Tuesday, March 10, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधसाप्ताहिक राशीभविष्य : 08 ते 14 मार्च 2026

साप्ताहिक राशीभविष्य : 08 ते 14 मार्च 2026

मेष

या आठवड्यात तुमच्या जोडीदाराचा भाग्योदय होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या नोकरीत बदल होऊ शकतो. नोकरीसंदर्भात आधी दिलेल्या मुलाखतीचे उत्तर येईल. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. व्यावसायिक वर्गाची रखडलेली कामे मार्गी लागतील. कायदेशीर निर्णय तुमच्या बाजूने लागतील. वडिलोपार्जित संपत्तीविषयी महिलांचे वाद मिटतील. मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा.


वृषभ

या आठवड्यात सकारात्मकता अनुभवू शकाल. नोकरदारांना नवीन प्रोजेक्ट मिळतील. आधी केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळेल आणि कौतुक होईल. व्यावसायिक वर्गाकडून नवीन संकल्पना राबविल्या जातील आणि त्याद्वारे व्यवसायाला चांगला दर्जा मिळवून देतील. जुनी येणी वसूल होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल. महिलांनी विनयाने वागावे, घरात एखादे मंगलकार्य ठरेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.


मिथुन

या आठवड्यात उत्साही वातावरण राहील. नोकरदारांना अवघड परिस्थितीतून चांगला मार्ग काढता येईल. धार्मिक कार्यात सक्रिय योगदान देऊ शकाल. नवीन संधी मिळतील. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने फायद्याचे सौदे समोरून येतील. आर्थिक प्रगती करू शकाल. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे लग्न ठरतील. महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे, उन्हाळ्याचा त्रास संभवतो. विद्यार्थ्यांना राजकीय किंवा सहकारी लाभ मिळू शकेल.


कर्क

या आठवड्यात शुभ ग्रहाची साथ मिळेल. नोकरदारांना कामाचा ताण असला तरी, मनाप्रमाणे कामे होतील. तथापि, कायदेशीर प्रकरणात सावध रहावे. कागदपत्रे आणि वाहन सांभाळून ठेवा. व्यावसायिक वर्गाकडून केले जाणारे नवीन नियोजन, व्यवसायाला फायदेशीर ठरेल. त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायाबाबतची चिंता मिटेल. महिलांनी कुटुंबात आणि कार्यक्षेत्रात समतोल राखणे गरजेचे आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना अवघड परिस्थितीतून मार्ग काढता येईल. त्याचबरोबर कुसंगत टाळावी.


सिंह

या आठवड्यात आत्मविश्वास वाढेल. नोकरदारांना संवाद आणि बुद्धिचातुर्यामुळे नवीन प्रोजेक्ट मिळतील. स्पर्धकांवर मात करू शकाल. कामानिमित्त प्रवास कराल. व्यावसायिक वर्गाला भागीदारीतून लाभ मिळेल. स्वतःच्या जागेत व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन करू शकाल. महिलांच्या बाबतीत वैवाहिक जीवनात आनंद देणाऱ्या घटना घडतील. आवडत्या क्षेत्रात काम करण्याची विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण होतील.

हेही वाचा – वाचनसंस्कृती वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तात्या अन् माधवची गोष्ट


कन्या

या आठवड्यात अनुकूल ग्रहमान लाभदायक ठरतील. नोकरदारांना स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. कलाकार, बुद्धिजीवी व्यक्तींना प्रसिद्धी आणि लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाचे वास्तुविषयक प्रश्न मार्गी लागतील. सार्वजनिक जीवनात वावरताना कामास काम हेच धोरण ठेवा. अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. महिलांसाठी कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घरात दुरुस्तीची कामे निघतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल.


