Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कडाडीं लोटला गाडा, शिखरौनि सुटला धोंडा

    August 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 ऑगस्ट 2026

    August 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, August 28
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ज्योतिष, मनोविज्ञान आणि वेदांत
    पंचांग आणि भविष्य

    ज्योतिष, मनोविज्ञान आणि वेदांत

    ज्योतिषी हृषिकेश पानकरBy ज्योतिषी हृषिकेश पानकरJuly 13, 2026Updated:July 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, हृषिकेश पानकर, ज्योतिषी हृषिकेश पानकर, वैदिक ज्योतिषशास्त्र, वैदिकशास्त्रातील महत्त्वपूर्ण सिद्धांत,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आपल्या आयुष्यात अनेक समस्या येतात. आपण अनेकदा त्यासाठी परिस्थिती, नशीब किंवा इतर लोकांना दोष देतो. पण खरं पाहिलं, तर आपल्या अनेक समस्यांचं मूळ आपल्या मनातच असतं. म्हणूनच आपल्या ऋषी-मुनींनी हजारो वर्षांपूर्वी मन, भावना आणि आत्म्याचा खूप सखोल अभ्यास केला होता.

    आजचं आधुनिक मनोविज्ञान सांगतं की राग, भीती, दुःख किंवा चिंता आली तर, त्या भावनांमध्ये वाहून जाऊ नका. त्या भावनांकडे फक्त बघा. पण वेदांत इथे आणखी एक पाऊल पुढे जातो. तो विचारतो – या भावना पाहणारा नेमका कोण आहे? म्हणजे राग येतो, दुःख होतं, आनंद होतो… पण हे सगळं अनुभवणारा आणि पाहणारा कोण? याचं उत्तर शोधायला वेदांत शिकवतो.

    आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की, मन हेच माणसाच्या प्रगतीमधला सर्वात मोठा अडथळा आहे. मनात सतत विचार सुरू असतात. कधी राग, कधी भीती, कधी अपेक्षा, कधी मोह, कधी आसक्ती… त्यामुळे मन कधीच शांत राहत नाही आणि जोपर्यंत मन शांत होत नाही, तोपर्यंत माणूस स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखू शकत नाही. यासाठी आपल्या योगशास्त्रात मनावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचं मानलं आहे.

    काश्मीर शैव परंपरेतील विज्ञान भैरव तंत्र या ग्रंथात मन शांत करण्याच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत. त्यांचा उद्देश विचार दाबणे नाही, तर विचारांपासून थोडं बाजूला उभं राहायला शिकवणं आहे. यासाठी एक सोपा प्रयोगही करता येतो. तुम्ही कोणतंही काम करत असाल, अचानक स्वतःलाच मनात ‘स्टॅच्यू’ अशी आज्ञा द्या. काही क्षण शरीर स्थिर ठेवा आणि फक्त आजूबाजूला काय चाललं आहे ते पाहा. त्या क्षणी मनाची धावपळ थोडी कमी होते आणि आपण फक्त पाहणाऱ्याच्या भूमिकेत जातो. हा अनुभव छोटा असला तरी मन शांत करण्याची सुरुवात इथूनच होते.

    हेही वाचा – भारतातील शक्तिपीठे

    वेदांतात “शिवोऽहम्” किंवा “मी मन नाही, मी अहंकार नाही” असं का म्हटलं आहे, यामागेही हाच अर्थ आहे. आपलं खरं स्वरूप हे राग, भीती, आनंद किंवा दुःख नाही. त्या सगळ्याचा अनुभव घेणारं जे शांत अस्तित्व आहे, तेच आपलं खरं रूप आहे… इथेच ज्योतिषाची खरी भूमिका सुरू होते.

    वेदांत आपल्याला अंतिम सत्य सांगतो. पण त्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक माणसाचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि मनाची जडणघडण वेगळी असते; हे समजून घेण्यासाठी ज्योतिष खूप मदत करतं.

    कुंडलीतील प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक भाव फक्त भविष्य सांगत नाही, तर तो आपल्या मनाच्या एखाद्या भागाचंही प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे ज्योतिष फक्त घटना सांगणारं शास्त्र नाही, तर माणसाचं मन समजून घेणारं शास्त्रही आहे. यालाच आजच्या भाषेत ज्योतिषीय मनोविज्ञान (Astro Psychology) असं म्हणता येईल.

