भाग – 2 रुंजीला उचलून घेतच भार्गवने दवाखान्याच्या आत आणलं. रिसेप्शनिस्टजवळ फॉर्मलिटिज पूर्ण करून त्याने उमाला फोन लावला. “उमामावशी, भार्गव बोलतोय. रुंजीच्या पायावर स्कूटर पडल्यामुळे मी तिला दवाखान्यात घेऊन आलो आहे. घाबरण्याचे काहीच कारण नाही. डॉक्टर सांगतीलच फ्रॅक्चर असेल तर! तू शांतपणे दवाखान्यात ये. मी आहे इथे!” उमा दवाखान्यात पोहोचेपर्यंत अर्धा तास गेला. रुंजीला जवळ घेत उमा म्हणाली, “कशी पडलीस गं? किती वेळा सांगून झालं आहे की, स्कूटर हळू चालवत जा!” “मावशी, ती जरा रागात होती ना, म्हणून पडली…” भार्गव रुंजीला चिडवत म्हणाला. “आता कसला राग? पेपर वाईट गेला का?” “पेपर उत्तम गेलाय गं! पण कुणाचा तरी राग तिने स्कूटरवर…
Read More