Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…
    ललित

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करMay 31, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लघुकथा, गावातील देवीची महाआरती, आस्तिक नास्तिक, रेवतीचे देवदर्शन, रेवतीचे देवीला साकडे, नाडकर्णी दाम्पत्याचे देवदर्शन, आजारी नाडकर्णींचे खाली कोसळणे, डॉक्टर मधुरचे देवळाबाहेर बसणे, डॉक्टर मधुर यांची कामावर श्रद्धा
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पूर्वार्ध

    रेवती आंघोळ करून तयार होत होती. तिचा नवरा डॉ. मधुर नाश्ता करत होता, त्याला रेवती म्हणाली, “मधुर, माझ्यासाठी आज एक काम कर…”

    “काय?”

    “बारा वाजता देवीच्या देवळात महाआरती असते, तू आता दवाखान्यात गेलास की, साडेअकराला घरी ये आणि मला देवळात सोड…”

    “अगं, पण मला कसं जमेल?”

    “जमेल… बाकी पुरुष बघ आपल्या बायकोला घेऊन सायंकाळी फिरायला जातात, हॉटेलात जातात, मॉलमध्ये जातात आणि देवळात पण जातात, तू माझ्याबरोबर कुठे येतोस का?”

    “अगं, त्यांचं आणि माझं प्रोफेशन वेगळं आहे, मला सायंकाळी दवाखान्यात जायचे असते आणि…”

    “आणि नाही नि बिणी नाही… पुढचे सर्व मला माहीत आहे. तुला देवळात यायची फारशी इच्छा नसते.. मग आत येऊ नको ना! मला आरतीला सोड आणि फक्त अर्ध्या तासाने घरी आण. एकदिवस पेशन्ट थोडी वाट बघतील…”

    “अगं पण… तुला सोडायला जायला इथून वीस मिनिटे, परत घरी सोडायचे, म्हणजे मला अर्धा तास बाहेर वाट पहात राहायला हवी…”

    हेही वाचा – पाप आणि पुण्य

    “मग तू आत का येत नाहीस आरतीला? तेवढेच पुण्य…”

    “प्रत्येकाची पुण्य मिळविण्याची कल्पना वेगवेगळी असते. तुला देवींची ओटी भरून, आरती करून पुण्य मिळते, असे वाटते… मला तसे नाही वाटत. मला माझ्या पेशन्टना रोगमुक्त केल्यानंतर त्यांचे आशीर्वाद महत्त्वाचे वाटतात…”

    “ठीक आहे… तू येतोस की नाही साडेअकराला ते बोल…”

    “मी येईन पण बाहेर बसेन तुझी वाट बघत. त्यानिमित्ताने तो परिसर पहाणे होईल आणि कोणी ओळखीचे भेटले तर…”

    “गप्पा! बरोबर?”

    “अगं गप्पा पण मारायला हव्यात, त्यामुळे समाज कळतो… लोकांना सध्याच्या परिस्थितीबद्दल काय वाटते, हे कळते… एक भारतीय नागरिक म्हणून लोकांचा आरसा पण पाहायला हवा!”

    “तू आरसा बघ किंवा आणि काय बघ… मी साडेअकराला तुझी वाट पाहतेय…”

    “ठीक, मी येतो अकराला…”

    डॉ. मधुरने स्कूटर स्टार्ट केली आणि तो दवाखान्यात गेला.

    मधुर दवाखान्यात पोचला. आज कोणता तरी सण होता, त्यामुळे नेहमीसारखी गर्दी नव्हती. त्याने एप्रन अंगात चढविला आणि पेशन्ट तपासायला सुरुवात केली. अधूनमधून त्याचे लक्ष हातातील घड्याळाकडे जात होते.. साडेअकराला रेवतीला घरी येतो म्हणून सांगितले आहे.. तसे रेवतीला पण फारसे बाहेर जाता येत नाही.. एकतर आपले घर शहरापासून लांब आहे आणि दुसरे म्हणजे आपली आई आपल्यासोबत असते. सध्या ती बहिणीकडे गेली आहे म्हणून नाहीतर तिला एकटीला घरी सोडून रेवती कुठे जात नाही.

    सव्वाअकराला डॉ. मधुर बाहेर पडला. जाताजाता तो मंदाला म्हणाला,

    “मंदा… मी रेवतीला घेऊन देवीच्या देवळात जातोय. एक वाजेपर्यंत येतो. पेशन्टना सांग डॉक्टर एकनंतर येतील.”

    आपले साहेब आज बायकोला घेऊन देवळात जात आहेत, हे ऐकून मंदाला आश्यर्यच वाटले. पण काही न बोलता तिने मान हलवली.

    मधुर घरी पोहोचला. त्याने स्कूटर घराबाहेर लावली आणि मोठी चारचाकी बाहेर काढली. एकतर देवीचे मंदिर सहा किलोमीटरवर होते आणि दुपारचे ऊन होते… त्याने हॉर्न वाजवताच देवीसाठी ओटी घेऊन रेवती बाहेर पडली, तिने घराला कुलूप लावले आणि ती गाडीत बसली.

    “किती दिवसांपासून माझ्या मनात होतं… देवीची ओटी भरायची आणि महाआरतीला पण हजर राहायचं… पण जमतच नव्हतं. माझी आई रोज फोनवर विचारत असते… देवीची ओटी भरलीस का म्हणून? पण वेळ यावी लागते म्हणतात ना…”

    “आज योग्य वेळ आली काय?”

    “अरे, ते बाजूच्या बंगल्यातील नाडकर्णी आहेत ना… त्या नाडकर्णीना हल्ली बरे नसते. म्हणून सावित्रीबाई म्हणजे मिसेस नाडकर्णीना देवीला गाऱ्हाणे घालायचे आहे, आपल्या नवऱ्याच्या तब्येतीसाठी…”

    “बरं मग?”

    “आज त्या आपल्या नवऱ्याला घेऊन देवीच्या देवळात जायच्या होत्या. म्हणजे सकाळीच गेल्या पण त्या… त्यांनी मला विचारले तुम्ही आज देवळात याल का? म्हणजे काय होतं, देवीच्या देवळात जाताना रिक्षा मिळते पण येताना काही वाहन मिळत नाही! म्हणून त्या म्हणाल्या, तुम्ही आणि डॉ. मधुर जर आज देवीच्या दर्शनाला आलात तर, येताना गाडीची सोय होईल…”

    डॉ. मधुर हसत म्हणाला, “असं काय? म्हणजे तुम्हाला आज घरचा ड्रायव्हर हवा होता तर…”

    “तसं नाही रे… मला पण देवीची ओटी भरायचीच होती… लग्नाला चार वर्षे झाली आणि अजून…”

    “त्याकरिता डॉ. दीक्षित यांची ट्रीटमेंट सुरू आहे ना? आणि मधेच देवी…”

    “असू दे. माझा आहे विश्वास…”

    मधुरने देवीच्या देवळाजवळ गाडी उभी केली, रेवती त्यातून उतरली आणि देवळाच्या दिशेने चालू लागली. मधुरने गाडी कामत मेडिकलच्या दिशेने वळवली. अशोक कामत त्याचा कॉलेजमधील मित्र. अशोकने दुकानात येणाऱ्या मधुरकडे पाहिले आणि तो ओरडला…

    “अरे मध्या! आज दवाखाना बंद ठेवून इकडे कुठे?”

    “आली आज मित्राची आठवण… तुला कुठे येते माझी आठवण?”

    “अरे बाबा, रोज येते. तुझे पेशंट या भागात पण आहेत… ते दुकानात येतात तू लिहून दिलेली औषधे घ्यायला. पण तू या वेळी? आणि ते पण पेशन्टना सोडून?”

    “अरे, आज रेवतीला देवीच्या महाआरतीला यायचं होत. तिला सांगत होतो रिक्षाने जा. पण तिचे म्हणणे दुपारी या भागात रिक्षा मिळतं नाहीत. त्यामुळे आज थोडावेळ दवाखान्यातून वेळ काढला आणि तिला इकडे घेऊन आलो.”

    “बरं… म्हणजे वहिनी देवळात आणि तू बाहेर?”

    “ज्याला जिथे आवडतं तिथे त्याने जावे.. तिला देवळात जायला आवडते, मला माणसांत मिसळायला आवडते! तुझ्या दुकानात दहा मिनिटे बसले तर दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या बातम्या आणि माणसे भेटतात…”

    “ये ये… बरं वाटलं,” असं म्हणून कामतने खुर्ची पुढे केली आणि टाळी वाजवून चहाची ऑर्डर दिली.

