर पोहचले होते… शिव आणि त्याची फॅमिली देखील पोहोचली होती… सिया आणि आरू त्यांना दिलेल्या रूममध्ये थांबल्या होत्या. हॉलमध्ये हळदीची तयारी सुरू होती… सगळे एकत्र जमले होते… “मी काय म्हणते कलावती…

Read More

भाग – 20 “आरं, आवर की पटापट… हळदीसाठी पोहोचायचं लवकर,” कलावती  रामला ओरडत होत्या. आज हळदीचा कार्यक्रम होता. आरू तयार होऊन बसली होती. हळद हॉलवर होणार होती. त्यामुळे सगळे तिकडे जाण्याच्या तयारीत होते. प्रत्येक जण काही ना काही कामात होता. काही सामान घ्यायचं होतं, काही घेतलं होतं. गावाकडचे बरेचसे पाहुणे हे उद्या डायरेक्ट लग्नालाच येणार होते. हळदीसाठी भावकीमधले काही मोजके लोक, जवळचे नातेवाईक, जसे मामा मावशी वगैरे… असे थोडेच पाहुणे आज हजर होते. एकतर, गावाकडचे लोक असं दोन-दोन दिवस काम टाकून येऊ शकत नव्हते आणि त्यात आत्याचं घर तसं लहानच होतं. तरी शेजाऱ्यांनी बरीच मदत केली होती. राम हळदीसाठी तयार…

Read More

भाग – 19 राम  जाता जाता मधेच थांबला आणि मागे वळत पुन्हा शिवच्या समोर आला… त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला म्हणाला, “एकुलते एक जावई आहात तुम्ही असं दारातून जाणं बरं दिसत नाही, आत चला… तुमची आई आणि बहीणही आहे… त्यांनाही सोबत घेऊन जा,” असं म्हणून तो पुढे निघून गेला. “बरं, आता आम्ही निघतो. तसं तर सगळी तयारी तुम्हीच करताय, आम्हालाही आमच्या सुनेच्या स्वागताची तयारी करावी लागेल ना!” सुधा आत येणाऱ्या आरूकडे प्रेमाने पाहात म्हणाल्या. घरात आल्यावर समोर भावी सासूबाईंना आपल्याकडे हसताना पाहून फास्ट चालत आलेल्या आरूची चाल आपोआपच मंदावली आणि ती नजर झुकवत, हळू चालत त्यांच्याजवळ आली. सुधा आणि सिया…

Read More