Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026

    अपयश… चुकीच्या स्पर्धेतले!

    April 8, 2026

    आयुष्याच्या प्रवासातील दोन सोबती

    April 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 9, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 09 एप्रिल 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 19 चैत्र शके 1948; तिथि :  सप्तमी 21:18; नक्षत्र : मूळ 08:47;
    • योग : परिघ 17:56; करण : विष्टि 08:12;
    • सूर्य : मीन; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:53;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    विख्यात लोककला अभ्यासक अशोक परांजपे

    टीम अवांतर

    महाराष्ट्रातील लोककला संशोधक, गीतकार, नाटककार अशोक गणेश परांजपे यांचा जन्म 30 मार्च 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे झाला. हरिपूर ही भूमी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या नावाने ओळखली जाते. त्यांचे ग्रामसंस्कृतीशी अतूट नाते होते. शालेय जीवनापासूनच सांगली परिसरातील लोककलांचे विलक्षण आकर्षण त्यांना वाटू लागले. शाहीर आनंदराव सूर्यवंशी, शाहीर बापूराव विभूते, तमाशा कलावंत शंकर तात्या सावजळकर, काळू – बाळू अशा लोककलावंतांशी त्यांचा सततचा संपर्क होता. शाहिरी, सोंगी भारुड दत्तपंथी भजन, तमाशा, तलवार, दांडपट्टा, करपल्लवी या लोककला सांगली परिसरात लोकप्रिय होत्या; त्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. लेखन, वाचन, चित्रकारी सोबतच कुस्तीची त्यांना आवड होती. मुंबईत आल्यावर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी चित्रकलेचे धडे घेतले.

    हेही वाचा – ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    10 ऑक्टोबर 1978 रोजी इंडियन नॅशनल थिएटर लोक प्रयोज्य कला संशोधन केंद्राची स्थापना वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या हस्ते झाली. या संशोधन केंद्राचे संचालक म्हणून अशोक परांजपे यांनी जबाबदारी स्वीकारली तसेच ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यावेळी खंडोबाचे जागरण, देवीचा गोंधळ, कोकणातील दशावतार, ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या कला, पारंपरिक तमाशा, कीर्तन, लळीत अशा लोककलांच्या जतन, संवर्धन आणि संशोधनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी कार्य केले. आयएनटीतर्फे ग्रामीण भागातील लोककला आणि लोककलावंतांना नागर रंगमंच उपलब्ध करून देण्याचे कामही त्यांनी केले.

    सन 1986 साली त्यांच्या संकल्पनेतून या कला संशोधन केंद्रातर्फे आनंदवन वरोरा येथे आदिवासी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी या आदिवासी महोत्सवाचे मार्गदर्शक होते. दामू झवेरी, कपिला वात्सायन, दुर्गा भागवत आदी मान्यवर या महोत्सवाला उपस्थित होते. 1992मध्ये पंढरपूर येथे भक्तीसंगीत महोत्सवाचे आयोजन त्यांच्याच संयोजनाने झाले होते. फ्रान्स, आयलंड, जपान आदी देशांत महाराष्ट्रातील लोककलांची पथके नेऊन तेथे अशोक परांजपे यांनी मार्गदर्शन केले.

    खंडोबाचे जागरण, लळीत, दशावतार, वासुदेवांची गाणी, नमन खेळे, मादळ सारख्या आदिवासी कला यावर अभ्यासपूर्ण पुस्तिका त्यांच्या संकल्पनेतून आयएनटीने प्रसिद्ध केल्या. खंडोबाचं लगीन, दशावतारी राजा, जांभूळख्यान, वासुदेव सांगती, अरे रे संसार, मातीचं स्वप्न अशा आयएनटी संशोधन केंद्राच्या नाट्यांची मूळ संकल्पना आणि लेखन मार्गदर्शन परांजपे यांचे होते.

    अशोक परांजपे यांचे मराठी रंगभूमीवरील योगदान नाटककार म्हणून उल्लेखनीय आहे. संत कान्होपात्रा, संत गोरा कुंभार, अबक दुबक, बुद्ध इथे हरला आहे, आतून कीर्तन वरून तमाशा, दार उघड बया सारखी संगीत रंगभूमीचे वैभव वाढविणारी नाटके त्यांनी लिहिली. नाटकांसोबतच वर्तमानपत्रात त्यांनी स्तंभ लेखन केले. ‘अनोळखी पाऊले’ ही त्यांची स्तंभलेखन मालिका अतिशय प्रसिद्ध होती. लोककलांचे संशोधन, नाट्यलेखन या सोबतच ते गीतकार म्हणूनही लोकप्रिय होते. अवघे गर्जे पंढरपूर, आला आला सुगंध मातीचा, एकदाच यावे सखया, कुणी निंदावे वा वंदावे, केतकीच्या बनी तिथे, दारी उभी अशी मी दीनांचा कैवारी, नाम आहे आदी अंती, नाविका रे, पाखरा जा दूर देशी, पैलतीरी रानामाजी, वाट इथे स्वप्नातील संपली जणू, आला आला सुगंध मातीचा अशी अनेक लोकप्रिय गीते त्यांनी लिहिली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. 9 एप्रिल 2009 रोजी औरंगाबाद येथे त्यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – व्यवसायात भावनिक निर्णय घेणे टाळा, त्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. अंतर्मनावर विश्वास ठेवा. आरोग्याच्या समस्या किरकोळ वाटली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तिचे रूपांतर गंभीर आजारात होऊ शकते. निराशाजनक बातमीमुळे तुम्हाला अनपेक्षितपणे प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती सामान्य राहील.

