Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!
    ललित

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेMay 30, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अतूट मैत्री, निर्भेळ मैत्री, मैत्रीची सावली, प्रेमाची सावली, शेवटपर्यंत साथ देणारी सावली, मैत्रीतील प्रामाणिकपणा, मैत्रीची निष्ठा, मैत्रीचे अतूट बंध, मित्राची सावली
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ध्यानीमनी नसताना त्याने व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला. “मिसिंग यु अ लॉट…” ते वाचून मी मनातल्या मनात म्हटलं इतकं मिसिंग होत असेल तर, मग भांडायचं तरी कशाला? यावेळी मी ठरवलं होतं की, आपली चूक नसताना माघार घ्यायची नाही. त्यालासुद्धा आपली चूक कळली पाहिजे. एखादेवेळी त्याने माफी मागितली तर, बिघडलं कुठे? इतके दिवस त्याने भांडायचं आणि मी जाऊ दे, जाऊ दे, करून माफी मागायची हेच चाललं होतं…

    यावेळी मी मुद्दामच काही न झाल्यासारखे उत्तर दिले,

    “मिसिंग यु अ लॉट म्हणजे नेमकं काय?”

    “ते नाही सांगता येणार…”

    “हे बरंय तुझं. मिसिंग म्हणजे नेमकं काय, हे जर कळत नाही तर मग मेसेज पाठवून मोकळा बरा झालास. मेसेज पाठवला तेव्हा काय होतं तुझ्या मनात? काही तरी असेलच ना! ते काय होतं, तेच विचारतोय मी तुला.”

    “तुझ्या असण्याची सवय झाली आहे…”

    “मग मोडून टाक ती सवय!”

    “अशी कशी मोडायची?”

    “माझ्या जागी दुसऱ्याला शोध.”

    “तुला पर्याय नाही अजून तरी कोणी… माझ्या आयुष्याच्या हॉटेलच्या टेबलावरचं मेन्यूकार्ड आहेस तू.”

    आज खूप दिवसांनी माझा जुना उल्लेख केला त्याने म्हणून हसायला आलं मला मनातल्या मनात. आजवर कितीतरी वेळा भांडलो आम्ही अगदी हमरातुमरीवर येऊन! पण दुसऱ्याच दिवशी पठ्ठ्या काल काहीच झालं नाही, अशा थाटात माझ्या खांद्यावर हात टाकत कटिंग प्यायचा. त्याची ही कृती मी बघत बसायचो, तेव्हा विचारायचा, “मला बघतोस काय असा पहिल्यांदाच भेटल्यासारखा?”

    मी डोक्यावर हात मारून म्हणायचो त्याला, “अरे इतका कसा निर्लज्ज तू? काल एवढा भांड भांड भांडलास विनाकारण आणि आज परत काहीच झालं नाही, अशा आविर्भावात माझ्यासोबत चहा प्यायला मोकळा!”

    एव्हाना मला देखील त्याची सवय झाली होती. ‘रात गयी, बात गयी’ हा त्याचा जगण्याचा फंडा होता. त्याच फंड्याचा एक भाग म्हणून सकाळी सकाळी त्याने केलेला मेसेज होता बहुतेक, ‘मिसिंग यु अलॉट.’

    खूप वेळाने पुढचा मेसेज आला… “अनेबल टू टाईप फास्ट फ्रॉम हॉस्पिटल बेड. नो वन अराऊंड… दॅट्स व्हाय मिसिंग यु अलॉट.”

    मेसेज वाचल्यावर मला धक्काच बसला. हा खरंच हॉस्पिटलमध्ये आहे, का मला शेंड्या लावतोय?… ते कळण्यासाठी नाईलाजाने शरणागती पत्करून मी त्याला फोन लावला.

    फोनवरचा त्याचा आवाज ऐकला आणि पोटात धस्स झालं. हॉस्पिटलचं नाव आणि पत्ता विचारून घेऊन शक्य तितक्या लवकर पोहोचत असल्याचे सांगून मी फोन ठेवला.

    हेही वाचा – दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट

    धापा टाकत मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. त्याला बॅंडेजमध्ये गुंडाळून ठेवलं होतं. खोलीत नुकतेच त्याचे दोन नातेवाईक आल्याचं खाली रिसेप्शनमध्ये सांगितले होते मला. त्याने मग माझी ओळख करून दिली. ते दोघे त्याचे दादा, वहिनी होते.

    “बरं झालं तुम्ही आलात कालचा राग मनात न ठेवता…” त्याचा दादा मला म्हणाला.

    “कालचा राग…?” मी गोंधळून विचारले.

