Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर अन् टोमॅटोचे सूप तयार करताना…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर अन् टोमॅटोचे सूप तयार करताना…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 5, 2026Updated:March 18, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर, टोमॅटोचे सूप, पीठ पेरून भाजी, पीठावरची भाजी, कोबीची सजावट
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये खमण ढोकळा, दहिवडे, डोसा, ऑमलेट बनविण्याच्या टिप्स पाहूयात.

    • पीठ पेरून भाजी करताना डाळीचे पीठ थोड्या तेलात किंचित हळद टाकून भाजून घ्यावे. मगच भाजीवर पेरावे. भाजी जास्त खमंग आणि मोकळी होते. कढईला चिकटत नाही. रंगही सुरेख येतो.
    • कांद्याची कोशिंबीर करताना किंवा काही पदार्थात बारीक चोचवलेला किंवा किसलेला कांदा घालावा लागतो. तेव्हा कांदा चोचवताना किंवा किसताना कांद्याचे जे निमुळते टोक असते, तेच देठ कांद्याचे काढावे. नंतर कांद्याची साले काढावीत, परंतु कांद्याचे मागचे देठ काढू नये. मागचे देठ न काढता कांदा चोचवावा किंवा किसावा, मागचे देठ ठेवल्याने कांद्याचा पाकळ्या सुट्या न होता कांदा चांगला चोचवला जातो. त्या मागच्या देठाचा दाब त्यावर राहून कांदा चांगला चोचवला जातो. मागचे देठ म्हणजे खालची मुळांची चकती काढू नये.

    हेही वाचा – Kitchen Tips : खमण ढोकळा, डोसा, ऑम्लेट बनवताना या टिप्स वापरून पाहा

    • पावभाजी करताना सर्व भाज्या किसून घ्याव्यात, म्हणजे भाजी एकसंध होऊन चांगली मिळून येते.
    • हिरवागार कोबी ताजा असतानाच जाड किसणीने किसून फ्रीजमध्ये ठेवल्यास चार दिवस छान टिकतो. हा कीस आयत्या वेळी दही, मीठ, मिरची घालून कोशिंबीर करण्यास उपयोगी पडतो. थोडा चिंचेचा कोळ, गूळ किंवा साखर, मीठ, मोहरीची डाळ आणि थोडी फोडणी घालून कोबीचे रायतेही खूप छान होते. थोड्या दाण्यांचे कूट, लिंबू, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याची फोडणी दिल्यास ही कोशिंबीर खमंग काकडीप्रमाणे छान लागते.
    • आहारदृष्ट्या शिजविलेल्या कोबीपेक्षा कच्चा कोबी आरोग्यास फार हितावह आहे. किसणीने किसण्याच्या सोप्या पद्धतीमुळे भरपूर कीस चटकन मिळू शकतो. हा कीस पोहे, उपमा, कडधान्याच्या उसळी, तसेच थालीपिठावर पेरला तर पदार्थांची शोभा वाढते आणि चवही खूप छान लागते आणि पोषणमूल्यही वाढते. पचनास आवश्यक असलेले ‘रफेज’ ही विनासायास मिळते. कोबी किसताना जे पानाचे मोठे तुकडे मोकळे होतील, ते व्यवस्थित कापून त्याने सलाड सजविता येईल.

    हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे…

    • टोमॅटोचे सूप किंवा सार करण्यासाठी बऱ्याच गृहिणी प्रथम टोमॅटो उकडून घेतात आणि नंतर त्यांचा रस काढून सूप अथवा साराचे साहित्य घालून परत उकळवतात. यामुळे टोमॅटोची बरीच जीवनसत्त्वे नाश पावतात आणि गॅसही जास्त प्रमाणात खर्च होतो. याकरिता पुढील नवीन पद्धतीने सूप अथवा सार केल्यास ते अधिक चवदार, पौष्टिक होईल आणि गॅसही थोड्याफार प्रमाणात वाचेल. टोमॅटोच्या बारीक फोडी कराव्यात आणि मिक्सरमधून थोडे पाणी घालून रस काढून घ्यावा. हा रस बारीक भोकाच्या चाळणीतून अथवा फडक्यामधून गाळून घ्यावा म्हणजे चोथा बिया इत्यादी बाजूला होईल. हा रस सूप अथवा सारासाठी वापरता येईल.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • ललित 499
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn