Author: Team Avaantar

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! अजून नवीन लिखाण घेऊन तुमच्यासाठी हजर होतेय. देवाने किडे, मुंग्या, पक्षी, प्राणी, फुले, फळे, मानव या सगळ्यांची निर्मिती केली. मानवाची निर्मिती जरा जास्तच मन लावून केली. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसक लिंगी अशी वर्गवारी झाली. नपुसक लिंगीच्या वाट्याला खूपच अवहेलना आली. Correct, हाच आजचा विषय. हिजडा, छक्का, two in one, अर्धनारी नटेश्वर… सतत काहीबाही बोलून त्यांना त्रासच दिला गेला. आज उलगडूया त्यांची कहाणी! एकेदिवशी कॉल आला. ताई एक फिल्म करतोय. कदाचित शॉर्टफिल्म म्हणा किंवा माहितीपट. तृतीयपंथीयांच्या आयुष्यावर आहे. त्यांच्या वस्तीमध्येच शूट करायचंय. फिल्म कराल का? थोडीशी चलबिचल झाली. तृतीयपंथीयांच्या वस्तीत जाऊन शूट करायचं? भीती सुद्धा वाटली. पण विषय,…

Read More

मंदार अनंत पाटील पिल्लू विकत घेऊन आम्ही सरळ टॅक्सी करून घरी येत होतो. आईने सहजच विचारले की, याचे नाव काय ठेवणार आहेस? नेमकी आमची टॅक्सी त्यावेळेस रीगल थिएटरवरून जात होती आणि माझ्या तोंडातून ‘रीगल’ नाव बाहेर पडले. पिल्लानेही मला लगेच प्रतिसाद दिला आणि आमचा ‘रीगल मंदार पाटील’ आमच्या घरी आला. पहिल्या दिवशी मी रीगलला घेऊन किचनमध्येच झोपलो. थोड्या कुरूबुरीनंतर तो पण माझ्या कुशीत येऊन जो पहुडला तो थेट सकाळीच उठला. मग सुरू झाला एक नि:स्वार्थी, अतिशय प्रेमळ आणि विलक्षण लाघवी सहवास… जणू काही माझी सावलीच बनून राहिला माझा रीगल… त्याच्या त्या करामती, सारखे माझ्याभोवतीच घुटमळणे, माझ्यावर सतत लक्ष ठेवून असणे…

Read More

आराधना जोशी 2003चा एप्रिल महिना… अवघ्या काही दिवसांवर त्यावेळच्या अल्फा मराठी आणि आता झी मराठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाहिनीवर दुपारी Live phone in program सुरू होणार होता. त्यासाठी कार्यक्रमाची EP अर्थात executive producer सुषमा पार्टेबरोबर कार्यक्रमाची रुपरेषा कशी असेल? कोणकोणते विषय घेता येतील? त्यासाठी कोणकोणते तज्ज्ञ बोलावता येतील? याबरोबरच कार्यक्रमाच्या Dry runs सुरू झाल्या होत्या. अचानक एका मिटिंगमध्ये सुषमाने आपण या कार्यक्रमाला सुलोचना दिदींना बोलावलं तर? असा प्रस्ताव मांडला. नुसता प्रस्ताव मांडून ती थांबली नाही तर, लगेच दिदींच्या घरी फोन करून कांचनताईंशी (सुलोचना दिदींची मुलगी) बोलून दिदींना भेटायची तारीख आणि वेळही नक्की केली. त्याप्रमाणे सुषमा, मी आणि या कार्यक्रमाशी निगडीत…

Read More

दिप्ती चौधरी आम्हाला बंगलोरला घेऊन जायचा निर्णय पक्का झाला; पण आणायाचे कसे? हा मोठा प्रश्न होता. प्राण्यांच्या प्रवासासाठी अनेक एजन्सी आहेत, जे घरातून उचलून नवीन ठिकाणी दारात आणून देतात. पण त्यांची एकच अट प्राणी पिंजऱ्यात घालून सुपूर्द करा आणि आमची तिथेच गोची होती! आम्ही आझाद परिंदे! कधी कुठे असू याचा काय भरवसा? बरं, मुंबई ते बंगलोर प्रवास करायचा तर आगाऊ बुकिंग केलेच पाहिजे. पण त्या दिवसाचा भरवसा देणार कोण? एकदा आवाजच्या कार्यकर्त्यांशी बोलताना आईने ही अडचण सांगितली. अगदी सहजपणे तिने सांगितले, “त्यात काय कठीण आम्ही आणून देऊ की! आमची टीम पकडण्यात एकदम माहीर आहे.. त्यांना पकडू डॉक्टरकडे नेऊन check up,…

Read More

शरद महाबळ अचानकपणे मुंबईतील एका वास्तूला भेट देण्याचा योग आला. जेमतेम 48 तासांच्या सहवासात आम्हा उभयतांना जी काही येथे सकारात्मक ऊर्जा मिळाली, त्या प्रेरणेतून मनाच्या गाभाऱ्यात जो हुंकार उमटला, त्यातूनच निर्माण झालेली ही सर्जनशीलता. या दाम्पत्याची थोडी पार्श्वभूमी विशद करतो. दोघांनाही सरितेची उपमा देतो आणि त्या रूपकातून त्यांचा मला उमजलेला जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करतो. या दोन्ही सरिता एकाच गावच्या. आपापल्या परीने आपापल्या जन्मदात्यांच्या संस्कारात वाहात होत्या. तरुण वयात त्यांच्यात नकळतपणे प्रेमाचा अंकुर फुलला… तो व्यक्त झाला आणि दोन्ही घरांतील वरिष्ठांकडून त्याला मंजुरी मिळाली…. आणि मग काय ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे…’ दोन्ही सरितांचा संगम होऊन, आपलं गांव सोडून त्या…