    वृषभ – सहकाऱ्यांसोबतचे जुने मतभेद मिटतील. नवीन वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरदार जातक कामाच्या ठिकाणी नवीन योजना आखतील आणि त्याला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. धनवृद्धी होईल. कुटुंबासोबतचे नाते अधिक घट्ट होईल, मुलांसोबतचा वेळ आनंददायी असेल. आज मानसिकदृष्ट्या आनंदी आणि उत्साही असाल.

    मिथुन – व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. बोलताना संयम बाळगणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आजचा दिवस लाभदायक असेल, पण खर्चाचे नियोजन करणे उत्तम. प्रत्येक कामात एक नियमितपणा ठेवा, सातत्य ठेवा. अन्यथा जमून येत असणाऱ्या गोष्टी बिघडू शकतात. जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.

    कर्क – प्रलंबित कामे पूर्ण होतील, विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी कराल. उत्पन्नात वाढ होईल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. नोकरीसोबतच करिअरमधील प्रगतीसाठी नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी आज चांगला दिवस आहे. उत्पन्न वाढेल आणि गुंतवणुकीतून फायदेशीर संधी मिळतील. सकारात्मक आणि आनंदी मनामुळे  आरोग्यही सुधारेल.

    सिंह – कौटुंबिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि वाद टाळा. आज भावंडांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. एखाद्या नवीन कामाबद्दल उत्साही असाल, वरिष्ठांशी तुमचा समन्वय अतिशय योग्य असेल. मालमत्तेच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. जंगम तसेच स्थावर मालमत्तेची काटेकोर तपासणी करा. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

    कन्या – अविवाहित व्यक्तींना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. मित्राच्या मदतीने करिअरमधील समस्या सुटतील. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. एखादी छोटी सहल फायदेशीर ठरेल. संध्याकाळ कुटुंबासोबत आनंदात घालवाल. मात्र कामासाठी झालेल्या छोट्या प्रवासामुळे थकवा येऊ शकतो.

    तुळ – जुने कौटुंबिक वाद मिटतील. महत्त्वाच्या बाबींवर वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. वैयक्तिक बाबींमध्ये बाहेरील व्यक्तींना हस्तक्षेप करू देऊ नका. महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होतील. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. आज खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल.

    वृश्चिक – आज व्यवसायाची प्रतिष्ठा वाढेल, तुमची कामगिरीही चांगली होईल. महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यावर तुम्ही एखादी छोटी पार्टी आयोजित करू शकता. कोणत्याही अज्ञात गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळा, कारण यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. तब्येत सांभाळा, पथ्ये पाळा. चालढकल करू नका.

    धनु – आजचा दिवस सामान्य असेल. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळू शकते. व्यवहारांबाबत सावधगिरी बाळगा; पैसे अडकण्याचा धोका आहे. नम्र राहा; तरच तुम्ही कामे पूर्ण करू शकाल. भागीदारी सुरू करण्यापूर्वी सगळ्या बाबींचा विचार करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहारांमध्ये जोखीम घेणे टाळा. दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल; प्रवास सुखद होईल. मात्र प्रवासाने थकवा येऊ शकतो; यासाठी पुरेशी विश्रांती घ्या.

    हेही वाचा – अपयश… चुकीच्या स्पर्धेतले!

    मकर – मुलाच्या करिअरबद्दलची चिंता दूर होईल. व्यावसायिक योजनांमधून नफा मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील आणि नियोजनानुसार नफा मिळत राहील. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे; वाद वाढवणे टाळा.

    कुंभ – सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये सहभागी व्हाल. खाण्याच्या सवयी सुधारा; जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. कुटुंबातील सदस्याच्या लग्नाविषयीची चर्चा पुढे जाईल. जवळच्या लोकांकडून पाठिंबा मिळेल. प्रतिस्पर्धी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना यश येणार नाही.

    मीन – नशीब तुमच्या बाजूने असेल. नवीन ओळखींमुळे फायदा होईल. मित्रांसोबत लांबच्या प्रवासाचे नियोजन करू शकता. प्रभावशाली लोकांच्या मदतीने नवीन व्यवसाय सुरू करता येईल. व्यावसायिकांना मोठा नफा मिळेल. मुलाच्या यशामुळे आनंद मिळेल. आज आरोग्य चांगले राहील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    April 8, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 एप्रिल 2026

    April 7, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 एप्रिल 2026

    April 6, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 8, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 एप्रिल 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 18…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 एप्रिल 2026

    April 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 एप्रिल 2026

    April 6, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 एप्रिल 2026

    April 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026

    अपयश… चुकीच्या स्पर्धेतले!

    April 8, 2026

    आयुष्याच्या प्रवासातील दोन सोबती

    April 8, 2026

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026

    Dnyaneshwari : सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु…

    April 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    April 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 261
    • अवांतर 180
    • आरोग्य 98
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 378
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 541
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026

    अपयश… चुकीच्या स्पर्धेतले!

    April 8, 2026

    आयुष्याच्या प्रवासातील दोन सोबती

    April 8, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.