    “हो, कालचा राग… काल तुमच्यात झालेल्या भांडणाचं सविस्तर वर्णन मी ऐकलं याच्या तोंडून…”

    मी रागावून त्याच्याकडे बघितले. बॅंडेजमधले दोन्ही हात जोडून त्याने मला नमस्कार केला आणि त्या क्षणी माझ्या भावनांना मी रोखू शकलो नाही. त्याचे जोडलेले हात पकडत मी त्याला जरा अधिकारवाणीने म्हणालो,

    “असाच आहेस तू. शांत बसावं तरी, बसवत नाही. मैत्री तोडावी म्हटली तर, तोडता येत नाही. तुला माझी काळजी नसते कधीच! तू तुझ्याच विश्वात गुंग असतोस…”

    माझं बोलणं मधेच तोडत त्याचा भाऊ मला म्हणाला की, “तुमचा राग स्वाभाविक आहे, पण तो तुम्हाला त्याची सावली मानतो. तो फटकळ जरूर आहे. मनात आलं की, तोंडावर बोलून मोकळा होतो. पण तुम्ही एकमेव असे आहात की, तुमच्यावर घेतलेलं तोंडसुख हे खरंतर त्याचं तुमच्यावरचे प्रेम असतं! फक्त ते व्यक्त करण्याची त्याची पद्धत फार वेगळी आहे. बंगल्यात ऐशोआरामात रहाणारा तो आणि चाळीत रहाणारे तुम्ही. असं असूनही तुमची आजवरची मैत्री किती खोलवरची आहे, हे ही डायरी वाचल्यावर चटकन लक्षात येते. सच्ची मैत्री, प्रामाणिकपणा आणि निष्ठा या आजकालच्या जगात खरोखरच दुर्मीळ असणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे भरभरून आहेत, याचा त्याला खूप अभिमान आहे. त्याची आयुष्य जगायची बेफाम, बेधुंद आणि बेधडक पद्धत आमच्या घरी कायम चिंतेचा विषय असतो. जेव्हा जेव्हा ही चिंता व्यक्त झाली घरच्यांकडून, तेव्हा तेव्हा त्याने तुमचा उल्लेख सावली म्हणून केला आहे. जोपर्यंत माझी सावली माझ्यासोबत आहे, तोपर्यंत माझं काही वाईट होणार नाही, तुम्ही निश्चिंत रहा, असं म्हणून प्रत्येकवेळी त्याने आम्हाला गप्प केलं. पण काल त्याच्या गाडीच्या अपघाताची बातमी पोलिसांनी दिली, तेव्हा त्याला कितपत लागलं असेल हा विचार मनात यायच्या आधी त्याची सावली त्याच्यासोबत नव्हती, याचं आश्चर्य मला वाटलं होतं. हॉस्पिटलमध्ये त्याच्या तोंडून तुमच्या कालच्या भांडणाविषयी ऐकून मी डोक्याला हात मारून घेतला. तुमच्या तुटलेल्या मैत्रीसाठी खूप दुःख झाले मला. आता काही तुम्ही येणार नाही त्याला भेटायला, असं मी त्याला सांगितले. तेव्हा तो मला म्हणाला, “दादा जस्ट वेट अँड सी!” त्याने तुम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला, “मिसिंग यु अलॉट.” पुढचं सगळं तुमच्यासमोरच घडलं आहे… रिअली हॅट्स ऑफ टू युवर ट्रु फ्रेंडशिप!”

    हेही वाचा – टेरर बोका आणि ओल्या रुमालाचे फटके

    हे सगळं ऐकून मी सुन्न झालो. निःशब्द झालो. त्याच्या वहिनीच्या तोंडून बाहेर आलेल्या हुंदक्याने खोलीतलं वातावरण आणखी भावनिक झाले.

    इतका वेळ मनात थोपवून ठेवलेले माझे विचार खडकांवरून स्वतःला बेधडकपणे खाली झोकून देण्याऱ्या प्रपातासारखे बाहेर आले…

    “काल रागाच्या भरात अतिवेगाने गाडी चालवताना माझा विचार केलास तू? नशीब थोडक्यात निभावलं सगळं. पण तुला गंभीर जखमा झाल्या असत्या तर, मी स्वतःला माफ करू शकलो नसतो रे. सावलीला सोडून जाताना काहीच कसं नाही वाटलं तुला? पण यापुढे मात्र मी असं होऊ देणार नाही. तू कितीही भांडलास तरी, तुला एकटं सोडून जाणार नाही कुठे मी…”

    एवढ्या शारीरिक वेदना होत असताना देखील माझं बोलणं ऐकून तो हसला आणि म्हणाला,

    “नसेल जर जवळ माझ्या सावली

    समजेन मी जाण्याची वेळ आली”

    पुढचं तो काही बोलायच्या आधीच मी माझा हात त्याच्या तोंडावर ठेवून म्हणालो,

    “तुझी सावली बनून राहीन

    आज देतो मी तुला वचन…

    वेळ आलीच तर तशी, तुझ्या

    संगे मी देखील संपून जाईन

    भांड तुला पाहिजे तेवढे

    मी सगळं शांतपणे ऐकीन

    सावलीचे काम निमुटपणे

    मी शेवटपर्यंत करीन.”

    त्याने दोन्ही हात जेमतेम वर करून मला जवळ यायची विनंती केली. मी देखील हसत हसत जाऊन त्याची गळाभेट घेतली.

    दादा वहिनींच्या चेहऱ्यावरचं समाधान मला बरंच काही सांगून गेले.

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026 ललित

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026 ललित

    स्मृतीगंध… मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    By स्नेहा सुतारMay 30, 2026

    भाग – 16 जुईलीच्या चेहऱ्यावरचं हसू रेवतीला एक आंतरिक समाधान देऊन गेलं. किती दिवसांनी जुईली…

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026

    स्मृतीगंध… मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026

    स्मृतीगंध… मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 313
    • अवांतर 187
    • आरोग्य 114
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 436
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 664
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026
    Most Popular

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.