Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 ऑक्टोबर 2026

    October 17, 2026

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    October 16, 2026

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    October 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » एक अकेला इस शहर में…
    फिल्मी

    एक अकेला इस शहर में…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 27, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, अमोल पालेकर, अमोल पालेकरचा अभिनय, अमोल पालेकरचा साधेपणा, अमोल पालेकरच्या भूमिका, सामान्यांचा हीरो, अमोल पालेकर हीरो, अमोल पालेकरचे हीट चित्रपट,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    हिंदी अन् मराठी चित्रपटातील काही कलाकार असे आहेत की, जे कायम त्यांच्या अभिनयामुळे किंवा त्यांच्या विशिष्ट भूमिकांमुळे मनात घर करून राहतात. याच हीरोंच्या यादीमध्ये अमोल पालेकर येतो. दिसायला जरा बरा हो! बराच म्हणावा लागेल! कारण अगदी चॅाकलेट हीरो वगैरे मटेरिअल तो कधीच वाटला नाही, तरीपण तो त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सिनेमांमुळे लक्षात राहतो. अमोल पालेकर हा प्रेक्षकांना पडद्यावर नेहमी “Boy to next door” म्हणजेच अगदी आपल्या शेजारचा ओळखीचा मुलगा वाटला. अमोल पालेकरच्या बहुतेक भूमिका नेहमी मध्यमवर्गीय काटकसरी आणि टिपिकल मुंबईकर राहणीमान असलेल्या तरुणाच्या आहेत. रजनीगंधा, घरौंदा, गोलमाल, अपने पराये, छोटी सी बात, नरम गरम, चितचोर, दो लडके दोनो कडके इत्यादी सिनेमांत त्याने केलेले शामळू मध्यमवर्गीय तरुणाचे रोल्स नेहमीच छान वाटले किंवा तो केवळ मध्यमवर्गीय तरुणाच्या भूमिकांसाठीच सिने इंडस्ट्रीत आला असावा असं वाटतं.

    घरौंदा या चित्रपटात तर त्याने इतकं अप्रतिम काम केलं आहे की, या कथेमध्ये एका दृश्यात झरीना वहाब जेव्हा त्याच्याकडे परत येण्यास नकार देते, खरंतर तिथे अमोल पालेकरची चूक असताना देखील डॉक्टर श्रीराम लागूंचा राग येतो आणि झरीना वहाबसारखी बाई लालची वाटते. तिथे त्याच्या स्वप्नांचा चुराडा झालेला असतो आणि त्यामुळे प्रेमभंगामुळे तो पूर्णपणे कोलमडलेला दिसतो. प्रेमात विफल झालेल्या हीरोची वैफल्यग्रस्त अवस्थेतील भूमिका अमोल पालेकरने त्या सिनेमात इतकी अप्रतिम वठवली आहे की, त्याला तसं पाहून वाईट वाटतं. त्या हताश परिस्थितीत तो पालेकर जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर ‘एक अकेला इस शहर में…’ हे गाणं म्हणत फिरतो, तेव्हा तो सीन पडद्यावर पाहताना आपलंच ‘दिल खाली खाली बर्तन…’ आहे की, काय असं वाटतं… इतका त्याचा अभिनय जबरदस्त आहे.

    हेही वाचा – Nostalgia : निगाहें मिलाने को जी चाहता हैं…

    अमोल पालेकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मराठी प्रायोगिक रंगभूमीवरून केली. सत्यदेव दुबे यांच्यासोबत त्यांनी अनेक नाटके केली. चित्रपटसृष्टीत त्यांचे पदार्पण 1971मध्ये ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या मराठी चित्रपटातून झाले. तर, हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना खरी ओळख बासू चॅटर्जी यांच्या ‘रजनीगंधा’ (1974) या चित्रपटाने मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले.

    ‘रजनीगंधा’मध्ये विद्या सिन्हासोबत त्याची जोडी परफेक्ट मॅच वाटते. विद्या सिन्हापण त्याला साजेशी हीरोईन! रजनीगंधा या सिनेमात सिम्पल जॅार्जेट नाही तर, शिफॅानच्या कलरफुल प्रिन्टेड साड्या नेसलेली साधीच परंतु अवखळ विद्या… दिसायला विशेष आकर्षक नसलेला, परंतु फक्त टपोरे डोळे असलेल्या त्याच्या साध्या व्यक्तिमत्वाने भारलेली आणि कदाचित त्याच्यासारखाच मनमीत शोधणारी त्याची प्रेमिका म्हणून अमोल पालेकरसोबत विद्या नेहमीच छान वाटली.

    ‘छोटी सी बात’ या सिनेमात आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी ‘जानेमन जानेमन तेरे दो नयन…’ हे गाणे म्हणत अमोल पालेकर जेव्हा विद्या सिन्हाच्या मागे मागे फिरतो, तेव्हा त्याचा सहज सुंदर अभिनय मस्त वाटतो. त्या सिनेमात विद्या सिन्हा ॲाफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करणारी अगदी साधी टिपिकल मुलगी वाटत असूनही ती तिच्या साध्या राहणीमानात देखील चंचल वाटते… तितकाच अमोल पालेकर साधा भोळा आणि कॅामन मॅन असूनही भाव खाऊन जातो! आता ही त्या गीतकाराच्या शब्दाची जादू म्हणा किंवा संगीताचा परिणाम म्हटला तरी, अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा यांच्यामुळे ते गाणे अजरामर झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

    बरं, त्याचा प्रत्येक सिनेमातील अवतार एकदम साधा सिम्पलच बरं का! एलिफंटा स्टाईलचा बेलबॅाटम, त्यावर चेक्सचा किंवा पांढरा लायनिंगचा शर्ट, पायात बूट, तेल लावून चापून चोपून पाडलेला भांग, डोळ्यावर कधीकधी मोठ्या फ्रेमचा चष्मा असायचा तरी, तो त्यामध्ये भारी वाटायचा.

