Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शुक्राचे अध्यात्म

    September 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 सप्टेंबर 2026

    September 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : पारंपरिक ‘उन्हातले कैरीचे लोणचे’
    फूड काॅर्नर

    Recipe : पारंपरिक ‘उन्हातले कैरीचे लोणचे’

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरMay 15, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, कैऱ्यांचा सीझन, कैरीचे लोणचे, पारंपारिक लोणचे, उन्हातले कैरीचे लोणचे, पारंपरिक उन्हातले कैरीचे लोणचे, कैरी लोणचे, पारंपारिक कैरी लोणचे, विदर्भ स्पेशल उन्हातले कैरीचे लोणचे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नागपूरसारख्या कडक उन्हात कैरीचे ‘उन्हातले लोणचे’ (Sun-dried Pickle) घालणे म्हणजे एक उत्तम प्रयोग असतो! या लोणच्यात कैरीच्या फोडी नैसर्गिकरीत्या उन्हात मुरवल्या जातात, त्यामुळे ते लोणचे वर्षभर टिकते आणि त्याची चवही अधिक खुलते. या लोणच्याकरिता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कैऱ्यांची निवड करणे आहे. दोन किलो कैरीसाठी ही ‘पारंपारिक उन्हातल्या लोणच्याची’ कृती खालीलप्रमाणे आहे.

    कडक आणि करकरीत तसेच आंबट गावरान कैऱ्या घ्या. कैऱ्या स्वच्छ धुवून, कोरड्या कपड्याने पुसून घ्या. मग त्यांच्या फोडी करून घ्या. (कोय नको असेल तर काढून टाका. मी तर यांच्या कोवळ्या कोयीपण लोणच्यात टाकते म्हणजे लोणचं खाताना मिठात मुरलेल्या कोयींची चव अफलातून लागते.) या फोडींना हळद आणि मीठ लावून घ्या आणि एका मोठ्या ताटात किंवा सुती कापडावर एक दिवस पसरवून ठेवा. यामुळे फोडींमधील अतिरिक्त पाणी (ओलावा) निघून जाईल. यानंतर महत्त्वाची स्टेप म्हणजे या लोणच्याचा मसाला तयार करणे. त्याकरिता साहित्य खालीलप्रमाणे घ्यावे –

    लोणच्याचा मसाला

    • मोहरीची डाळ – 250 ग्रॅम
    • तिखट – 200 ग्रॅम
    • मेथी दाणे – 2 ते 3 चमचे (अंदाजे 20 ते 25 ग्रॅम)
    • काळी मिरी – एक ते दीड चमचा
    • लवंग – 10 ते 12 नग
    • बडीशोप – चार  ते पाच मोठे चमचे (अंदाजे 40 ते 50 ग्रॅम)
    • धणे – तीन ते चार मोठे चमचे (अंदाजे 30 ते 40 ग्रॅम)
    • शेंगदाणा किंवा सरसोचे तेल – 500 ते 750 मि. ली.
    • हळद –  50 ग्रॅम
    • मीठ – 300 ग्रॅम
    • हिंग – 2 चमचे

    कृती

    1. मोहरीची डाळ, तिखट, मेथी दाणे, काळी मिरी, लवंग, बडीशोप, धणे हे सर्व जिन्नस सांगितलेल्या प्रमाणात कढईत मंद आचेवर गुलाबीसर भाजून याची भरड पावडर करून घ्यावी.
    2. नंतर यामध्ये 50 ग्रॅम हळद, 300 ग्रॅम मीठ (मीठ थोडे जास्त ठेवावे, ते टिकवण्याचे काम करते) आणि 2 चमचे हिंग एकत्र करुन सर्व मसाले छान मिक्स करा.
    3. 500 ते 750 मि. ली. शेंगदाणा किंवा सरसोच्या तेलाची फोडणी करावी. या फोडणीत जिरे आणि मोहरी टाकून एक चमचा खड्या हिंगाची पूड टाकावी नंतर गॅस बंद करून तेल पूर्णपणे थंड करावे.
    4. एका मोठ्या परातीत कोरड्या झालेल्या कैरीच्या फोडी घेऊन त्यात तयार केलेला मसाला टाकून कैरीच्या फोडी त्यामध्ये चांगल्या घोळवून घ्याव्यात जेणेकरून कैरीच्या फोडींना सर्व बाजूंनी मसाला व्यवस्थित लागेल.
    5. त्यानंतर थंड झालेले तेलातील अंदाजे एक ते दीड पाव तेल बाजूला काढून उरलेले तेल थोडे-थोडे घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करा.
    6. आता हे मिश्रण एका काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरा. मिश्रण अर्धे भरल्यावर बाजूला काढून ठेवलेले तेल त्यात टाकावे आणि नंतर उरलेल्या कैरीच्या फोडी टाकून सर्व मिश्रण कोरड्या चमच्याने एकत्र करावे.
    7. त्यानंतर बरणीचे तोंड एका पातळ सुती कपड्याने (मलमलच्या कापडाने) बांधून ठेवावे.
    8. ही बरणी 3 ते 4 दिवस रोज सकाळी कडक उन्हात ठेवावी. उन्हामुळे मसाल्यांमधील तेल फोडींमध्ये नीट शोषले जाते आणि कैरी मऊ होते.
    9. रात्री बरणी उन्हातून काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावी. दररोज एकदा स्वच्छ आणि कोरड्या लाकडी चमच्याने लोणचे वर-खाली करावे. यामुळे सर्व फोडींना मसाला व्यवस्थित आणि समान लागतो.
    10. हे लोणचे 15 दिवसांनंतर खाण्यासाठी वापरू शकता. उन्हातले हे लोणचे तयार झाल्यावर त्याचा सुगंध आणि चव अप्रतिम लागते!

    हेही वाचा – Recipe : मोड आलेल्या मेथीदाण्यांचे रुचकर लोणचे!

    ही खबरदारी घ्या

    1. ओलसरपणा टाळा : लोणच्याला हात लावताना किंवा चमचा वापरताना तो ओला नसावा. ओलावा हेच लोणचे खराब होण्याचे प्रमुख कारण आहे.
    2. तेलाचे प्रमाण : साधारण एका आठवड्यानंतर पाहा, जर तेल कमी वाटले तर थोडे तेल गरम करून, थंड करून वरून ओता. फोडी तेलात बुडलेल्या असाव्यात.
    3. निसर्गाची चव : उन्हात लोणचे शिजल्यामुळे त्याला एक नैसर्गिक ‘स्मोकी’ आणि घट्ट चव येते, जी नेहमीच्या लोणच्यापेक्षा वेगळी असते.
    4. मीठ आणि तिखटाचे प्रमाण : 300 ग्रॅम मीठ आणि 200 ग्रॅम तिखट हे 2 किलोसाठी आदर्श प्रमाण आहे. मीठ हे नैसर्गिक संरक्षक (Preservative) म्हणून काम करते, ज्यामुळे लोणचे खराब होत नाही.
    5. तेल कडकडीत गरम करून पूर्णपणे थंड करणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. गरम तेल घातल्यास लोणचे मऊ पडते किंवा काळे पडते, जे या रेसिपीत टाळले आहे.

    एक्सपर्ट टीप

    • या लोणच्याला तर 3 ते 4 दिवस ऊन पुरेसे आहे. त्यानंतर बरणी घरात सावलीत ठेवा. जास्त दिवस कडक उन्हात ठेवल्यास फोडी खूप निब्बर (चामट) होऊ शकतात. तुमची ही लोणच्याची बरणी उघडल्यावर अख्ख्या गल्लीत सुगंध दरवळेल यात शंका नाही!

      तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

      avaantar.recipe@gmail.com

      या ईमेलवर किंवा

      9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

      तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    विदर्भ स्पेशल… वाटीभर मुगाच्या दाण्यांची कढईभर आमटी!

    August 28, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : चटपटीत कैरी लोणचे आणि भोकरांचे लोणचे

    August 26, 2026 फूड काॅर्नर

    ताक…

    August 22, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    विदर्भ स्पेशल… वाटीभर मुगाच्या दाण्यांची कढईभर आमटी!

    By माधवी जोशी माहुलकरAugust 28, 2026

    माझं माहेर विदर्भातील अकोला! अकोल्याला स्वतःचा एक वेगळा असा खाद्यसंस्कृतीचा वारसा आहे. स्त्री वयाने कितीही…

    Recipe : चटपटीत कैरी लोणचे आणि भोकरांचे लोणचे

    August 26, 2026

    ताक…

    August 22, 2026

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    August 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शुक्राचे अध्यात्म

    September 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 सप्टेंबर 2026

    September 1, 2026

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    August 31, 2026

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 417
    • अवांतर 206
    • आरोग्य 142
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 560
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 28
    • ललित 886
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शुक्राचे अध्यात्म

    September 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 सप्टेंबर 2026

    September 1, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.