Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 07 नोव्हेंबर 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 07 नोव्हेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 7, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 07 नोव्हेंबर 2025; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 16 कार्तिक शके 1947; तिथि : द्वितीया 11:05; नक्षत्र : रोहिणी 24:33
    • योग : परिघ 22:27; करण : वणिज 21:16
    • सूर्य : तुळ; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:40; सूर्यास्त : 18:03
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – ज्यांना हितचिंतक समजता तेच तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायाशी संबंधित प्रवास लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. नोकरदार जातकांना कनिष्ठांकडून पुरेसा पाठिंबा मिळणार नाही. त्यामुळे बाहेरून मदतीची अपेक्षा कराल. कामासंदर्भातील वाटाघाटीचे प्रयत्न फारसे फलदायी ठरणार नाही. आजचा दिवस काही जातकांना नकारात्मक परिणाम देणारा ठरेल.

    वृषभ – रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल. आशा आणि उत्साहामुळे तुमचा कामे उरकण्याकडे अधिक कल असेल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबातील सदस्य एखाद्या कामासाठी स्वतःहून मदतीचा हात पुढे करतील. आज आर्थिक अडचणींमधून मुक्तता मिळेल. प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढविण्यासाठी काही सामाजिक कार्य हाती घ्याल.

    मिथुन – आजच्या दिवशी सहकारी आणि कुटुंबीय  यांचा मोठा पाठिंबा मिळेल. याआधी केलेल्या कठोर परिश्रमाचे आज फायदे होतील. कामातील अडथळे दूर होतील. मात्र गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये अडकण्याऐवजी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक व्यवहारातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.

    कर्क – स्वतःच्या कामांचा परत एकदा आढावा घ्या. वैचारिक संघर्ष आणि असंतोष कायम राहील. कुटुंबातील एखाद्या जवळच्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते. शत्रूंची भीती, चिंता आणि संततीला होणारा शारीरिक त्रास यामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. उत्पन्न आणि खर्च सारखाच राहील.

    सिंह – अनपेक्षित स्वप्ने सत्यात उतरतील. मात्र अनावश्यक घाई टाळणे फायद्याचे ठरेल. पूर्वनियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल. कामात प्रगती होईल. सुसंवाद साधून काम करवून घेण्याचा प्रयत्न फायदेशीर ठरेल. एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे आज भेट म्हणून मिळू शकतात.

    हेही वाचा – निखळ मैत्रीचा ‘दीप’

    कन्या – विविध कार्यक्रम आणि संमेलनांमध्ये तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान वाढेल. हा आनंदाचा काळ आहे. प्रगतीच्या संधी फायदेशीर ठरतील. उत्पन्न आणि खर्च संतुलित राहील. तुमच्या श्रद्धा फलदायी ठरतील. फायदेशीर कामासाठी जोरदार प्रयत्न होतील.

    तुळ – एखाद्या निर्णयावरून भावंडांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. मात्र कौटुंबिक वाद टाळा. गोष्टी अपेक्षेप्रमाणे होतील की नाही, याबद्दल शंका आहे. आजच महत्त्वाची कामे पूर्ण करा, कारण त्यानंतर वेळ वाया जाईल. व्यवसायावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल. आज कामाचा बोजा वाढणार आहे.

    वृश्चिक – व्यावसायिक समृद्धी शक्य होईल, त्यामुळे आनंद वाढेल. व्यावसायिक उपक्रमांसमोर काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. कामाचा ताण तुमच्या आराम आणि विश्रांतीवर परिणाम करेल. त्यामुळे घरातील ज्येष्ठांकडून सहानुभूती मिळेल. भूतकाळातील गुंतवणुकीवर नफा मिळू शकेल. संभाषणात संयम ठेवा. धार्मिक कार्यात रस निर्माण होईल.

    धनु – खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. उत्पन्नाच्या अधिक संधी उपलब्ध होतील. सरकारी कामातून फायदा होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होईल. नैतिक मर्यादा पाळा. संभाषणात संयम ठेवा. भूतकाळातील चुकांबद्दल पश्चात्ताप होईल. गाडी चालवताना काळजी घ्या. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल स्थिती असेल.

