Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 सप्टेंबर 2026

    September 1, 2026

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    August 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पोई भाजी (मलबार स्पिनॅच, मायाळू) एक पौष्टिक प्रकार!
    फूड काॅर्नर

    पोई भाजी (मलबार स्पिनॅच, मायाळू) एक पौष्टिक प्रकार!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरJuly 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी लेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, माधवी जोशी माहुलकर, लेखिका माधवी जोशी माहुलकर, माधवी जोशी, माधवी माहुलकर, पोई भाजी, मलबार स्पिनॅच भाजी, मायाळूची भाजी, छत्तीसगढमधील भजी, छत्तीसगढची भाजी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    छत्तीसगढ हे एक असे राज्य आहे, जिथे अनेक प्रकारच्या पालेभाज्या आढळतात. हिरव्या पालेभाज्या हा योग्य आणि संतुलित आहाराचा एक आवश्यक भाग आहेत. या पालेभाज्या मानवी शरीराला मिळणाऱ्या जीवनसत्त्वांचा तसेच आयर्न (लोह), कॅल्शियम, फोलेट, मॅग्नेशियम, झिंक आणि फायबर (तंतूयुक्त पदार्थ) इत्यादींचा एक उत्तम स्रोत असतात, जे आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करतात. तिथे मायाळू किंवा पोई भाजी (मलबार स्पिनॅच) ही भाजी केली जाते. नागपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे छत्तीसगढ राज्याला लागून असल्याने या भागांतील स्थानिक लोकसुद्धा त्यांच्या आहारात पोई भाजीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.

    पोई भाजी आणि आयुर्वेदिक ‘वावडिंग’ हे एकच असल्याचा खूप लोकांचा गैरसमज होतो, कारण या दोन्ही वनस्पतींमध्ये खूप साधर्म्य आढळते. परंतु, वावडिंगाचे मोठे झुडूप किंवा वनस्पती असते, तर पोई भाजी (मायाळूची भाजी) ही एक वेलीसारखी वनस्पती आहे, जी कुठेही पसरते. हिच्या फांद्या सुतासारख्या बारीक असतात, त्यामुळे हिची वाढ व्यवस्थित होण्यासाठी एका आधाराची आवश्यकता असते. खूप लोक पोई भाजीचा वापर आपल्या घराचे प्रवेशद्वार सजवण्यासाठी करतात, ज्यामुळे प्रवेशद्वार छान हिरवेगार आणि सुंदर दिसते. घर सजवण्यापूर्वी तार लावून पोईच्या वेलींना त्यात अडकवावे लागते, त्यानंतर पोई स्वतःच आपला सुंदर आकार घेते. याचे रोप लावण्यासाठी हिची एक फांदीच पुरेशी असते आणि ती अगदी लवकर रुजते. मात्र, मूळ धरेपर्यंत थोडी काळजी घ्यावी लागते. त्यानंतर हिची वाढ होण्यासाठी फक्त पाण्याची गरज असते. अनेक लोक ही भाजी कुंडीत लावतात आणि छतावर नेऊन तिच्या वेली छतावरून खाली सोडतात, जेणेकरून घर आकर्षक दिसावे.

    मायाळूला हिंदीत पोई, पोय किंवा ‘पोई का साग’ म्हणतात, तर संस्कृतमध्ये पोतकी, उपोदिका, अमृतवल्लरी, मालवा असे म्हटले जाते. ही वनस्पती मांसल, चिकट रसयुक्त आणि दळदार पानांची असून यात हिरवी आणि लालसर अशा दोन मुख्य जाती बघायला मिळतात. ही वनस्पती अत्यंत औषधी असून हिची पाने, मुळे आणि पंचांग विविध उपचारांत वापरले जाते.

    हेही वाचा – Recipe : उपवासाचे दहीवाले आलू करून पाहिले आहेत का?

    इंग्रजीत ‘Malabar Spinach’ म्हणून ओळखली जाणारी ही भाजी अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट असते. हिची मुख्य वैशिष्ट्ये आणि खाण्याच्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत :

    प्रकार : पोईच्या दोन मुख्य जाती आहेत; एका प्रकाराची देठे पूर्णपणे हिरवी असतात, तर दुसऱ्याची देठे लालसर-जांभळ्या रंगाची असतात.

    चव आणि पोत : ही भाजी शिजवल्यावर थोडी चिकट (mucilaginous) होते, त्यामुळे रस्सा किंवा रटरटीत भाजी बनवण्यासाठी ती उत्तम मानली जाते.

    वापर : हिची पाने आणि कोवळी देठे (fleshy stems) दोन्ही खाण्यायोग्य असतात. ही भाजी चणाडाळ, वांगी, कोहळा किंवा इतर भाज्यांसोबत एकत्र करून मसालेदार पद्धतीने (उदा. पंचफोरण किंवा लसूण-मिरचीची फोडणी देऊन) शिजवली जाते.

    वेगवेगळ्या प्रांतात बनवण्याचे प्रकार

    1. साधी भाजी : लसूण, कांदा, मिरची आणि मोहरीच्या फोडणीमध्ये ही भाजी कोरडी किंवा सुकी बनवली जाते.
    2. डाळ घालून : हरभरा डाळ किंवा मुगाची डाळ घालून केलेली पोई भाजी खूप चवदार लागते.
    3. मिश्र भाजी (चोर्चोरी) : काही भागांत यामध्ये वांगी, बटाटा आणि इतर भाज्यांसोबत मिसळून ‘चोर्चोरी’ ही मिश्र भाजी बनवली जाते.
    4. आंबट-गोड पातळ भाजी : काही ठिकाणी यामध्ये चण्याची डाळ, शेंगदाणे, चिंचेचा कोळ आणि गूळ घालून छान मिळून आलेली पातळ भाजी भातासोबत खाण्यासाठी केली जाते.

    पोषक घटक : यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे (A, C), लोह (Iron), कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि पचनास हलकी असते.

    हीच पोई भाजी मी कशी करते, त्याची माझी सोपी पद्धत खाली दिली आहे :

    साहित्य

    • पोई भाजीची पाने (आणि कोवळी देठे) – पाव किलो
    • मध्यम आकाराचा कांदा – एक (उभा चिरलेला)
    • लसूण पाकळ्या – 7-8 (बारीक तुकडे केलेले)
    • सुक्या लाल मिरच्या – 2 ते 3
    • मोहरी – एक चमचा
    • जिरे – एक चमचा
    • हिंग – एक टीस्पून
    • हळद – एक चमचा
    • लाल तिखट – दोन चमचे
    • गोडा मसाला – अर्धा चमचा
    • भिजवलेली हरभरा डाळ – अर्धी वाटी
    • तेल (फोडणीकरता) – अर्धी पळी
    • मीठ – चवीनुसार

    कृती

    1. प्रथम पोई भाजीची पाने आणि कोवळी देठे निवडून, स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावीत.
    2. नंतर कढईत तेल टाकून ते तापले की, त्यामध्ये अनुक्रमे मोहरी आणि जिरे टाकावे. ते छान तडतडल्यावर त्यामध्ये हिंग, सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे आणि चिरलेला लसूण टाकावा.
    3. लसूण थोडा गुलाबी झाल्यावर त्यात चिरलेल्या कांद्याचे काप टाकावेत आणि कांदा पारदर्शक होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यावा. त्यानंतर यामध्ये हळद, लाल तिखट आणि गोडा मसाला घालून सर्व मिश्रण एकत्र करावे.
    4. आता यात भिजवलेली हरभरा डाळ टाकून परत एकदा सर्व मिक्स करावे आणि चवीनुसार मीठ घालावे.
    5. डाळ शिजण्याकरिता अंदाजाने थोडे पाणी टाकावे आणि कढईवर झाकण ठेवून डाळ पहिले शिजू द्यावी. डाळ शिजत असताना अधूनमधून झाकण उघडून ढवळावे.
    6. डाळ अर्धवट (बोटचेपी) शिजत आली की, त्यामध्ये चिरलेली पोई भाजी टाकावी. डाळ अर्धवट शिजल्यावर भाजी टाकल्यामुळे भाजीचा नैसर्गिक हिरवा रंग अगदी छान टिकून राहतो.
    7. आता हे सर्व मिश्रण परत एकदा नीट एकजीव करावे आणि मंद आचेवर ही डाळ आणि भाजी दोन्ही मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावी.
    8. अशी ही गरमागरम आणि चवदार पोई भाजी भाकरी, पोळी किंवा भाताबरोबर एकदम अप्रतिम लागते!

    हेही वाचा – Recipe : टेस्टी तोंडलीभात अर्थात मसालेभात

    तुमच्या भागात जर ही भाजी मिळत असेल तर नक्की करून पहा आणि हो, तुम्ही ही भाजी कशा पद्धतीने करता? तुमच्याकडे या भाजीला काही वेगळे नाव आहे का? कमेंट करून नक्की सांगा!

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    विदर्भ स्पेशल… वाटीभर मुगाच्या दाण्यांची कढईभर आमटी!

    August 28, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : चटपटीत कैरी लोणचे आणि भोकरांचे लोणचे

    August 26, 2026 फूड काॅर्नर

    ताक…

    August 22, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    विदर्भ स्पेशल… वाटीभर मुगाच्या दाण्यांची कढईभर आमटी!

    By माधवी जोशी माहुलकरAugust 28, 2026

    माझं माहेर विदर्भातील अकोला! अकोल्याला स्वतःचा एक वेगळा असा खाद्यसंस्कृतीचा वारसा आहे. स्त्री वयाने कितीही…

    Recipe : चटपटीत कैरी लोणचे आणि भोकरांचे लोणचे

    August 26, 2026

    ताक…

    August 22, 2026

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    August 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 सप्टेंबर 2026

    September 1, 2026

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    August 31, 2026

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    August 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 416
    • अवांतर 206
    • आरोग्य 142
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 560
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 28
    • ललित 886
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 सप्टेंबर 2026

    September 1, 2026

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    August 31, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.