Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    April 6, 2026

    न चुकलेली बस…

    April 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 6
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    रश्मी परांजपेBy रश्मी परांजपेApril 6, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, शालेय शिक्षण, जीवनव्यवहार शिक्षण, बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण, बालगटातील जीवनव्यवहार, बालगटातील शिक्षण, धान्य निवडणे, भाजी निवडणे, केर काढणे, भाजी निवडणे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण याबाबत माहिती घेतली. आता या लेखात आपण बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण याविषयी माहिती घेणार आहोत. सुरुवातीला शिशुगटातील जीवन व्यवहारातील विविध उपक्रमांची मुलांकडून उजळणी करून घेण्यात येते. मुलं हे उपक्रम साधारणतः पहिल्या आठवड्यातच चांगल्या प्रकारे करू लागतात. बालगटातील मुलांना उपक्रम देताना स्थूलाकडून सूक्ष्माकडे या तत्त्वाचा अवलंब करण्यात येतो.

    मुलांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत.

    जीवनव्यवहार शिक्षणातील उपक्रम

    1. कपड्यांचा घड्या घालणे

    रुमालाच्या घडीनंतर छोट्या बाळाचे कपडे मुलांना घडी घालण्यासाठी दिले जातात. अगोदर कपड्यांच्या घड्या कशा घालायच्या हे दाखवून नंतर मुलांकडून सराव करून घेण्यात येतो.

    1. वर्गवारी करणे

    बालगटातील मुलांना सारख्या दिसणार्‍या भाज्या दाखवून त्यांची वर्गवारी करून घेण्यात येते. उदाहरणार्थ भेंडी, श्रावणघेवडा, गवार इत्यादी.

    1. धान्य निवडणे

    शिशुगटाप्रमाणे धान्यात खडे न मिसळता दोन धान्ये एकत्र करुन मुलांना धान्ये वेगळी करण्यास शिकवले जाते. उदाहरणार्थ गहू आणि तांदूळ, ज्वारी आणि गहू, तूर डाळ आणि मसूर डाळ इत्यादी.

    1. भाजी निवडणे

    मेथी, पालक या पालेभाज्या निवडण्याचे मुलांना शिकविले जाते. नंतर कोथिंबीरही निवडायला देता येऊ शकते. भाज्या निवडताना भाज्यांचे देठ बाजूला काढण्यास सांगितले जाते.

    1. ताक करणे

    हा उपक्रम साधारणपणे होळीपौर्णिमेनंतर उन्हाळा सुरू झाल्यावर घेतला जातो. आदल्या दिवशी दूध पातेल्यात ओतून ते पातळ द्रव स्वरूपात आहे, हे मुलांना दाखवले जाते. नंतर त्यात विरजणासाठी थोडे दही घालून मिश्रण ढवळले जाते आणि ते पातेले झाकून गार पाण्यात ठेवण्यात येते. दुसरे दिवशी घट्ट दही तयार होते. या सर्व प्रक्रिया मुलांना दाखवण्यात येतात. नंतर दही रवीने घुसळून त्यात थोडे पाणी घालून ताक करण्यात येते. मुलांना घुसळण्याची क्रियाही शिकवली जाते. तद्नंतर, मीठ, साखर, हिंग घालून मुलांना ताक पिण्यास दिले जाते. हे सर्व करताना स्वच्छता काटेकोरपणे पाळण्यास शिकवले जाते.

    1. केर काढणे

    जमिनीच्या एका चौकोनात कागदाचे तुकडे आणि काही टाकाऊ वस्तू टाकून केर व्यवस्थित काढून सुपलीत भरायला शिकवले जाते आणि मुलांकडून केर काढून घेतला जातो.

    1. भांडी घासणे

    स्वतःचा डबा आणि पाणी पिण्याचे भांडे मुलांना घासून स्वच्छ करायला शिकवले जाते.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    वरील सर्व कृतींची प्रात्यक्षिके मुलांना दाखविण्यात येतात आणि मुलांकडून या कृती करून घेतल्या जातात. या कृती वानगीदाखल दिल्या असून अशा अनेक आणि तत्सम गोष्टी मुलांना नक्कीच शिकवता येतील. साहजिकच, अशा प्रकारच्या सर्व उपक्रमांमुळे बालगटातील जीवनव्यवहार शिक्षणातून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया मजबूत होतो.

    पुढील लेखात आपण बालशाळेतील खेळ याबाबत जाणून घेणार आहोत.


    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9881943593 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    Avatar photo
    रश्मी परांजपे

    रश्मी परांजपे वय 66 वर्षे. पुणे. शिक्षण - बी. कॉम्. पूर्व प्राथमिक (Pre-Primary) शाळेत 32 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत राहून निवृत्त. रेणुका स्वरुप संचलित सरकारमान्य पूर्व-प्राथमिक प्रशिक्षण परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. टेल्को समाज विकास केंद्र आणि मोरया शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2016मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2005पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. निवृत्तीनंतर यजमानांच्या योग प्रचार आणि प्रसार कार्यात तसेच निरामय आरोग्य संकल्पना राबविण्यात सक्रिय सहभाग. मोबाइल - 9881943593

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 30, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 30, 2026

    मागील लेखात आपण बालशाळेतील जीवनव्यवहार शिक्षण याविषयी माहिती घेऊन जीवनव्यवहार शिक्षणाचे फायदे जाणून घेतले. नंतर…

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    April 6, 2026

    न चुकलेली बस…

    April 6, 2026

    देखल्या देवा…

    April 6, 2026

    Dnyaneshwari : मी आघवियेचि सृष्टी, आदिमध्यांतीं किरीटी…

    April 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 एप्रिल 2026

    April 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 259
    • अवांतर 182
    • आरोग्य 97
    • पंचांग आणि भविष्य 376
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 191
    • मैत्रीण 17
    • ललित 536
    • शैक्षणिक 76

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    April 6, 2026

    न चुकलेली बस…

    April 6, 2026
    Most Popular

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.