    ‘बातों बातों में’ या सिनेमात टिना मुनीम सोबत फ्रेन्च कट दाढीमधला ख्रिश्चन अमोल पालेकर अगदी मुंबईतला मध्यमवर्गीय अपटुडेट यंग मॅन वाटला. झरीना वहाब सोबत चितचोरमध्ये ‘जब दीप जले आना…’ म्हणता म्हणता हा प्रेक्षकांचे मन कधी चोरून नेतो, ते त्यांनाही कळत नाही! इथे येसुदासने त्याच्या स्वरसाजाने पालेकरला रोमॅन्टिक हीरो बनवले आहे! त्याचा दुहेरी भूमिका असलेला, उत्पल दत्तसोबतचा कॉमेडी थीम असलेला ‘गोलमाल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. त्या सिनेमातील किशोर कुमारने गायलेले ‘आने वाला पल जाने वाला है…’ हे गाणं आजही सुपरडुपर हिट गाणे म्हणून ओळखले जाते. अमोल पालेकरला ‘गोलमाल’ चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

    हेही वाचा – मनात बहरलेला गुलमोहर!

    केवळ अभिनयावर न थांबता त्याने दिग्दर्शनातही आपली मोहोर उमटवली. सामाजिक आणि संवेदनशील विषयांवर चित्रपट हाताळले :

    • आक्रीत (मराठी) : मानवी स्वभावाचा गडद पैलू मांडणारा चित्रपट.
    • थोडासा रूमानी हो जाये : कविता आणि कल्पनाशक्तीवर आधारित एक वेगळा प्रयोग.
    • बनगरवाडी हा त्यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे!
    • पहेली (हिंदी) : शाहरुख खान अभिनीत या चित्रपटाला भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका मिळाली होती.
    • धूसर (मराठी) : ज्याला महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले.

    थोडक्यात काय तर, 70 आणि 80च्या दशकात जेव्हा पडद्यावर ‘अँग्री यंग मॅन’ची लाट होती, तेव्हा अमोल पालेकर याने चित्रपटात मध्यमवर्गीय माणसाच्या साध्या, सरळ आणि विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या अभिनयाचे वैशिष्ट्य म्हणजे, अतिशय नैसर्गिक आणि सहज वावर. तो कधीही ‘स्टार’ वाटला नाही, तर आपल्याच ओळखीचा कोणीतरी माणूस पडद्यावर वावरतोय, असे प्रेक्षकांना वाटायचे. ‘साधी राहणी आणि उच्च अभिनय’ हे त्याचे सूत्र होते.

    अभिनयाव्यतिरिक्त ते एक उत्तम चित्रकार देखील आहेत. त्यांच्या वैयक्तिक राजकीय किंवा सामाजिक विचारधारेच्या गोष्टी वगळता अमोल पालेकर हे नेहमीच एक ग्रेट ॲक्टर म्हणूनच जास्त ओळखले जातात. विविध चित्रपटांतील भूमिकांमधून त्यांनी सामान्य मनुष्याच्या अंतरंग उलगडणाऱ्या ज्या छटा आपल्या अभिनयातून व्यक्त केल्या आहेत, त्या लाजवाब आहेत. अगदी अँग्री यंग मॅनसारखे चित्रपट किंवा त्यासारखे व्यक्तिमत्व नसतानाही अमोल पालेकर नावाच्या या हीरोने आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयाने रसिकांना एक वेगळा आनंद दिला आहे, हे मात्र शंभर टक्के खरं आहे!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    अभिनय अन् नृत्याचा सूर्य अस्ताला गेला…

    October 13, 2026 फिल्मी

    संसार से भागे फिरते हो…

    October 11, 2026 फिल्मी

    दूसरा आदमी… मनाला भुरळ घालणारे कथानक

    October 6, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    अभिनय अन् नृत्याचा सूर्य अस्ताला गेला…

    By हर्षा गुप्तेOctober 13, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. काय दिवस आलेत, चार दिवस झाले…

    संसार से भागे फिरते हो…

    October 11, 2026

    दूसरा आदमी… मनाला भुरळ घालणारे कथानक

    October 6, 2026

    एका नदीची गोष्ट…

    October 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 ऑक्टोबर 2026

    October 17, 2026

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    October 16, 2026

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    October 16, 2026

    कढईतील थालिपीठ… खमंग आणि समृद्ध परंपरा

    October 16, 2026

    पत्रिकेतील ग्रह आणि वास्तू

    October 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बुद्धि मेचवेना धोंडीं, हा ठायवरी मवाळें सांडी

    October 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 472
    • अवांतर 217
    • आरोग्य 159
    • पंचांग आणि भविष्य 633
    • फिल्मी 73
    • फूड काॅर्नर 260
    • मैत्रीण 32
    • ललित 996
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 ऑक्टोबर 2026

    October 17, 2026

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    October 16, 2026

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    October 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.