Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    World Idli Day… इडलीकुमारीची कहाणी!

    March 30, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 30, 2026

    न चुकलेली बस…

    March 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, March 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    रश्मी परांजपेBy रश्मी परांजपेMarch 30, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, शालेय शिक्षण, जीवनव्यवहार शिक्षण, शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण, शिशुगटातील जीवनव्यवहार, शिशुगटातील शिक्षण, धान्य निवडणे, भाजी निवडणे, बैठक आसने मांडणे
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण बालशाळेतील जीवनव्यवहार शिक्षण याविषयी माहिती घेऊन जीवनव्यवहार शिक्षणाचे फायदे जाणून घेतले. नंतर आपण खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण याबाबत माहिती घेतली. आता या लेखात आपण शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण याविषयी माहिती घेणार आहोत.

    खेळगटातून शिशुगटात आलेली मुलं थोडी समजूतदार झालेली असतात. सुरुवातीला खेळगटातील जीवनव्यवहारातील विविध उपक्रमांची मुलांकडून उजळणी करून घेण्यात येते. मुलं हे उपक्रम साधारणतः पहिल्या आठवड्यातच चांगल्या प्रकारे करू लागतात. तद्नंतर, मुलांना घरातील छोट्या छोट्या कामांचे उपक्रम दिले जातात. अशाच काही उपक्रमांबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत.

    जीवनव्यवहार शिक्षणातील उपक्रम

    कपड्यांच्या घड्या घालणे

    सुरुवातीस रुमालाची घडी घालायला शिकवावी. रुमालाची टोके जुळवून घडी कशी घालायची हे शिक्षिकेने दाखवावे आणि नंतर मुलांकडून घड्या घालून घ्याव्यात. हे जमू लागल्यावर घडी घालण्यासाठी मोठे नॅपकिन घ्यावेत. यातून मुलांच्या बोटांच्या स्नायूंवर नियंत्रण येण्यास फायदा होतो.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    वस्तूंचे एकत्रीकरण आणि वर्गवारी करणे

    निरनिराळ्या आकारांचे ठोकळे तसेच विविध खेळणी एकत्र करून नंतर एकसारख्या दिसणार्‍या वस्तू वेगळ्या ठिकाणी एकत्र ठेवण्यास सांगितले जाते. यालाच वस्तूंचे वर्गीकरण म्हणतात. बटाटे, कांदे, टोमॅटो, काकडी, सिमला मिरची अशा भाज्या घेऊन देखील हा उपक्रम राबवला जातो. वस्तूंचे आकार आणि रंग याबाबतचे दृढीकरण अशा खेळांतून होते.

    धान्य निवडणे

    गहू, तांदूळ यात थोडे खडे मिसळून असे धान्य मुलांना देऊन निवडायला शिकवावे. धान्यातील खडे काढून इकडे तिकडे फेकून देण्याऐवजी एका वाटीत ठेवायला आवर्जून सांगावे.

    भाजी निवडणे

    शिशुगटातील मुलांना मुख्यत्वेकरून मटाराच्या शेंगा सोलणे, ही कृती देण्यात येते. मटाराच्या शेंगा कशा सोलायच्या, त्यातील मटाराचे दाणे चांगले आहेत ना, शेंगेत अळी वगैरे नाही ना, हे बघायला प्रत्यक्ष कृतीतून शिकवावे लागते. मुलांना मटारचे दाणे ठेवण्यास एक भांडे आणि शेंगांच्या साली ठेवण्यास एक टोपली द्यावी. शिक्षिकेने मुलं सर्व काही सांगितल्यानुसार करत आहेत, याकडे अवश्य लक्ष द्यावे. यातूनच मुले स्वच्छता आणि व्यवस्थितपणा शिकतात.

    बाटलीत पाणी भरणे

    एका रिकाम्या प्लास्टिकच्या टबात बाटली ठेवून त्यावर नरसाळे ठेवावे आणि दुसर्‍या प्लास्टिकच्या टबात पाणी घ्यावे. मुलांना भांड्याच्या सहाय्याने बाटलीत पाणी कसे भरायचे, हे दाखवावे आणि शिकवावे. या प्रक्रियेत मुलांचे हात, डोळे आणि मेंदू यांचा समन्वय साधण्यास सहाय्य होते. मुलं हळूहळू सरावाने पाणी न सांडता बाटलीत भरण्यास शिकतात.

    बैठक आसने मांडणे आणि नंतर आवरणे

    मुलांची बैठकीची आसने आठवड्यातून एखाद्या दिवशी त्यांच्याकडून मांडून घ्यावीत. तसेच शाळा सुटल्यावर आपापली आसने ठराविक ठिकाणी एकावर एक व्यवस्थित ठेवण्यास शिकवावे. सुरुवातीस मुलं आसने वाटेल तशी ठेवतात. मात्र सरावाने मुलांना सर्व व्यवस्थित जमू लागते.

    अभ्यासाकरिता दिलेली साधने व्यवस्थित ठेवणे

    मुलांना अभ्यासासाठी दिलेल्या पाट्या, पुस्तके व्यवस्थित एकावर एक ठेवण्यास तसेच पेन्सिली एका डब्यात ठेवण्यास कृती करून दाखवले जाते आणि मुलं सरावाने सर्व साधने व्यवस्थित ठेवतात.

    वरील कृती वानगीदाखल दिल्या असून अशा अनेक आणि तत्सम गोष्टी मुलांना नक्कीच शिकवता येतील. साहजिकच, अशा प्रकारच्या सर्व उपक्रमांमुळे शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षणातून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास प्रक्रियेस गती मिळते.

    पुढील लेखात आपण बालगटातील जीवन व्यवहार शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण


    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9881943593 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.

    Avatar photo
    रश्मी परांजपे

    रश्मी परांजपे वय 66 वर्षे. पुणे. शिक्षण - बी. कॉम्. पूर्व प्राथमिक (Pre-Primary) शाळेत 32 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत राहून निवृत्त. रेणुका स्वरुप संचलित सरकारमान्य पूर्व-प्राथमिक प्रशिक्षण परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. टेल्को समाज विकास केंद्र आणि मोरया शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2016मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2005पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. निवृत्तीनंतर यजमानांच्या योग प्रचार आणि प्रसार कार्यात तसेच निरामय आरोग्य संकल्पना राबविण्यात सक्रिय सहभाग. मोबाइल - 9881943593

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 23, 2026

    मागील तीन लेखांत आपण बालशाळेतील विज्ञान शिक्षण याविषयी सविस्तर माहिती घेतली. या आणि पुढील दोन…

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    World Idli Day… इडलीकुमारीची कहाणी!

    March 30, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 30, 2026

    न चुकलेली बस…

    March 30, 2026

    आमचे आबा आणि त्यांची कुंभकर्णी झोप…

    March 30, 2026

    राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…

    March 30, 2026

    Dnyaneshwari : जरी थोरी तुझी पाहत आहों…

    March 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 252
    • अवांतर 179
    • आरोग्य 94
    • पंचांग आणि भविष्य 367
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 188
    • मैत्रीण 17
    • ललित 520
    • शैक्षणिक 74

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn