आराधना जोशी
कोकमाच्या सारासाठी साहित्य
- आमसुले – 5 ते 6 (अर्धा कप गरम पाण्यात 15 ते 20 मिनीटे भिजवून ठेवा)
- पाणी – 3 ते 4 कप
- भाताची पेज – 1 कप
- हिरवी मिरची – 1
- जिरे – 1 टीस्पून
- तेल – फोडणीसाठी
- मीठ – चवीनुसार
- गूळ – चवीनुसार
- लसूणपाकळी – 1 ठेचून (ऐच्छिक)
भातासाठी साहित्य
- तांदूळ – 1 वाटी
- पाणी – 3 वाट्या
- मीठ – चवीनुसार
पुरवठा संख्या – दोन व्यक्तींसाठी
हेही वाचा – Recipe : हिरवे टोमॅटो आणि दाण्याची भाजी
तयारीसाठी लागणार वेळ – साधारणपणे 20 मिनिटे
पाककृती करण्यासाठी – 40 मिनिटे
एकूण वेळ – एक तास
कृती
भाताची पेज आणि वाफाळता भात
- तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या.
- एका जाड बुडाच्या भांड्यात 3 कप पाणी उकळण्यास ठेवा.
- एक उकळी आली की, त्यात धुतलेले तांदूळ घालून शिजण्यासाठी ठेवा.
- भात अर्धा-कच्चा शिजेल तेव्हा भांड्यावर झाकण ठेवून भातात उरलेले पाणी एका भांड्यात ओतून घ्या. हे पाणी म्हणजेच भातची पेज.
- आता उरलेल्या भातात किंचित मीठ घालून झाकण ठेवून वाफेवर भात करून घ्या.
कोकमाचे सार
- भिजवलेले कोकम (सोले) पाण्यात कुस्करून ठेवावीत.
- एका पातेल्यात तेलाची जिरे, मिरची, घालणार असाल तर लसूण घालून फोडणी करुन घ्यावी.
- त्यात कुस्करलेली कोकमे पाण्यासहीत घालावीत.
- त्यात अजून एक कप पाणी घालावे आणि एक उकळी येऊ द्यावी.
- नंतर मीठ, गूळ आणि भाताची पेज घालून अजून एक उकळी आली की, गॅस बंद करा.
- उकळलेल्या सारात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तयार झालेल्या भाताबरोबर गरम गरम वाढावे.
हेही वाचा – Recipe : लो कार्ब वेजी टोस्ट
टिप्स
- कोकमाचे सार हे सूपसारखे नुसतेच प्यायला मस्त लागते.
- मिरची, लसूण अत्यावश्यक नाही. लसूण खात नसाल तर, वगळला तरी चालेल.
- हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखट वापरू शकता. तिखट वापरणार असाल तर फोडणीत न घालता कोकमांचे पाणी फोडणीवर घातल्यावर टाकावे. म्हणजे लाल रंग कायम राहील.
- पेज करणे शक्य नसेल तर, सरळ एखादा टेबलस्पून तांदूळाची पिठी एक कप पाण्यात मिसळून गुठळ्या मोडून सारात घालावे.
- पेज काढायची असेल तर भात कुकरला शिजवता येत नाही. साध्या जाड बुडाच्या पातेल्यात गॅसवर नुसता शिजवावा लागतो किंवा राईसकुकर वापरत असाल तरी देखील पेज काढता येते.
- पेज काढून झाल्यावर पातेल्याच्या खाली एखादा तवा ठेवून मग त्यावर भाताचे भांडे ठेवले तर भात खाली चिकटत नाही.
- भात शिजवताना मीठ घालणे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. भात पूर्णपणे शिजला आहे का, हे तपासायला एखादे शीत काढून बोटांनी मोडून बघावे.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


