Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»पडवळाच्या फुकण्या (भरले पडवळ)
    फूड काॅर्नर

    पडवळाच्या फुकण्या (भरले पडवळ)

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 12, 2025Updated:March 18, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, रेसिपी, Padwal, Phukanya, Bharle Padwal, पडवळ फुकण्या, भरले पडवळ
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    शीला जोशी

    साहित्य

    पडवळ – अर्धा किलो

    फोडणीसाठी तेल, मोहरी, एक छोटा चमचा हिंग

    सारणासाठी

    ओलं खोबरं – एक मोठी वाटी

    बेसन (चण्याचं पीठ) – अर्धी मोठी वाटी

    कोथिंबीर – अर्धी मोठी वाटी

    हळद – अर्धा टी-स्पून

    तिखट – दोन टी-स्पून

    गोडा मसाला – एक टेबलस्पून

    मीठ – चवीनुसार

    साखर – थोडीशी

     

    पुरवठा संख्या (Servings) : 4 जणांसाठी

    तयारीस लागणारा वेळ : 15 मिनिटे

    शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे

    एकूण वेळ : 25 मिनीटे

    कृती

    1. पडवळ स्वच्छ धुवून पुसून घ्या. नंतर त्यांची सालं काढून टाका.
    2. सोललेल्या पडवळाचे जवळपास एक इंच लांबीचे तुकडे करून त्याच्या आतील बिया आणि इतर गर काढून टाका. या तुकड्यांना म्हणतात फुकण्या.
    3. आता एका भांड्यात ओलं खोबरं, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बेसन, हळद, तिखट, गोडा मसाला, मीठ, साखर एकत्र करून त्याचं सारण तयार करा.
    4. आता हे सारण पळवळाच्या तुकड्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्या. सारण भरून सगळे तुकडे तयार करा. सारण उरलं तर ते बाजूला ठेवा.
    5. कढईत फोडणी पुरते तेल घ्या. तेल गरम झाले की त्यात मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की, मग हिंग घालून गॅस मंद आचेवर करा.
    6. आता फोडणीत पडवळाचे सारण भरलेले तुकडे एकेक करून ठेवा. सारण उरले असेल तर तेसुद्धा या तुकड्यांवर घाला. गॅस मंद आचेवरच ठेवा.
    7. पाच मिनिटांनी कढईवरचे झाकण काढून पडवळाचे तुकडे मोडणार नाहीत अशा बेताने भाजी हलक्या हाताने परतून घ्या. परत एकदा पाच मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवा.
    8. एक चांगली वाफ आली की, पडवळ शिजला आहे का ते बघा. तुकडे शिजले असतील तर गॅस बंद करून परत एकदा झाकण ठेवा.
    9. आतल्या वाफेवर तुकडे आणखी छान शिजतील. मग एका भांड्यात काढून पोळी (चपाती) बरोबर सर्व्ह करा. अत्यंत रुचकर भाजी तयार.

    टीप

    • पडवळ निवडताना फार जून घेऊ नये. कोवळे पडवळ चवीलाही छान लागतं आणि लगेच शिजतांतही.
    • गोडा मसालाऐवजी घरात इतर दुसरा कोणता मसाला असेल तर तो वापरला तरी चालेल. अनेक घरांमध्ये वेगळे तिखट वापरत नाहीत. मसाल्यातच लाल मिरची टाकतात. अशावेळी मसाल्याचे प्रमाण आणि त्यातील तिखट याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणात मसाला वापरा. ही भाजी चवीला सौम्य असते.
    • पडवळाचे एक इंच तुकडे करून त्यात मसाला भरण्याइतका वेळ नसला तर सरळ पडवळ मधे चिरून त्यातल्या बिया काढून इतरवेळी भाजी जशी लहान तुकड्यांमध्ये चिरून‌ घेतो तशी चिरून घ्या. फोडणीला टाका. पडवळ अर्धवट शिजले की मग सारणासाठी वापरलेले साहित्य त्यात घालून‌ छान मिक्स करा. एक चांगली वाफ आली की, गॅस बंद करा.

      तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

      avaantar.recipe@gmail.com

      या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • ललित 499
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn