Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट

    May 11, 2026

    अजब न्याय… फिर्यादीच ठरला दोषी!

    May 11, 2026

    Dnyaneshwari : पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें

    May 11, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट
    ललित

    दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेMay 11, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, कॅडबरी चॉकलेट, आजी आजोबा आणि चेतन, आजीचे दु:ख, आजीसाठी कॅडबरी चॉकलेट, आजीच्या दु:खावर उपाय कॅडबरी, चेतन अमेरिकेत स्थायिक, आजीचा मृत्यू, आजोबांचे वृद्धाश्रमात जाणे,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आज खूप दिवसांनी आजोबा मैदानावर दिसले. माझं रोजचं चालणं संपवून मी ते बसलेल्या बाकापाशी जाऊन उभा राहिलो. आजोबांचा नेहमीचा सळसळता उत्साह गायब होता. कसल्यातरी विचारात होते ते. शेवटी मीच संवाद सुरू केला… “आजोबा कुठे होता इतके दिवस? किती वाट बघितली मी तुमची.”

    आजोबांचे डोळे काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करत होते. शेवटी उसासा टाकत ते अस्पष्ट आवाजात बोलले, “ती गेली गेल्या महिन्यात!”

    आजोबांचे बोलणे ऐकून माझ्या पोटात धस्स झाले… “आजोबा, पण काय झाले अचानक? मी गेल्याच महिन्याच्या सुरुवातीला तर भेटून गेलो होतो आजींना…”

    “तू येऊन गेल्यानंतर दहा दिवसांनी खेळ आटोपला. तुला भेटायचे होते म्हणून मी आज पहिल्यांदाच बाहेर पडलो आहे.”

    मी नि:शब्द झालो होतो… भावनाविवश झालो होतो. मला गेल्या वर्षीची आमची पहिली भेट आठवली…

    माझ्या घराजवळच्या किराणा मालाच्या दुकानात आजोबा मला पहिल्यांदा भेटले होते. दुकानातील माणसाने त्यांच्या पुढ्यात डझनभर कॅडबरी चॉकलेट आणून ठेवली. ती बघून त्यांच्या डोळ्यांतील चमक मला आठवून गेली…

    “आजोबा, नातवंडांना देण्यासाठी घेतलीत की काय एवढी चॉकलेट?” मी न रहावून त्यांना विचारले. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने मला थोडं आश्चर्य वाटले. आजोबा बोलून गेले, “माझ्या बायकोला आवडतात. तिच्यासाठी घेतली आहेत.” एवढं बोलून आजोबा दुकानाबाहेर पडले…

    हेही  वाचा – सागरगोटे… आयुष्यातील चढ-उताराचे अन् सुख-दुःखाचे!

    नंतर खूपदा मला आजोबा भेटले, त्याच दुकानात. पण दरवेळी ते फक्त कॅडबरी चॉकलेटच घ्यायचे विकत. माझं कुतूहल आमच्या प्रत्येक भेटीत वाढत होतं आणि ते आजोबांनी ओळखले. एक दिवस मला ते त्यांच्यासोबत त्यांच्या घरी घेऊन गेले.

    “ये तुझी ओळख करून देतो माझ्या बायकोशी,” असं म्हणून आजोबा मला आतल्या खोलीत घेऊन गेले. समोरच्या बेडवर आजी झोपलेल्या होत्या. आजोबा त्यांच्या कानाजवळ जाऊन म्हणाले, “अगं बघतेस का कोण आलं आहे तुला भेटायला? हा अद्वैत आहे. माझा तरूण मित्र आहे.”

    मी त्यांच्या बेडच्या जवळ गेलो. आजींनी किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितले. त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यांत मला फक्त उदासीनता दिसली. हात जोडून मला नमस्कार केला त्यांनी आणि हातानेच बसायला सांगितले.

    आजोबांनी एव्हाना एका चॉकलेटची चांदी काढून त्याचे आठ दहा छोटे-छोटे तुकडे करून आजींच्या जिभेवर त्यातला एक तुकडा ठेवला…

    “अद्वैत बस आता शांतपणे. तुझ्या मनातील सगळ्या शंकांचे मी उत्तर देतो तुला.”

    माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसून आजोबा मला सांगायला लागले आणि भोग भोगायला लागणे म्हणजे काय ते मला पुढच्या तासाभरात समजून गेले.

    आजी-आजोबांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत आहे. आजकाल आपण घरोघरी बघतो तशीच गोष्ट आजी-आजोबांची होती. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी झालेल्या चेतनला जमेल तेवढ्या लाडाकोडात वाढवले दोघांनी. चेतन जात्याच हुशार. आयआयटीतून प्रावीण्यासह  इंजिनीअर झाला. परदेशी विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळवून पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत दाखल झाला. तिथे रुळला आणि नंतर तिथेच स्थायिक झाला… सुरुवातीला काही वर्ष कौतुकाने भारतात येत होता. पण परदेशी मुलीशी लग्न केले आणि त्याचे भारतात येणं लांबत गेलं आणि गेली काही वर्षे पूर्ण थांबलं.

    आजी आणि आजोबा, दोघांची सरकारी नोकरी. मिळणाऱ्या निवृत्ती वेतनावर दोघांचे आयुष्य सुरु होते. पण तरीही डोळ्यांत दाटून रहायच्या चेतनच्या आठवणी. आजोबा मनातून खंबीर होते, पण आजी तशा नव्हत्या. काही वर्षांनी आजींना कॅन्सर झाला आणि पहिल्यांदा आजोबा खचले. चेतनच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आजींची समजूत कशी काढायची, हा त्यांच्यापुढे यक्ष प्रश्न होता. पण त्याचं उत्तर त्यांनीच शोधलं कॅडबरी चॉकलेटच्या रुपात. जेव्हा जेव्हा आजी अगतिक होऊन जायच्या तेव्हा कॅडबरीचा तुकडा आजोबा आजीच्या जिभेवर ठेवायचे. त्या गोडव्यात आजी काही काळ चेतनचं दुःख विसरून जायच्या…

    मी कॅडबरी चॉकलेटचा शोध लावणाऱ्या त्या महान व्यक्तीला मनातून साष्टांग नमस्कार घातला. त्या कॅडबरी चॉकलेटने आजी-आजोबांची सोबत काही वर्षं अव्याहत केली आणि गेल्या महिन्यात संपली.

    हेही वाचा – बॅक स्टेज… हाच योग्य निर्णय!

    “आजोबा…” मला पुढे बोलवतच नव्हते.

    आजोबांनीच उलटं माझं सांत्वन केले आणि म्हणाले, “मी हळूहळू इथला पसारा आवरून एका वृद्धाश्रमात माझी सोय करणार आहे. त्या दृष्टीने माझा पत्रव्यवहार सुरू आहे. जायच्या आधी तुला नक्कीच भेटीन मी… अरे, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की, हिच्या जिभेवरचा कडवटपणा मी कॅडबरी चॉकलेटने दूर करू शकलो; पण तिच्या मनातील कडवटपणा मी खूप प्रयत्न करून देखील दूर नाही करू शकलो. खूप आर्जव केली चेतनकडे, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पोटचा पोर असून पोरका करून गेला आम्हाला आणि आज ती मला पोरकं करून गेली… त्याचं नांव तिने हौसेने चेतन ठेवले, पण आमच्या दोघांचे आयुष्य आमच्या मुलाने कित्येक वर्षे अचेतन करून ठेवले!”

    आजोबा घरी जायला निघाले. त्यांच्या पायातली शक्ती कमी झालेली मला जाणवली. मी त्यांना आधार देत उभे केले. हातातल्या काठीने सावकाश पावलं टाकत ते घराकडे जायला निघाले. जाताना माझ्या हातात त्यांच्या घरात उरलेली कॅडबरी चॉकलेट कोंबून गेले… त्या चॉकलेटचा गोडवा आजींच्या आठवणीत पूर्णपणे निघून जाणारच होता, पण तरीही आजोबांच्या समाधानासाठी मी ती सगळी चॉकलेट खिशात कोंबून मी मैदानातून बाहेर पडलो…

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    अजब न्याय… फिर्यादीच ठरला दोषी!

    May 11, 2026 ललित

    लीला आजीचं बोलणं ऐकून आरू आणि शिव दोघेही चिडले

    May 10, 2026 ललित

    प्रसादची हीच ती ‘सखी’!

    May 10, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    अजब न्याय… फिर्यादीच ठरला दोषी!

    By सुधीर करंदीकरMay 11, 2026

    ही गोष्ट आहे परदेशातली… गावाबाहेरचा मोकळा रस्ता आहे. एक आलिशान कार एक मॅडम चालवत आहेत.…

    लीला आजीचं बोलणं ऐकून आरू आणि शिव दोघेही चिडले

    May 10, 2026

    प्रसादची हीच ती ‘सखी’!

    May 10, 2026

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट

    May 11, 2026

    अजब न्याय… फिर्यादीच ठरला दोषी!

    May 11, 2026

    Dnyaneshwari : पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें

    May 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 मे 2026

    May 11, 2026

    लीला आजीचं बोलणं ऐकून आरू आणि शिव दोघेही चिडले

    May 10, 2026

    90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    May 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 294
    • अवांतर 185
    • आरोग्य 109
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 415
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 205
    • मैत्रीण 18
    • ललित 616
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट

    May 11, 2026

    अजब न्याय… फिर्यादीच ठरला दोषी!

    May 11, 2026

    Dnyaneshwari : पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें

    May 11, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट

    May 11, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.