Read More

मंदार अनंत पाटील मी अगदी गेली 18 वर्षं या क्षणाची वाट बघत होतो, तो क्षण आणि नंतरचे तीन महिने, त्यात साठवलेले अविस्मरणीय क्षण… शब्दांकित करायचा हा एक प्रयत्न! भाग – 1 मनघरणी साधारण जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यात आईने प्रथमच आपणहून विचारणा केली गेली की, माझा व्हिसा कधी करशील? आणि आकाशाला गवसणी घातल्याचा भास झाला. कारण काही वर्षांपूर्वीच हा प्रश्न विचारणे मीच बंद केले होते. त्यामागे बरीच कारणे होती आणि मुख्य कारण मोठ्या वहिनींचे आजारपण आणि आईने तिची केलेली सुश्रुषा आणि देखभाल, हेच होते. दुर्दैव असे की, मोठया वहिनीला 2023च्या नोव्हेंबर महिन्यात देवाज्ञा झाली. यानंतर साधारण 2024च्या फेब्रुवारी महिन्यात भारत भेटीचा…

Read More

मानसी देशपांडे लेखनाचं जग हे किती सुंदर आहे हे मला व.पु. काळे यांचे विचार वाचल्यावर समजलं. तसं कवितेचं जग हे देखील तितकंच भावस्पर्शी आहे, हे शांता शेळके यांच्या कविता वाचून समजलं. जी व्यक्ती प्रेमात पडते त्यांचं विश्व हे किती रंगीबेरंगी असतं, तिथे क्षणिक रुसवे-फुगवे देखील असतात. कारण, प्रेमाच्या या जगात जितका सहवास महत्वाचा आहे, तितकंच एखादी व्यक्ती जेव्हा काही क्षणांसाठी जरी दूर होते, तेव्हा निर्माण होणारी हूरहूर सुद्धा लक्षात घेतली जाते. व.पु. या वर म्हणतात, “प्रतिक्षेचा क्षण नेहमीच मोठा असतो…” कसं असतं, प्रेमात वचनं असतात, जाणीवा असतात तसंच काही भेटी या नि:शब्द करणाऱ्या असतात. तुमची जवळची व्यक्ती तुमच्या समोर उभी…

Read More

शैलजा पुरोहित “आधी कळस मग पाया रे।” गाण्यातील ही उफराटी रीत पाहून मला खरंतर हसूच आलं. त्या कवीचं तरी काय चुकलं? सध्याच्या युगाची हीच रीत आहे, सर्वजण दिमाखात उभ्या असलेल्या, चमचमणाऱ्या कळसाला भुलतात. ज्या भक्कम पायावर तो कळस उभा असतो, तो मात्र त्यांच्या खिजगणतीतही नसतो. कळस डळमळू लागला की, प्रत्येकाला वाटतं याचा पाया पक्का असायला हवा होता. ज्याच्यावर एखादी गोष्ट स्थिरपणे उभी राहते तो पाया! आपल्या शरीराचा भार नि तोल सांभाळतात ते पाय! आम्हां दोघांमध्ये एका कानाचा फरक आहे. आमचं स्वरूपही वेगळं आहे, तरी आम्हा दोघांचे कार्य एकच आहे. आधारभूत होणं आणि स्थैर्य देणे! आपण ज्या घरात राहतो त्याचंच बघा…

Read More

मनोज पुष्पा, स्त्री, गोलमाल, सिंघम, मर्दानी, भूलभुलैया, ओह माय गॉड, जुडवा-2’ अशा अनेक सिक्वेल सिनेमांची बॉलिवूडमध्ये मोठी परंपरा आहे. नेटवर सर्च करताना ‘हंटरवाली’ (1935) आणि ‘हंटरवाली की बेटी’ (1943) हे दोन पहिले सिनेमे (सिक्वेल) असल्याची माहिती मिळाली. पण ‘जुडवा’ सिनेमांची परंपरा देखील बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत जुनीच आहे. ‘जुडवा’ म्हणजे संपूर्ण कथानकाचा किंवा स्टोरीलाइनचा जशाच्या तसा वापर. सर्वाधिक चर्चेत राहिलेला 1991 सालचा ‘दिल है के मानता नहीं’ या चित्रपटाचं कथानक पूर्णपणे उचललेलं आहे. हा सिनेमा राज कपूर आणि नर्गिस अभिनित ‘चोरी चोरी’ या पिक्चरची फ्रेम-टू-फ्रेम कॉपी आहे. यावर त्यावेळी खूप चर्चा झाली. इतकंच काय ‘दुसरे के बाप को अपना बाप…

Read More

नमस्कार मी हर्षा गुप्ते! अभिनेत्री आहे. माझा एक छान अनुभव शेअर करायचाय. हा विषय श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असा धरूच नका. एक मुलगा आहे… त्याचं असं म्हणणं आहे की, त्याला काही संकेत मिळतात. ते तो सगळ्यांना नाही सांगू शकत. पण मेसेज म्हणून तो मला फक्त काही शब्द पाठवतो आणि मी अंदाजाने वाक्य बनवते. खूप भयानक गोष्टी असतात त्या. उदाहरण द्यायचंच झालं तर… ऋषी कपूर गेले तेव्हा, त्यांचा आत्मा तो मृत्यू स्वीकारायला तयारच नव्हता. इरफान खान गेला तेव्हा, त्यांचा आत्मा थोडासा गोंधळलेला… की हे काय झालं! पण तेवढ्यात त्याला त्याच्या ओळखीचे काही आत्मे दिसले आणि त्याने त्याचा मृत्यू लगेच स्वीकारला. बरं, हा…

Read More