    उदाहरणार्थ, चतुर्थ भाव हा फक्त आईचा भाव नाही. तो मनाला मिळणारा आधार, प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक सुरक्षितता दाखवतो. जर एखाद्याचा चतुर्थेश सप्तम भावात असेल, तर अनेक वेळा अशी व्यक्ती नकळत आपल्या जोडीदारामध्ये आईसारखी माया, काळजी आणि भावनिक आधार शोधत असते. त्या व्यक्तीला वाटतं की, ती चांगला जीवनसाथी शोधते आहे. पण प्रत्यक्षात ती बालपणी अपूर्ण राहिलेल्या भावनेचा शोध घेत असते! म्हणून अशा व्यक्तीला कितीही चांगला जोडीदार मिळाला, तरी मन पूर्ण समाधानी होत नाही. कारण समस्या जोडीदारात नसते, तर मनात दडलेल्या अपूर्ण भावनांमध्ये असते.

    अशाच प्रकारे अनेक लोक पैसा, प्रसिद्धी, प्रेम किंवा यश यांच्या मागे धावत असतात. पण खरं म्हणजे ते या गोष्टी शोधत नसतात. ते मनातली एखादी रिकामी जागा भरून काढण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच बाहेरचं यश मिळूनही अनेकांना मनःशांती मिळत नाही.

    यामुळे ज्योतिष आणि मनोविज्ञान एकत्र अभ्यासलं, तर माणसाला स्वतःला समजून घेणं खूप सोपं होतं. मनोविज्ञान आपल्याला आपल्या भावना समजावून सांगतं, तर ज्योतिष त्या भावनांचं मूळ कारण कुठे आहे हे दाखवतं.

    ग्रह आपल्याला दुःख देत नाहीत. ते फक्त आपल्या स्वभावाचं, विचारांचं आणि कर्मांचं प्रतिबिंब दाखवतात. अनुभवी ज्योतिषी जेव्हा कुंडलीकडे या दृष्टीने पाहतो, तेव्हा तो फक्त भविष्य सांगत नाही. तो माणसाच्या मनात दडलेल्या भीती, असुरक्षितता, सवयी आणि वारंवार घडणाऱ्या घटनांमागचं कारण समजावून सांगू शकतो. म्हणूनच प्रत्येक ग्रह, प्रत्येक भाव आणि प्रत्येक योग हा आपल्या मनाशी जोडलेला असतो. संपूर्ण कुंडली म्हणजे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसाच असतो.

    हेही वाचा – देशविदेशातील शक्तिपीठे

    आजच्या काळात मानसिक ताण, चिंता, नैराश्य आणि नात्यांमधील समस्या खूप वाढल्या आहेत. अशा वेळी अध्यात्म, मनोविज्ञान आणि ज्योतिष या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या, तर माणसाला स्वतःला समजून घेणं आणि स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणणं खूप सोपं होतं.

    म्हणून ज्योतिषाचा अभ्यास करताना फक्त “भविष्यात काय होईल?” एवढाच विचार करू नका. “मी असा का विचार करतो?”, “माझ्या आयुष्यात हेच प्रसंग पुन्हा पुन्हा का येतात?” आणि “माझ्या मनाची खरी जडणघडण कशी आहे?” हे प्रश्नही विचारायला शिका.

    कारण खऱ्या अर्थाने ज्योतिष म्हणजे फक्त भविष्य सांगणं नाही, तर स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःमध्ये योग्य बदल घडवून आणण्याचा मार्ग आहे.

    Avatar photo
    ज्योतिषी हृषिकेश पानकर

    ज्योतिषी हृषिकेश पानकर ज्योतिष प्रवीण आणि ज्योतिष पंडित Specialising in : KP Astrology, Prashna Navamansh Analysis Method, Vastu Consultant Expertise : Over 15 years of experience in Horoscope Analysis & Guidance. Mobile : 9604014431

    Related Posts

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 ऑगस्ट 2026

    August 28, 2026 पंचांग आणि भविष्य

    वास्तुशास्त्र आणि आपल्या जीवनातील उर्जेचा संबंध

    August 27, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    By अस्मिता दीक्षितAugust 28, 2026

    || श्री स्वामी समर्थ || आपल्या पत्रिकेतील ग्रह कुठल्या भावात आहेत आणि ते कसे फळ…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 ऑगस्ट 2026

    August 28, 2026

    वास्तुशास्त्र आणि आपल्या जीवनातील उर्जेचा संबंध

    August 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑगस्ट 2026

    August 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कडाडीं लोटला गाडा, शिखरौनि सुटला धोंडा

    August 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 ऑगस्ट 2026

    August 28, 2026

    दोन कन्यादानांतून मिळाले दोन पुत्र

    August 27, 2026

    राजेशच्या भावांचे नेमके प्रपोजल काय?

    August 27, 2026

    वास्तुशास्त्र आणि आपल्या जीवनातील उर्जेचा संबंध

    August 27, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 412
    • अवांतर 206
    • आरोग्य 141
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 554
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 252
    • मैत्रीण 24
    • ललित 880
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कडाडीं लोटला गाडा, शिखरौनि सुटला धोंडा

    August 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 ऑगस्ट 2026

    August 28, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.