Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् । स्वधर्मे निधनम् श्रेयः परधर्मो भयावहः ॥35॥ अगा स्वधर्मु हा आपुला । जरि कां कठिणु जाहला । तरी हाचि अनुष्ठिला । भला देखें ॥219॥ येंरू आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा । परी आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥220॥ सांगें शूद्रघरीं आघवीं । पक्वानें आहाति बरवीं । तीं द्विजें केवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ॥221॥ हें अनुचित कैसेनि कीजे । अप्राप्य केवीं इच्छिजे ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 08 आश्विन शके 1947; तिथि : अष्टमी 18:05; नक्षत्र : पूर्वाषाढा अहोरात्र योग : शोभन 25:01; करण : बालव अहोरात्र सूर्य : कन्या; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:28 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास सरस्वतीपूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला असेल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. बऱ्याच काळापासून ते…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते…! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… नाती, बोलीभाषेतली… थोडंसं विचित्र… पण बऱ्याच जणांना माहीत असलेलं… आता माझ्यासारखे बावळट पण असूच शकतील, ज्यांना बोलीभाषेतील नाती म्हणजे काय? हा प्रश्न पडलाच असेल. काही लोक बोलता बोलता सहज नाती जोडून मोकळी होतात. सकाळची घाईची वेळ. नवऱ्याची ऑफिसला जायची घाई… मी इस्त्रीचे कपडे आणायला निघाले तर, इस्त्रीवाले काका आमच्या कपड्यांचं गाठोडं घेऊन घरीच यायला निघाले होते, रस्त्यातच भेटले. सोबत एक बाई होती. तिला जरा वाईट वाटत होतं की, थोड्या वेळापूर्वी ती इस्त्रीवाल्या काकांसोबत भांडून गेली होती. तिच्या नवऱ्याची नवीन पँट हरवली होती आणि आता ती भरून द्या म्हणून ती काकांशी भांडली…
रश्मी परांजपे मागील लेखात आपण पालकांच्या माहितीसाठी आणि पूर्ततेसाठी विद्यार्थीसंबंधित माहितीपत्रक तयार करताना समाविष्ट करावयाचे काही निवडक मुद्दे जाणून घेतले. या लेखात आपण माहितीपत्रकातील उर्वरित मुद्द्यांविषयी माहिती घेऊयात. अभ्यासक्रमातील व्यवसाय-पुस्तके मुलांच्या अभ्यासक्रमात व्यवसाय-पुस्तकांचा समावेश असतो. ही व्यवसाय-पुस्तके मिळण्याच्या ठिकाणाचा तपशील माहितीपत्रकात अवश्य द्यावा. फी भरणा फी भरण्याची तारीख, वेळ आणि मुदत याबाबतचा तपशील माहितीपत्रकात अवश्य नमूद असावा. शाळेत भेटण्याची वेळ पालक शाळेत शिक्षक/शिक्षिकेला तसेच मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिकांना कधी भेटू शकतात, याविषयी सूचना माहितीपत्रकात अवश्य द्यावी. वर्ग चालू असताना पालकांनी शिक्षिकेला भेटण्यास प्रतिबंध असावा. हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : माहितीपत्रक मुलांचा शाळेतील डबा सुरुवातीला मुलांच्या डब्यात खाऊ असू द्यावा, त्यामुळे मुलं…
माधवी जोशी माहुलकर नवरात्रौत्सवात अनेकजण उपवास करतात. अशावेळी फराळाचे पदार्थ काय करावे, हा मोठ्ठा प्रश्न गृहिणींपुढे असतो. अशावेळी साबुदाणा, भगर, बटाटा पॅटीस तसेच भगर इडली हे पर्याय ठरू शकतात. भगर हा मिलेट्सचाच एक प्रकार असल्याने ही डिश पौष्टिक सुद्धा आहे. आता यांची रेसिपी आपण पाहुयात. भगर, साबुदाणा पॅटीस एकूण कालावधी – सुमारे 45 मिनिटे साहित्य भगर – 1 वाटी साबुदाणा – 1 वाटी शेंगदाणा कूट – अर्धी वाटी आले – 1 इंच तुकडा हिरवी मिर्ची आणि कोथींबीर पेस्ट – अर्धी वाटी उकडलेले बटाटे – 2 मीठ – चवीनुसार जिरे – 1 लहान चमचा तेल – तळणासाठी खोबऱ्याचा किस – 1…
पराग गोडबोले आम्ही नेहमी भांडतो, वाद घालतो, परत एक होतो आणि मग संसाराचा गाडा सुरळीतपणे सुरू राहतो. कधी ती एक पाऊल पुढे येते, तर कधी मी एक पाऊल मागे घेतो. गेली कित्येक वर्षं हे चक्र असं अव्याहतपणे सुरू आहे… परवा असंच झालं. तिला पुण्याला माहेरी जायचे वेध लागले. माहेरी जायचं म्हटल्यावर सगळ्याच बायकांच्या अंगात येतं की, काय कोणास ठाऊक? पण आमच्याकडे मात्र येतं! यावेळी पण आलं. चार दिवसांसाठीच जायचं होतं, पण भली मोठी बॅग फडताळातून बाहेर पडली आणि भरली जाऊ लागली, प्रस्थानाच्या चार दिवस आधीपासूनच!! हे न्यायचंय… ते हवंय… म्हणता म्हणता बॅग टम्म फुगली. अगदी ओसंडून वाहू लागली. जायच्या आदल्या…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा सदृश्यं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि । प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥33॥ म्हणोनि इंद्रियें एकें । जाणतेनि पुरुखें । लाळावीं ना कौतुकें । आदिकरुनि ॥202॥ हां गा सर्पेंसी खेळों येईल । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल । सांगें हाळाहाळ जिरेल । सेविलिया काई ॥203॥ देखें खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला । तैसा इंद्रियां लळा दिधला । भला नोहे ॥204॥ एर्हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 सप्टेंबर 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 07 आश्विन शके 1947; तिथि : सप्तमी 16:30; नक्षत्र : मूळ 30:16 योग : सौभाग्य 24:59; करण : विष्टी 29:22 सूर्य : कन्या; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:29 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 सरस्वती आवाहन महालक्ष्मी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – एखादा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे. कामाच्या संदर्भात काही योजना आखली जाण्याची शक्यता आहे. एखाद्या सामाजिक कार्यात…
डॉ. किशोर महाबळ सर्व विद्यार्थी बुद्धीमान असतात, त्यांच्यात निसर्गदत्त अशा कोणत्या ना कोणत्या क्षमता, कौशल्ये असतातच, हे आपण मान्य केले आहे. आपल्याला विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा प्रकार, त्यांची कौशल्ये आणि क्षमता आपल्याला शोधून काढायच्या आहेत. शाळेतील सर्व उपक्रम सर्वांसाठी आयोजित करण्यातूनच हे शक्य होणार आहे. निवडक विद्यार्थ्यासाठी निवडक उपक्रम आणि काहीच विद्यार्थ्यांना वारंवार संधी देणे ही प्रचलित पद्धतच निकालात काढायला हवी आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना उपक्रमात भाग घेण्यासाठी प्रोत्साहनच न मिळाल्याने ते कधी भागच घेत नाहीत आणि त्यामुळे त्यांना आपल्या सुप्त क्षमता ओळखण्याची संधीच मिळत नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण सर्व उपक्रम घ्यायला हवेत. या विविध उपक्रमांत भाग घेण्याने…
सौरभ वैशंपायन इतिहास अभ्यासक जगप्रसिद्ध अमेरीकन संशोधक आणि अत्यंत ज्येष्ठश्रेष्ठ इतिहासकार विल ड्युरांट आणि त्यांची पत्नी आणि नंतरची सहलेखिका एरियल ड्युरांट यांनी आपल्या आयुष्यातली किमान 30 वर्षे फक्त वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करण्यात, वेगवेगळे साहित्य, लेख, ताम्रपट, वस्तू, हस्तलिखिते, पोथ्या, कथा वगैरे जमवण्यात घालवली. मग एक एक करत जगभरातील संस्कृतींवरती अवाढव्य ग्रंथ लिहिले. विल ड्युरांटचे फक्त ‘History of civilization’चेच 11 खंड आहेत. ते त्यांनी 1935 ते 1975 या 40 वर्षांच्या काळात लिहिले आणि प्रसिद्ध केले. 20 इतर ग्रंथ आहेत; त्यापैकी पाच ग्रंथ तर त्याच्या मृत्यूपश्चात तब्बल दोन दशकांनी प्रसिद्ध केले गेले. सांगायचा मुद्दा असा की, लोक आपलं उभं आयुष्य खर्ची घालतात…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

