Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 10, 2026Updated:March 18, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी, भाजीत साय, मटार पोहे, कोफ्ता करी, तुरीचे वरण
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनविण्याच्या टिप्स पाहूयात.

    • मटार घालून पुलाव किंवा पोहे करताना मटार कधीही तेलावर परतू नयेत. तसे केल्यास मटारचे दाणे आकसतात किंवा फुटतात. म्हणून अशा वेळी मटार गरम पाण्यात घालून त्यात चिमूटभर हळद घालावी आणि पाच मिनिटे उकळावे. मटार छान टप्पोरे आणि हिरवेगार राहतात. याच प्रकारे पुलाव आणि सलाडसाठी लागणाऱ्या हिरव्या भाज्या (फरसबी, ढोबळी मिरची) हळद घालून 2 मिनिटे उकडाव्यात. उकडताना चवीपुरते मीठ घालावे. हळद घालून उकडल्यामुळे भाज्यांचे रंग छान हिरवेगार राहतात.

    हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना…

    • शाही पनीर किंवा कोफ्ताकरीकरिता ग्रेव्ही भरपूर असावी लागते. कांदा, आले, लसूण जास्त वापरावे लागते. हा मसाला परतणे त्रासाचे काम असते. त्याकरिता सोपी पद्धत. प्रेशर कुकरच्या भांड्यात रश्शाला लागणारे तेल घालून गॅसवर ठेवा. तेल तापताच त्यात अर्धा टीस्पून साखर घाला, ती तपकिरी झाल्यावर कुकर खाली उतरवा. (साखर तपकिरी झाल्यामुळे रश्शाला चव आणि रंग सुरेख येतो.) त्यात किसलेला कांदा आणि त्याच्या रसासह आले, लसूण पेस्ट, किंचित हळद, मीठ आणि बारीक कापलेला टोमॅटो (पल्प वापरला तर अर्धी वाटी पाणी घालावे) सर्व मिसळून झाकण लावून गॅसवर ठेवा. प्रेशर आल्यावर गॅस बारीक करून 10 मिनिटे शिजवावे, झाकण निघाल्यावर दोन मिनिटे मसाला परतावा.

    हेही वाचा – Kitchen Tips : लिंबं, टोमॅटोचा रस आणि मटारची साठवणूक कशी कराल?

    • आपण चाकवताची भाजी करताना पुढील शेंडे तसेच कोवळी देठे घेतो आणि उरलेली टाकून देतो. ती न टाकता छोटे तुकडे करून वाळवून ठेवावीत आणि तुरीचे वरण शिजवताना डाळीत छोटे तुकडे टाकावेत. न शिजणारी डाळही लवकर शिजते आणि देठातील सत्त्व पण मिळते.
    • एखाद्या वेळी भाजी किंवा आमटीत आपल्या हातून तिखट किंवा गोडा मसाला जास्त पडतो. अशा वेळी दोन टेबलस्पून दुधावरची साय (अर्थात भाजी किंवा आमटी जास्त असेल तर त्या प्रमाणात जास्त घ्यावी लागेल) घेऊन ती चमच्याने ढवळून एकजीव करावी आणि भाजी किंवा आमटी गॅसवर ठेवून कढ आला की, साय घालून चांगले ढवळावे. आणखी एक कढ द्यावा. भाजीचा किंवा आमटीचा जहालपणा कमी होऊन ती सौम्य होते तसेच चवीला आणि रंगाला छान दिसते.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • ललित 499
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn