मेष
या आठवड्यात सकारात्मक गोष्टी घडतील. नोकरदारांना नवीन संधी मिळतील. सुट्टी सहज मंजूर होईल. नवीन जॉब स्वीकारला असेल तर, सुट्टीत फिरून या, कुटुंबाला चांगला वेळ द्या. व्यावसायिक वर्गाला कामाचा ताण जाणवेल. विशेषत:, नवीन ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. यासाठी हाताखालील लोकांच्या मागे लागून काम पूर्ण करावे लागेल. महिलांना सासरची माणसे भेटतील. काही नवीन घडामोडी घडतील आणि त्यामुळे आनंदी रहाल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकेल. याचसाठी त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा.
वृषभ
हा आठवडा फायद्याचा असेल. आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे योग्य फळ नोकरदारांना या आठवड्यात मिळेल. ऑफिसमधील वातावरण चांगले राहील. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने व्यवसाय विस्तारासाठी योग्य कालावधी आहे. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. महिलांना घरातील ज्येष्ठ व्यक्तीची विशेष काळजी घ्यावी लागेल. अतिआत्मविश्वास घात करू शकतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.
मिथुन
या राशीच्या जातकांना सरकारी योजनांमधून फायदा होईल. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. नोकरदारांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. वरिष्ठ आणि सहकारी यांचे त्यांना योग्य सहकार्य मिळेल. व्यावसायिक वर्गाला नवीन पर्याय शोधावा लागेल. विशेषत:, तुमच्या छंदातून व्यवसाय करू शकाल, चांगला नफा होईल. महिलांना अपेक्षित घटना घडून लाभ होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल, याबाबत मोठ्यांचे मार्गदर्शन मिळेल.
कर्क
या आठवड्यात व्यावसायिक वर्गाला चांगला धनलाभ होईल. कामाबद्दल नोकरदारांचे कौतुक होईल. शिवाय, प्रमोशन आणि पगारवाढ मिळेल. व्यवसायिक वर्गाला व्यवसायात तेजी जाणवेल. अशा वेळी तज्ज्ञ व्यक्तीची मदत घ्यावी लागेल. नवीन योजना लाभदायक ठरतील. व्यवसाय करणाऱ्या महिलांना या आठवड्यात फायदा होईल. विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.
सिंह
या आठवड्यात कलाकार आणि बुद्धिजीवी मंडळींना फायदा होईल. नोकरदारांना कामाचा खूप ताण जाणवेल. कारण, जास्त काम करावे लागेल आणि सतत ओढताण होईल. त्यातून कुटुंबाला वेळ देता येणार नाही. व्यावसायिक वर्गाला मानसन्मान मिळेल. तसेच, नवीन कामे मिळतील आणि आर्थिक प्रगती होईल. त्याचबरोबर स्पर्धकांवरही लक्ष ठेवा. महिलांचे जोडीदाराबरोबर वाद-विवाद होऊ शकतात, म्हणून सांभाळून बोलावे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्यावर लक्ष द्यावे. वेळेवर जेवण आणि व्यायाम करा. उन्हात फिरू नका.
हेही वाचा – जाडेपणाबद्दल ओळखणारी रुंजी कॉलेजमध्ये गेली अन्…
कन्या
या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या, पथ्य पाळा. सरकारी कामात नोकरदारांचा वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी कामाकडे लक्ष द्या. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत समाधानकारक स्थिती राहील. व्यवसायात भागीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. महिलांनी वादविवाद टाळून शांत रहावे, तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आनंदी रहाल.
तुळ
या आठवड्यात भाग्योदय होईल. नोकरदारांना जॉब बदलणे शक्य होईल. नवीन जॉब मिळेल. कामाच्या ठिकाणी स्पर्धेचे वातावरण असेल. अशा वेळी ठाम रहा, यश नक्की मिळेल. व्यावसायिक वर्गाचे उत्पन्न वाढेल. परिणामी उत्साही वातावरण राहील. मनाप्रमाणे खर्च करू शकाल. नवीन वर्षाच्या भेटी देऊन स्टाफला खूश ठेवा. महिलांच्या बाबतीत स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटतील. शिवाय, माहेरूनही लाभ होईल. विद्यार्थ्यांनी वाहन जपून चालवावे. तसेच, मित्रांनाही स्वतःचे वाहन चालवायला देऊ नका.
वृश्चिक
या आठवड्यात वादविवाद टाळा. कामाचा ताण वाढल्यामुळे नोकरदांची चिडचिड होईल. नवीन गुंतवणुकीच्या बाबतीत काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तुमचेच सहकार्य मागितले जाईल, पण आधी स्वतःचे काम करून नंतर सहकार्य करा. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत भागीदाराच्या मताला प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरेल. त्यातून संभाव्य मतभेद टाळा, तेव्हाच प्रगती होईल. महिलांना वैवाहिक जीवनात आनंद वाटेल, प्रिय व्यक्तीचा भाग्योदय होईल. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमधून नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
धनु
या आठवड्यात नोकरीविषयीचे प्रश्न सुटतील. नोकरदारांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील. यासाठी ओळखी किंवा मध्यस्थीचा उपयोग होईल. व्यावसायिक वर्गाने सरकारी नियम काटेकोरपणे पाळावेत. कामगार वर्ग तसेच इतर लोकांवर लक्ष ठेवा. तरुण-तरुणींचे विवाह जमतील. काहींचे प्रेमविवाह होतील. महिलांना नवीन मैत्रिणी आणि नवीन काम मिळेल, त्याचा चांगला फायदा करून घ्या. परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य कालावधी आहे.
मकर
या आठवड्यात महत्त्वाचे करार होतील. नोकरदारांना सहकारी तसेच वरिष्ठ यांचे सहकार्य मिळेल. शिवाय, आधी केलेल्या कामाचेही श्रेय मिळेल आणि गौरवास पात्र ठराल. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत महत्त्वाचे करार होतील. नवीन भागीदारीबाबत विचारणाही होईल. विद्यमान भागीदारीत चांगला फायदा होईल. कुटुंब-परिवारात वरिष्ठ सदस्याचा आजार वाढू शकतो, हा महिलांच्या दृष्टीने चिंतेचा विषय असू शकतो. काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित करावे.
कुंभ
या आठवड्यात मनाप्रमाणे गोष्टी घडतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नोकरदारांकडून नवीन कामे हातात घेतली जातील आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील. याबाबतीतल वरिष्ठांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने व्यवसायात स्थिरता येईल. तसेच, जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात बऱ्यापैकी उलाढाल होऊन चांगला फायदा होईल. महिलांच्या दृष्टीने कुटुंबात चांगले वातावरण राहील. मुलांचे प्रश्न संपुष्टात येतील. विद्यार्थ्यांना सरकारी योजनेचा फायदा घेता येईल. याबाबत मित्र मदत करतील.
हेही वाचा – गणपत वाणी… काल आणि आज!
मीन
या आठवड्यात शुभ घटना घडतील. नोकरदारांना चांगल्या बातम्या मिळतील. नव्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळेल. त्यामुळे कामात बिझी रहाल. भागीदाराबरोबर गैरसमज होणार नाही, याची काळजी व्यावसायिक वर्गाने घ्यावी. तरच, व्यवसायात प्रगती होऊ शकेल आणि सुवार्ता मिळतील. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. महिलांना कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद मिळतील. तसेच, वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न सुटतील. विद्यार्थ्यांनी वाहने जपून चालवावे. दुचाकीवर ट्रिपल सीट घेऊ नका, कायद्याचे पालन करा.