    मकर – रिअल इस्टेट खरेदी करण्यात किंवा शेती व्यवसायात रस निर्माण होईल. कुटुंबासह एखाद्या लहानशा सहलीवर जाऊ शकता. तिथे भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. या योजनांना प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल. त्यामुळे मन आनंदी राहील. तुम्ही स्वतःला अधिक सक्रियपणे काम करताना पाहाल.

    कुंभ – शुभ कार्याचे फायदेशीर परिणाम मिळतील. भरपूर काम होईल, त्यातून नफा होईल. व्यावसायिक समृद्धी मिळेल, त्याने आनंद वाढेल. धार्मिक कार्यात रस निर्माण होईल. तुम्ही हाती घेतलेल्या कार्याला मान्यवरांचा पाठिंबा मिळेल. जुन्या मित्रांशी संपर्क साधला जाईल.

    हेही वाचा – संवेदनशील हत्ती अन् इंग्रजी साहित्य…

    मीन – आरोग्य आणि जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा करा. हा दिवस आनंद आणि व्यावसायिक प्रगतीचा असेल. ज्ञान आणि तंत्रज्ञान कौशल्यात वाढ होईल, प्रतिष्ठित लोकांच्या सहवासाचा आनंद मिळेल. अनावश्यक धावपळ टाळणे चांगले. प्रियजनांना भेटण्याची अचानक संधी मिळेल.


    दिनविशेष

    क्रांतिकारक, कृषितज्ज्ञ पांडुरंग खानखोजे

    टीम अवांतर

    पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1883 वर्धा येथे झाला. वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी नागपूरला पाठवले, तेथे त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने स्वदेशी वस्तूंचे दुकान काढले. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी स्फोटकांचे ज्ञान घेणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत बनले. म्हणून ते भारत सोडून जपानमार्गे अमेरिकेला गेले. 1911 मध्ये अमेरिकेत कृषीशास्त्र आणि लष्करी प्रशिक्षणाची पदवी त्यांना मिळाली. मेक्सिकोमध्ये त्यांनी कृषीशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. दुष्काळी भागात शेती कशी करता येईल, यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. त्याचवेळी स्वातंत्र्यासाठी युवकांना प्रेरित करणाऱ्या गदर प्रकाशनाच्या मराठी आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले. पशुपालन आणि दुग्धव्यवसायाचे सखोल ज्ञान घेऊन त्यांनी एम.एस. ही कृषीशास्त्रातील पदवी घेतली. मेक्सिकोतील कृषी विद्यापीठात प्राध्यापक झाले. मेक्सिकोमध्ये मसाल्याची शेती करण्यास सुरुवात केली. मेक्सिकन सरकारने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. त्यांनी एकूण 2500 संकरित वनस्पती तयार केल्या. मेक्सिकोमध्ये त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजीची स्थापना केली. मेक्सिको सरकारच्या कृषी विभागाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मका, गहू, रताळी, ताग, सोयाबीन या पिकांच्या वाणात आणि पीक पद्धतीत सुधारणा घडवून आणली. यामुळे मेक्सिकोमध्ये अन्नधान्याचे उत्पादन वाढले. या कार्यामुळे मेक्सिकोतील लोक त्यांना हिंदू जादूगार म्हणून ओळखू लागले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते मायदेशी परतले. मात्र बोटीतून उतरताच त्यांना अटक झाली कारण त्यांचे नाव इंग्रजांच्या काळ्या यादीत समाविष्ट होते. मध्य प्रदेशच्या मंत्र्यांनी त्यांची सुटका केली. त्यांनी भारतीय कृषी धोरणाविषयी महत्त्वाचे दस्तऐवज अहवाल तयार केले. भारताच्या सीमेवरील बर्फाळ भागात शेती कशी करावी, याचे स्थानिकांना प्रशिक्षण देण्यासाठीचा प्रकल्प तयार करून त्यांनी सरकारला सादर केला. सीमेवर शेती केल्यास शेतकरी चीन, पाकिस्तान अशा शेजारी राष्ट्रांच्या सैन्याच्या हालचाली आपणास कळवतील आणि सीमांचे रक्षण होईल, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र हा प्रकल्प कार्यान्वित झाला नाही. 22 जानेवारी 1967 रोजी वयाच्या 84व्या वर्षी खानखोजे यांचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn