Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…
    ललित

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    पराग गोडबोलेBy पराग गोडबोलेApril 13, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मुंबई लोकल ट्रेनप्रवास, विद्यार्थ्यांचा लोकल ट्रेनप्रवास, विद्यार्थ्याचे गाडी घेण्याचे स्वप्न, विद्यार्थ्याचा विश्वास, कुशल कुंभाराची गरज, होतकरू बाळाचे पाय पाळण्यात, छोट्यांची मोठी स्वप्ने
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी (प्रातिनिधीक)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    जवळपास दोनएक महिन्यांपूर्वीच गोष्ट. शनिवार होता आणि दुपारच्या वेळेस ऑफिसला चाललो होतो. सुट्टीच्या दिवशी दुपारी, हक्काची वामकुक्षी सोडून ऑफिसला जाणं म्हणणे फारच जीवावर येणारं काम… पण जायला हवंच होतं. निघालो होतो, अनिच्छेनेच! ठाकुर्ली स्टेशनला गाडी मिळाली. अगदी तुरळक माणसं होती गाडीला. माझ्याच डब्यात स. वा. जोशी शाळेची चार-पाच मुलं चढली. हल्ली अशी बरीच मुलं रोज लोकलने दिव्याहून डोंबिवलीपर्यंत प्रवास करून शाळेत येतात. बेसुमार आणि अनियंत्रित वाढ झालेल्या अन् ठाणे महानगर पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या, दिवा नावाच्या बकाल गावात असलेली सुविधांची वानवा, हे मुख्य कारण!

    या मुलांमुळेच आज जोशी शाळेची धुगधुगी अजूनही टिकून आहे. अन्यथा, इंग्रजी माध्यमाच्या दबावाखाली,  कित्येक सुदृढ पिढ्या घडवलेली ही शाळा कधीच इतिहासजमा झाली असती. प्रथम वर्गाच्या डब्यात चढलेली ही पाचवी-सहावीतली मुलं, माझ्यासमोरच येऊन बसली.  मुलांच्या बालसुलभ गप्पा सुरू होत्या आणि गाडीला अजिबात गर्दी नसल्याने, त्या मला अगदी सहज ऐकू येत होत्या. पुस्तकातलं माझं लक्ष साहजिकच त्यांच्याकडे वळलं. मी पुस्तक मिटलं आणि ऐकू लागलो त्यांच्या सुरस गप्पा…

    मी बसलो होतो तिथेच बाजूला,  सारस्वत बँकेची ‘कार लोन’ची जाहिरात डकवलेली होती. त्यात दोन उच्च श्रेणीच्या गाड्या आणि कर्जाशी संबंधित इतर माहितीसुद्धा होती. ती जाहिरात बघून त्यांची चर्चा या गाड्यांकडे वळली आणि त्यांच्यातला एक काळा सावळा, चुणचुणीत मुलगा म्हणून गेला, “मी मोठा झाल्यावर,  ती काळी गाडी आहे ना, तशी गाडी घेणार.”

    “गपरे तू, काय पण बोलू नकोस!” बाकीच्या मुलांचा त्याच्यावर हल्ला.

    पण तो परत ठासून म्हणाला, “नाय! मी घेणार म्हणजे घेणार.”

    आत्तापर्यंत श्रवणभक्ती करत असलेला मी,  त्यांच्या संवादात हलकेच सहभागी झालो आणि म्हणालो त्याला, “अरे, महाग असतात या गाड्या. परवडत नाहीत त्या आपल्याला. खूप पैसे कमवावे लागतात, अशी गाडी घेण्यासाठी.”

    हेही वाचा – पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    “काका, मी खूप शिकेन, मेहनत करेन… पण तशी गाडी मी घेणार म्हणजे घेणार!”

    एवढ्या लहान वयातलं ते सुस्पष्ट लक्ष्य मला आवडून गेलं.

    आमच्या लहानपणी, मी डॉक्टर होणार किंवा मी इंजिनीअर होणार, यापुढे जाऊन असं पोपटाच्या डोळ्यासारखं लक्ष्य ठेवण्याची आमची कुवतच नव्हती,  किंवा कोणाचीही तेवढी दूरदृष्टीही नव्हती! स्वतःला कुठे जायचंय, ते आत्ताच ठरवून ठेवणारा तो नव्या पिढीतील मुलगा, आवडून गेला मला एकदम… त्याच्या बोलक्या डोळ्यांमधली चमक मोहवणारी होती, लक्षवेधी होती आणि जाणवत होती ती मला, त्याच्याकडे बघताना.

    मी वाचत असलेल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर रतन टाटा आणि सायरस मिस्त्री या दोघांचे फोटो होते. मी सहजच विचारलं मुलांना, “ठाऊक आहेत का, कोण आहेत हे?”

    इतर मुलं शांत, हा एक तेवढा म्हणाला, “ते चष्मेवाले कोण ते नाही माहीत, पण ते दुसरे रतन टाटा आहेत, नॅनो गाडीवाले.” माझ्या शाबासकीची थाप आपसूक गेली त्याच्या पाठीवर. कौतुक वाटलं मला त्याचं अतोनात…

    “ते दुसरे आहेत ते सायरस मिस्त्री, तुला नसतील ठाऊक, पण वाच त्यांच्याबद्दल, जमलं तर. आता हे दोघेही नाहीत या जगात.”

    “काका, तुम्ही इंग्रजी पुस्तक वाचता,  मला पण येईल वाचता?”

    परत एकदा मला जाणवला सच्चेपणा त्याच्या स्वरात, जाणवली कळकळ आणि उमेद.

    “येईल की, का नाही येणार? प्रयत्न केला की सगळं जमतं.”

    खूश झाली स्वारी हे ऐकून आणि मस्त दिलखुलास हास्य अवतरलं त्याच्या चेहऱ्यावर… मलाही माझ्या नकळत हसू आलं.

    ठाकुर्ली ते दिवा हा जेमतेम दहा मिनिटांचा प्रवास, पण आज दिव्याच्या आधी गाडी दोन-तीन मिनिटं थांबली होती आणि या उण्यापुऱ्या बारा-तेरा मिनिटांत, मला उद्या प्रकाशात येऊ पाहणारा एक हिरा, लख्ख चमचमताना दिसला होता.

    हेही वाचा – बल्लव! म्हातारी मेल्याचं दुःख नाही…

    दिवा स्टेशन आलं तेवढ्यात आणि ती मुलं पटापटा उठून उभी राहिली. मी भरभरून आशीर्वाद दिला त्या अनामिक, छोट्या दोस्ताला… ती मुलं गाडीतून उतरून गेली, माझ्या मनावर तरंग उमटवत.

    खरंच, कशी असेल त्याची भविष्यातील वाटचाल? होईल तो मोठा आणि घेईल त्याच्या स्वप्नातली कार, का ‘गाडीच्या पायदानां’शी झुंजण्यात आयुष्य जाईल त्याचं? प्रश्न अनेक होते, पण उत्तर येणारा काळच देणार होता.

    नव्या पिढीच्या, होतकरू बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते, हे मात्र वादातीत सत्य. खरोखर होत्या उद्याच्या आशा आणि उद्याची स्वप्नं,  त्याच्या भिरभिणाऱ्या पाणीदार डोळ्यांमध्ये… या ओल्या मातीला आकार देणाऱ्या, कुशल कुंभाराची गरज होती फक्त!

    पराग गोडबोले

    मोबाइल - 9323277620

    Related Posts

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    April 13, 2026 ललित

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026 ललित

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    By शोभा भडकेApril 13, 2026

    भाग – 22 खूप वेळ आरू रडत होती. बऱ्याच वेळानंतर भावनाने तिला उठवून बेडवर बसवलं…

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    April 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 266
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 383
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 551
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.