Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 24 फेब्रुवारी 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 24 फेब्रुवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 24, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 24 फेब्रुवारी 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 05 फाल्गुन शके 1947; तिथि : अष्टमी 28:51; नक्षत्र : कृत्तिका 15:07
    • योग : ऐंद्र 07:23, वैधृति 28:25; करण : विष्टी 17:57
    • सूर्य : कुंभ; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 07:03; सूर्यास्त : 18:41
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    दुर्गाष्टमी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – नवीन वास्तू अथवा घर खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. काही व्यावसायिकांच्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही नवीन योजना आखाल. संततीच्या प्रगतीने तुम्ही खूश असाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल. फक्त फास्ट फूड किंवा बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा.

    वृषभ – कार्यक्षेत्राचा विस्तार कराल. जमीन खरेदी करण्याची योजना आखत असाल तर पैशाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. घरातील वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद उपयोगी पडतील. आज जोडीदाराशी तुमचे नाते अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत उत्तम प्रगती साधता येईल.

    मिथुन – बँकिंग आणि आयटी क्षेत्रात काम करणारे जातक नोकरी बदलीची योजना आखू शकतात. तथापि, वरिष्ठ आज तुमच्या कामावर खूप खूश असतील. न्यायालयीन प्रकरणांपासून चार हात ला़ंब राहणे फायदेशीर ठरेल. नवीन व्यवसायातून नफा मिळण्याची अपेक्षा आहे. सतत बाहेर काम असणाऱ्या जातकांनी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

    कर्क – राजकारणात असलेल्या जातकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करायचे असतील तर त्यासाठी आवश्यक परवानग्या विनाअडथळा मिळू शकतील. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. नोकरीत नव्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

    सिंह – नोकरी करणारे जातक तसेच विद्यार्थी यांना अनुक्रमे कामात आणि शिक्षणात यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुम्हाला उत्तम यश मिळवून देतील. राजकारणाशी स़ंबंधित  जातक एखाद्या महत्त्वाच्या कामात यशस्वी होतील. तुमचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्या.

    कन्या – तुमचा दिवस चांगला जाईल. व्यवसाय वृद्धीसाठी सुरू असणारे प्रयत्न सफल होतील. नवीन वास्तूमधून नफा मिळेल. व्यवसायातील यशाने आनंदी व्हाल. नोकरीमध्ये तुमच्या मेहनतीची कदर होईल, पदोन्नतीची शक्यता आहे.कौटुंबिक जीवनात तुम्ही दोघेही एकमेकांच्या भावनांची कदर कराल, ज्यामुळे तुमच्यातील नाते आणखी दृढ होईल.

    तुळ – आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील जातकांसाठी नवीन संधी निर्माण होतील. तुमच्या आजूबाजूच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवा. कामाच्या जोरावर नोकरदार उच्चपदस्थांची मर्जी संपादन करतील. शारीरिक आरोग्य चांगले राखण्यासाठी योगसाधना आणि ध्यानधारणा यांची उत्तम मदत मिळेल. घर सजावटीच्या वस्तू खरेदी करण्याचा विचार असेल.

    हेही वाचा – Flirting… काही असेही अनुभव!

    वृश्चिक – नोकरदार जातकांच्या नोकरीत बदल शक्य आहे. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. व्यवसायवृद्धी करताना येणाऱ्या आव्हानांवर तुम्ही सहजपणे मात कराल. मित्रासोबत सुरू असलेला वाद आज संपेल. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणारी एखादी बातमी समोर येईल. मात्र त्याने खचून न जाता येणाऱ्या नव्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असेल.

    धनु – तुम्हाला व्यवसायात मोठे यश मिळेल. तुम्ही जे काही इच्छिता, त्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. नोकरदार जातकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आर्थिक फायदा होईल मात्र सोबत खर्चही वाढतील. डोळ्यांची जळजळ होत असेल तर दुर्लक्ष करू नका, वेळेत योग्य ते उपचार करून घ्या.

    मकर – नोकरदार जातकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. शिक्षणाशी संबंधित जातकांना अपेक्षित यश मिळेल. व्यवसाय वाढवण्यासाठी व्यावसायिकांनी नवीन पद्धतीचा अवलंब करावा, ज्यातून तुम्हाला नफा देखील मिळेल. स्वतःसाठी नवीन कपडे खरेदी करण्याचा विचार कराल.

    कुंभ – व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. विवेकबुद्धीने तुम्ही प्रलंबित कार्यालयीन कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुमचे शत्रू देखील आज तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील. मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी ध्यानधारणा आणि योगसाधना उपयोगी पडेल.

    मीन – नोकरीच्या ठिकाणी मोठे यश मिळेल. राजकीयदृष्ट्या मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. आहाराकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. घरी एखाद्या नातेवाईकाचे अनपेक्षितपणे आगमन होईल. यामुळे वातावरण आनंदी बनेल.


    दिनविशेष

    माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध जादूगार स्टीव्ह जॉब्स

    टीम अवांतर

    माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध जादूगार आणि ॲपल या जगप्रसिद्ध कंपनीचे मालक स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1955 रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे झाला. मात्र त्यांच्या जन्मदात्यांनी या नको असलेल्या मुलाला एक ॲडोप्शन सेंटरला देऊन टाकले. पुढे पॉल आणि क्लॅरा जॉब्स या दाम्पत्याने लहानग्या स्टीव्हला दत्तक घेतले.

    1968 मध्ये होमस्टेड हायस्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या स्टीव्ह जॉब्स यांची भेट स्टीव्ह वोजनियाक यांच्याशी झाली. याच दोघांनी मिळून पुढे ॲपल या कंपनीची सुरुवात केली. 1976 च्या सुमारास वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोजनियाक यांनी एका गॅरेजमध्ये ॲपल कंपनीची स्थापना केली. संगणक बनवायचे काम स्टीव्ह वोजनियाक यांचे तर त्याचे फंडिंग, मार्केटिंग आणि विक्री हे काम स्टीव्ह जॉब्स यांचे होते. मोठा, बोजड असणारा संगणक सुटसुटीत आणि आकर्षक बनवण्याचे श्रेय स्टीव्ह जॉब्स यांना जाते. याशिवाय त्याला माऊस जोडण्याची किमया देखील त्यांनी साधली. त्यामुळे ॲपल 1 आणि ॲपल 2 अशी दोन वर्जन बाजारात येताच त्यांनी धुमाकूळ घातला.

    हेही वाचा – आसपास वावरणारे… मुखवटे आणि चेहरे

    मात्र कंपनीच्या संचालक मंडळाशी त्यांचे बिनसले आणि त्यांच्याच कंपनीतून स्टीव्ह जॉब्स यांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र याने खचून न जाता जॉब्स यांनी जॉर्ज लुकासकडून 50 मिलियन डॉलर्समध्ये लुकास फिल्म ही ॲनिमेशन क्षेत्रातील कंपनी विकत घेतली. 1995 साली या कंपनीने बनवलेल्या Toy Story या चित्रपटाने सर्वत्र गाजला.

    दुसरीकडे 1997 साली ॲपल कंपनीची वाताहत थांबावी यासाठी कंपनीने पुन्हा एकदा स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे धाव घेतली. कंपनीचे CEO म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी केवळ 8 ते 10 उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून त्यांचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आणि कंपनीचा कारभार पुन्हा एकदा रूळावर आणला. 2001 मध्ये पोर्टेबल ipod, 2006 मध्ये मॅकबुक, 2007 मध्ये पहिला iPhone ही उत्पादने कंपनीने बाजारात आणली आणि त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली. स्टीव्ह जॉब्स हे नावही लोकांच्या मनात बसले. 2003 साली कॅन्सर असल्याचे निदान झाले तरी 2010 पर्यंत त्यांनीच कंपनीचा कारभार सांभाळला. 2010 मध्ये टीम कुक यांच्या हाती कंपनीची सूत्रे दिली आणि कंपनीतून कायमची निवृत्ती घेतली. 5 ऑक्टोबर 2011 साली स्टीव्ह जॉब्स या उद्योगपतीचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    April 8, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 10, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 एप्रिल 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 20…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    April 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 एप्रिल 2026

    April 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 263
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 379
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 546
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Most Popular

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.