    रेवती देवळात गेली. अजून फार गर्दी नव्हती, तुरळक माणसे होती, आरतीच्या वेळी देऊळ आणि परिसर भरून जातो. रेवती देवीची ओटी भरायला म्हणून आत आली, तेव्हा तिला नाडकर्णी दाम्पत्य दिसले. दोघे डोळे मिटून देवीचे स्तोत्र म्हणत असावे, बहुतेक. रेवतीने देवीची ओटी भरली, पुजाऱ्याने तिला तीर्थ आणि प्रसाद दिला… तो घेऊन ती मिसेस नाडकर्णींच्या बाजूला बसली.. मिसेस नाडकर्णी तिला बघून हसल्या.

    “एकटीच आलीस, डॉक्टर नाही आले काय?”

    “आले आहेत, मला दारात सोडलं त्यांनी आणि त्त्यांचा मित्र आहे ना, कामत केमिस्ट… त्याच्याकडे गेलेत…”

    “मग आत आले नाहीत ते? बहुदा ही डॉक्टर मंडळी नास्तिक असतात…”

    “मधुरला नास्तिक नाही म्हणता येणार. तो लहानपणापासून आंघोळ केल्यावर अथर्वशीर्ष म्हणतोच. सकाळी बाहेर पडताना घरच्या देवांना नमस्कार करतो. पण मग मात्र कुठल्या देवळात जात नाही की, कसला उपास करत नाही. पण त्याचा मला विरोध नसतो. मी उपास करते, त्याला तो कधीच काही म्हणत नाही. उलट, मेडिकल सायन्सच्या दृष्टीने उपास चांगला… पण उपासाला साबूदाणा किंवा बटाटे खाणे योग्य नसते, असे त्याचे म्हणणे.”

    “आरती बारा वाजता सुरू होईल. डॉक्टर बाहेर आहेत ना? इथे रिक्षा मिळत नाहीत म्हणून विचारले?”

    “तो कामतकडे आहे. आरती झाली की, मिसकॉल दे म्हणाला. मग आपण जाऊ. मिस्टरांची तब्येत कशी आहे?”

    “नरमच आहे. आज देवीचा प्रसाद घेतला की, बरे वाटेल…”

    “अहो, पण ट्रीटमेंट घ्यायला नको का? अंगावर काढू नका…”

    “जाऊ दोन दिवसांनी. माझा या देवीवर विश्वास आहे. तिचे चमत्कार ऐकलेत मी.”

    हेही वाचा – हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    “ते असू दे. पण उद्याच त्यांना चांगल्या डॉक्टरकडे न्या. मी मधुरला सांगते, तो तुम्हाला चांगला डॉक्टर सुचविल.”

    एवढ्यात देवळातील घंटा मोठमोठ्याने वाजायला लागल्या. मोठी आरती पेटवली गेली आणि झपझप माणसे आरतीसाठी जमा झाली… टाळ-मृदंग वाजू लागले, लोकांनी टाळ्या वाजून आरती म्हणायला सुरवात केली…

    दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं…

    रेवतीच्या बाजूला मिसेस नाडकर्णी आणि त्यांच्या बाजूला नाडकर्णी टाळ्या वाजवत आरती म्हणत होते…

    जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी…

    आरती टिपेला पोहोचली असताना मिसेस नाडकर्णी एकदम ओरडल्या,

    “अहो काय होतंय.. काय होतय…?”

    रेवतीने पाहिले.. मिसेस नाडकर्णी खाली वाकल्या होत्या आणि खाली पडलेल्या नाडकर्णीना उठवत होत्या. रेवती पण खाली बसली आणि तिने पाहिले, नाडकर्णी निपचित पडले होते आणि मिसेस नाडकर्णी मोठमोठ्याने “आरती थांबवा… आरती थांबवा” अशा ओरडत होत्या.

    क्रमश:
    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Related Posts

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026 ललित

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026 ललित

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    By सतीश बर्वेMay 30, 2026

    ध्यानीमनी नसताना त्याने व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला. “मिसिंग यु अ लॉट…” ते वाचून मी मनातल्या मनात…

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026

    स्मृतीगंध… मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 314
    • अवांतर 188
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 438
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 665
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026
    Most Popular

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.