तुळ

या आठवड्यात तरुणांचे प्रश्न सुटतील. नवीन संधी मिळून कारकीर्द सुरू होईल. नोकरदारांच्या बाबतीत अपेक्षित घटना घडतील. बदली होण्याची शक्यता आहे. परदेशातून नोकरीच्या संधी येतील. व्यावसायिक वर्गाने ऑनलाइन व्यवसाय सुरू केल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. होणाऱ्या फायद्यातून आर्थिक बचत करा, अनाठायी खर्च करू नका. महिला स्वतःचे घर घेऊ शकतील, प्रयत्न नक्की करा. विद्यार्थ्यांना नेत्रदीपक यश मिळू शकेल, पण मेहनतही तेवढीच करावी लागेल.


वृश्चिक

या आठवड्यात दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. महत्त्वाच्या व्यक्तींशी नोकरदारांच्या भेटीगाठी होतील. त्यातून काही प्रश्न सुटतील. सर्वांना मान्य असा तोडगा निघेल. व्यावसायिक वर्गाकडून महत्त्वाचे पत्रव्यवहार आणि करार होतील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात उत्साहाने भाग घ्याल. आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. महिलांना भावंडांचे सहकार्य मिळेल. त्याचबरोबर नाती दुखावली जाणार नाहीत, याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळू शकेल.


धनु

या आठवड्यात नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरदारांच्या बाबतीत प्रमोशन आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कामाचे कौतुक होईल. नवीन जबाबदारी मिळेल. व्यावसायिक वर्गाला कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कामे वेगाने पूर्ण करू शकाल. स्पर्धकांवर विजय मिळवू शकाल. महिलांचा लोकसंग्रह वाढेल. कुटुंबात वृद्धी होईल. विद्यार्थ्यांना कुटुंबाचे आणि मित्रांचे सहकार्य मिळेल. राजकारणी लोकांशी सांभाळून रहावे.


मकर

या आठवड्यात घरात महत्त्वाचे काम करावे लागेल. नोकरदारांना अपेक्षित लाभ मिळतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. त्यासाठी पैसा आणि वेळ जाईल. सुवार्ता मिळतील. व्यावसायिक वर्गाची रखडलेली कामे सुरू होतील. ओळख आणि मध्यस्थीने कामे मार्गी लागतील. महिलांना मैत्रिणीकडून मदत मिळेल. छोटे प्रवास होतील. विद्यार्थ्यांना परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर, त्यासाठी चांगला कालावधी आहे. प्रामाणिक कष्ट करायची तयारी ठेवा.


कुंभ

या आठवड्यात आत्मविश्वास वाढेल. नोकरदारांची हातात घेतलेली कामे सहज पूर्ण होतील. यश मिळेल, त्यामुळे  नवी उमेद आणि उत्साह येईल. त्याचबरोबर खर्चाचे प्रमाण वाढेल. कुटुंबाकडून वाढत्या मागण्यांसाठी मांडल्या जातील. व्यावसायिक वर्गाला आयत्या वेळी अनावश्यक खर्च करावा लागेल. उधार आणि उसने पैसे देण्याचे टाळा. व्यवसायात मोठा खर्च होईल. महिलांच्या बाबतीत घरात आनंदी वातावरण राहील. धार्मिक सोहळ्यात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांना कुटुंबाकडून तसेच गुरूंचे योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. आशीर्वाद मिळतील.

हेही वाचा – पुरस्कार… एक नवा हुरूप देणारा!


मीन

हा आठवडा कलाकार आणि खेळाडू यांच्यासाठी चांगला आहे. समज-गैरसमज यांचा नात्यांवर परिणाम होणार नाही, याची काळजी नोकरदारांनी घ्यावी. सगळी कामे सुरळीत होतील. व्यावसायिक वर्गाला भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल. आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुस्थितीत येईल. जेवढे परिश्रम घ्याल, त्यापेक्षा जास्त फायदा मिळेल. महिलांना सुवार्ता मिळतील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळेल. जेवढी मेहनत कराल, तसा फायदा होईल.

prajaktakathe3970@gmail.com


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!