Monday, February 23, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधसाप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 फेब्रुवारी 2026

साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 फेब्रुवारी 2026

मेष

आठवड्याची सुरुवात आनंदात होईल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी वादविवाद टाळावा. शांततेत निर्णय घ्या. तुमचे अंदाज बरोबर येतील. गुरूची साथ मिळेल. व्यावसायिक वर्गाला महिन्याच्या शेवटी लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, पटकन विश्वास ठेवून कोणाला पैसे उसने देऊ नका. भावंडांबरोबर घालवलेला वेळ महिलांना संस्मरणीय ठरेल. विद्यार्थ्यांना पॉकेटमनी वाढवून मिळेल.


वृषभ

या आठवड्यात शुभ घटना घडतील. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी चतुराईने वागावे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तथापि, सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्या. व्यावसायिक वर्गाला नवीन गुंतवणूकदार मिळतील; त्यांच्या अटी नीट समजून घ्या. करार करताना अतिशय सजग राहून सही करा. कुटुंबात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे महिलांचा उत्साह दुणावेल. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम नोकरीची संधी मिळेल.


मिथुन

या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या. नोकरदारांनी कामाचा फार ताण घेऊ नये. वरिष्ठांबरोबर विचारपूर्वक चर्चा करा आणि मगच निर्णय घ्या. शब्दांत अडकू नका. व्यावसायिक वर्गाला कामानिमित्त परदेशी प्रवास करावा लागू शकतो. मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. महिलांना मनाप्रमाणे खरेदी करता येईल. जुन्या मैत्रिणी भेटतील. विद्यार्थ्यांनी मित्रांच्या भांडणात मौन बाळगावे, आपले मत देऊ नका.


कर्क

या आठवड्यात जुने आजार डोके वर काढतील. नोकरदारांना पूर्वी गुंतवलेले पैसे आता मिळतील. विचार करून पुन्हा गुंतवणूक करा. ठरलेली कामे वेळेत पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाकडे नवीन प्रस्ताव येतील, त्यासंदर्भातील कागदपत्रे सांभाळून ठेवा. सोबतच पाकीट सांभाळा. महिलांनी नातेसंबंधांची काळजी घ्यावी. पतीच्या आरोग्याची चिंता राहील. विद्यार्थ्यांनी गणेशाची उपासना करावी, मन स्थिर ठेवावे.


सिंह

या आठवड्यात संमिश्र घटनांचा काळ आहे. नोकरदारांनी ‘कामास काम’ एवढेच धोरण ठेवावे. कोणालाही शिकवायला जाऊ नका. विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका. व्यावसायिक वर्गाने कामगारांची क्षमता ओळखून त्यांना काम द्यावे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी, पथ्य पाळा. नियमित व्यायाम करावा. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालावे, आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळेल.

हेही वाचा – योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य


कन्या

या आठवड्यात संवादावर भर द्यावा. नोकरदारांनी वेळेचे नियोजन करा. स्वतःची कामे स्वतःच करावीत. इतरांना कामात मदत करा. व्यावसायिक वर्गाला जुनी येणी प्राप्त होतील. नवीन कामे मिळतील. हाताखालच्या लोकांवर अवलंबून राहू नका. महिला शाळेतील मैत्रिणींबरोबर सहलीला जातील. विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून जॉब लागण्याची शक्यता आहे.


तुळ

या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या. नोकरदारांवर कामाचा ताण राहील, पण कामाच उरक पाहून वरिष्ठ खूश राहतील. बोलताना सांभाळून आणि विचार करून बोला. व्यावसायिक वर्गाला जास्त कष्ट करावे लागतील. नव्या कराराबाबत अभ्यास करून निर्णय घ्यावा. महिलांनी मुलांबरोबर वाद घालू नये, नवीन पिढीचे विचार समजून घ्या. विद्यार्थ्यांनी कोणत्याही मोहात पडू नये. अभ्यासात एकाग्रता ठेवावी.


वृश्चिक

हा आठवडा सर्वसाधारण आहे. नोकरदारांना वेळेचे नियोजन आणि कामातील तत्परतेमुळे सगळी कामे सुरळीतपणे पार पाडता येतील. व्यावसायिक वर्गाला आधी केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. स्पर्धक कुरापती करून त्रास देतील. महिलांचा आईशी वाद होण्याची शक्यता आहे, पण शांत रहावे. विद्यार्थ्यांनी मित्रांबरोबर भटकू नये; घरी वेळेवर पोहोचावे. नाहीतर आईची बोलणी खावी लागतील.


धनु

या आठवड्यात दाताचे दुखणे उद्भवेल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल, वरिष्ठ जास्त काम देतील. परंतु सहकारी मदत करतील. व्यावसायिक वर्गाने भागीदाराचे मत विचारात घ्यावे. नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांना घरातील मदतनीस महिला त्रास देऊ शकतात. अचानक सुट्टी घेऊन काम वाढवतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. त्याचे शिक्षकांकडून कौतुक होईल.


मकर

या आठवड्यात कामाचा ताण जाणवेल. आधीची रखडलेली कामे पूर्ण करण्यात नोकरदारांचा खूप वेळ जाईल. वरिष्ठ नाखूश राहतील. व्यावसायिक वर्गाला वेळेची किंमत कळेल. जुन्या प्रामाणिक लोकांना दुखवू नका. महिलांना आधी केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळेल. नवीन खरेदी कराल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत भावंडांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. पण कोणालाही दुखवू नका.


कुंभ

या आठवड्यात मानसिक त्रास जाणवेल. चिडचिड होईल. नोकरदारांनी कामाचे नियोजन करावे. स्वतःची कामे सहकाऱ्यांवर सोपवू नका. व्यावसायिक वर्गाने तब्येत सांभाळावी. बाहेरचा आहार घेण्याचे टाळावे. स्पर्धकांच्या हालचालींकडे लक्ष ठेवा. महिलांनी घरातील वृद्ध व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नये. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेसाठी योगा आणि मेडिटेशन करावे.

हेही वाचा – स्वभाव बदल… वयानुसार की, परिस्थितीनुसार?


मीन

या आठवड्यात महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. नोकरदारांनी स्वतःच्या कामाची जबाबदारी जाणून निर्णय घ्यावा. अचानक लाभ संभवतो. व्यावसायिक वर्गाने नवीन कर्ज सध्या घेऊ नये. पैशांच्या वसुलीसाठी प्रयत्न करावे लागतील. महिलांना बहिणीची काळजी राहील. विद्यार्थ्यांना कष्टाशिवाय पर्याय नाही.


prajaktakathe3970@gmail.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!