Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 25 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 15 जून 2025 वार : रविवार तिथि : चतुर्थी 15:51 नक्षत्र : श्रवण 24:59 योग : एन्द 12:18 करण : कौलव 27:44 सूर्य : वृषभ चंद्र : मकर सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:17 पक्ष : कृष्ण मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष गलवान खोऱ्यातील संघर्षाची पाच वर्षे एकीकडे संपूर्ण जग कोविड -19च्या महामारीला तोंड देत असताना भारत आणि चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष…
आनंद जोशी शाळेचा पहिला दिवस माझ्या कायम स्मरणात राहिला आहे! प्रत्येक वर्षी शाळेचा पहिला दिवस येत असे आणि शाळेत जाण्याची उत्सुकता मात्र कमी होत नसे! माझी शाळा मुंबईत मालाड पूर्वेला उत्कर्ष मंदिर होती. काळ साधारण 1980 ते 1985 मधला. 13 जून रोजी शाळा उघडत असे. पाऊस सुद्धा साधारण 13 जूनला येत असे. जीवनात सर्व बाबतीत ‘पर्याय’ कमी असल्यामुळे असेल, पण जीवन खूप सोपे आणि सुखाचे होते! मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही काका, मामांकडे किंवा गावाला आठ-दहा दिवस जाऊन राहत असू. तेव्हा फक्त ‘रिसॉर्ट’मध्ये जाऊन राहणे, हा एकमेव पर्याय नव्हता… मे महिन्याच्या सुट्टीत भरपूर आराम करून झाल्यावर मग शाळेचे वेध लागत असत!…
मनोज जोशी आयुष्यात आपण अनेकदा आत्मविश्वास दाखवत, त्याच आत्मविश्वासाने बोलत असतो.. व. पु. काळे यांचे एक वाक्य आहे – ‘दोन रुपये देऊन चपलेचा अंगठा शिवल्यावर साधारणपणे चर्मकाराकडे ‘पुन्हा तुटणार तर नाही ना?’ असे विचारून खातरजमा केली जाते. म्हणजेच, माणसाला प्रत्येकवेळी गॅरंटी हवी असते. पण अशी गॅरंटी मागणारा, किती काळ जगणार आहे, याची काहीच गॅरंटी नसते.’ वपुंचे हे कथन वास्तव असले तरी, हा विषय फक्त गॅरंटीपुरताच नाही. प्रत्येकजण दिवसातून अशा अनेक गोष्टी आत्मविश्वासाने करत असतो; जणूकाही गॅरंटीच असावी. आता हे सांगायचे काय कारण? असे वाटू शकते. पण त्याचाही संदर्भ आहे. अलीकडेच तसा विचार माझ्या मनात येऊन गेला. विषय अगदी साधा होता.…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 24 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 14 जून 2025 वार : शनिवार तिथि : तृतीया 15:46 नक्षत्र : उत्तराषाढा 24:21 योग : ब्रह्मा 13:12 करण : बव 27:51 सूर्य : वृषभ चंद्र : मकर सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:16 पक्ष : कृष्ण मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय 10:02 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मेष राशीच्या जातकांना कामामध्ये मोठे यश मिळेल. मात्र त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. एखाद्या…
संजय श्रीराम जोग ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे 13 जून या इंग्रजांना त्याज्य अशा 13 तारखेला आमच्या वेळेस शाळा नेमेचि सुरू व्हायची. उन्हाळ्याने त्रासलेले मुंबईकर ज्या ओढीने आभाळाकडे डोळे लावतात, त्याच चातकाच्या ओढीने सुट्टीचे अजीर्ण झालेले विद्यार्थी 13 जूनची वाट पहायचे. 1 तारखेपासूनच याची आद्य तयारी सुरू व्हायची. नवा युनिफॉर्म, नवी पुस्तके वह्या, दप्तर आणि रेनकोट असा जामानिमा असायचा. जूनच्या 7 तारखेला मृग नक्षत्र लागूनही बरेचदा पाऊस लांबायचा आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागताला हजर व्हायचा. कमालीचा दुर्मिळ योगायोग पहा की, मातीत पडणार्या पहिल्या थेंबाने दरवळणारा सुगंध आणि कोर्या वह्या-पुस्तकांचा सुगंध एकाच दिवशी घ्यायला मिळायचा. आमच्या पार्ले टिळक विद्यालयात, रोज शाळा…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 23 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 13 जून 2025 वार : शुक्रवार तिथि : द्वितीया 15:18 नक्षत्र : पूर्वाषाढा 23:20 योग : शुक्ल 13:47 करण : वणीज 27:35 सूर्य : वृषभ चंद्र : धनु 29:37 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:16 पक्ष : कृष्ण मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. सहजपणे भांडवल उभे करू शकाल, राहिलेली देणी परत येतील किंवा…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा तुमच्या भेटीला आलेय. गोष्ट आहे, सदाफुली झाडाची! बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा… बालपणीचा काळ सुखाचा… हे सगळं ऐकायला किती छान वाटतं… पण मोठेपणीच! लहान असताना नाही. लहान मुलांना नाही म्हटलं तरी, सतत काही ना काही प्रश्न पडत असतात. मलाही पडायचे. पण त्याची उत्तरे काही मिळायची नाहीत. ‘गप्प बस, काय सारखं डोकं खाते…,’ असेच म्हणायचे सगळे मला. पण तेच सर्व, माझी मुले मोठी होत असताना मला मात्र, सांगायचे की, ‘मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देत जा, टाळू नको!!’ हल्लीच्या मुलांना प्रश्न पडला तर, त्यांना उत्तर द्यायलाय गूगल बाबा किंवा गूगळीण मावशी आहेच! गिरगावातलं आमचं घर तसं…
आराधना जोशी पुल स्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर, आनंदयात्रा मिळाली, निराशेतून माणसे मुक्त झाली, जगू लागली, हास्यगंगेत न्हाली असं वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी ज्यांच्याबद्दल केलं आहे, त्या पु. लं.ना जाऊन आज 25 वर्षे झाली. 8 नोव्हेंबर 1919 साली जन्मलेल्या पु. लं.मध्ये थक्क करणारं गुणांचं वैविध्य तर होतंच, पण त्या प्रत्येक गुणात गाठलेला अभिनंदनीय दर्जा, विस्मित करणारी लोकप्रियता आणि या सर्वांपलिकडे जाऊन झगमगणारं नैतिक तेज तसेच माणुसकी कायमच दिसून आली. अशा या पुलंना दोन मिनिटांसाठी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता तो रत्नागिरीच्या समुद्रकिनारी. कोळंब्याहून रत्नागिरीला होडीने प्रवास करून आम्ही किनाऱ्याला लागत होतो आणि समोर साक्षात सुनीताबाई आणि पुलं. त्यांनीही…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 22 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 12 जून 2025 वार : गुरूवार तिथि : प्रतिपदा 14:27 नक्षत्र : मूळ 21:56 योग : शुभ 14:04 करण : तैतील 26:56 सूर्य : वृषभ चंद्र : धनु सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:16 पक्ष : कृष्ण मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – विनयशील वागण्याचे कौतुक होईल. योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक लाभ मिळवून देण्याची शक्यता आहे. संघर्ष विनाकारण वाढणार नाही, याची…
अजित गोगटे कल्याण येथे माझे वास्तव्य आणि नोकरी मुंबईत. सन 1978 ते सन 2020 अशी तब्बल 42 वर्षे मी कल्याण ते बोरिबंदर (आताचे सीएसएमटी) अशी दैनंदिन ये-जा मध्य रेल्वेच्या लोकलने केली. कल्याण ते बोरिबंदर हे रेल्वेचे अंतर 56 किमी आहे. मी सरासरी महिन्याला 25 दिवस कामावर गेलो, असे गृहित धरले तरी, या काळात मी लोकलने केलेल्या एकूण प्रवासाचे अंतर 14 लाख 11 हजार 200 किमी एवढे होते. परंतु मध्यंतरीची सलग 12 वर्षे मी तिकीट किंवा मासिक / त्रैमासिक पास न काढता हा लोकलचा प्रवास केला. म्हणजे, माझा विनातिकिट केलेला प्रवास सुमारे चार लाख तीन हजार 200 किमी एवढा होता. मी…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 246
- अवांतर 174
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 16
- ललित 508
- वास्तू आणि वेध 360
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

