Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : मसाला वांगी, फ्लॉवरची भाजी, पातळ पालेभाजी बनवताना…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : मसाला वांगी, फ्लॉवरची भाजी, पातळ पालेभाजी बनवताना…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 24, 2026Updated:March 18, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मसाला वांगी, फ्लॉवरची भाजी, पातळ पालेभाजी, उरलेल्या भाजीचे डोसे, भाज्यांना फोडणी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मसाला वांगी, फ्लॉवरची भाजी, पातळ पालेभाजी करताना या टिप्स वापरून पाहा.

    • पालेभाज्या पातळ करावयाच्या असतील तर मिक्सरमधून काढून पीठ लावून फोडणीस टाकल्यास त्यातील जीवनसत्त्वे कमी होत नाहीत आणि पाच मिनिटांत भाजी तयार होऊन इंधन वाचते.
    • सर्व भाज्यांना सरसकट मोहरीची फोडणी देऊ नये. वेगवेगळ्या भाज्यांना वेगवेगळ्या फोडण्या द्याव्यात. उदा : फरसबीला तीळ आणि जिऱ्याची फोडणी द्यावी. कढीच्या फोडणीत लवंग, दालचिनी घालावी.
    • मंडईत मधून मधून पालेभाज्या भरपूर येतात. यातील मेथी, हरभरासारख्या भाज्या नीट निवडून उन्हात अगर सावलीत वाळवून ठेवल्या असता हंगाम नसताना त्यांचा उपयोग होऊ शकतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : बटाटा वेफर्स, ब्रेडरोल अन् दहिवडे करताना या टिप्स वापरा

    • पालेभाज्यांप्रमाणेच गवार, वाल, डिंगऱ्या याही निवडून, वाळवून ठेवता येतात. त्यांचाही उपयोग नंतर चांगला होतो.
    • भेंडीची भाजी करताना ती बुळबुळीत होऊ नये म्हणून फोडणी करताना तेलात एक आमसूल टाका. भाजीला तार येत नाही. एक चमचा दाण्याचे कूट टाका. भाजी मोकळी, कुरकुरीत, खमंग होते.
    • बटाटा, वांगी, भाजी अथवा उसळी बऱ्याच उरलेल्या असल्यास उसळीत कणीक, थोडे डाळीचे अथवा उडदाचे पीठ, लसूण-मिरची बारीक वाटून चवीला मीठ घालावे. सरसरीत पिठाचे डोसे करून सॉस, लोण्याबरोबर वाढावेत. मुलांना नक्कीच आवडतील.
    • फ्लॉवरची भाजी करताना, त्याचे मोठमोठे तुकडे करावेत आणि ते तेलात तळून घ्यावेत. त्यामुळे फ्लॉवरची फुले गळून पडत नाहीत. ती अख्खी, तशीच्या तशीच राहतात आणि भाजीला चांगला स्वाद येतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे…

    • शेपूची भाजी फारच चरबट असते. म्हणून त्यात भोपळ्याची दोन पाने चिरून घालावीत म्हणजे शेपूची भाजी मऊ आणि रुचकर लागते.
    • मसाला वांगी करताना प्रथम वांगी थोड्या तेलात परतून एका भांड्यात ठेवावीत आणि त्यात पाणी न घालता कुकरमध्ये एका वाफेवर शिजवून घ्यावीत. नंतर शिजल्यावर त्यात चिरून मसाला भरून तेलात परतावीत. ती चवदार लागतात आणि वांगी सुकी झाल्याने प्रवासात नेण्यास पण चांगली होतात.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • ललित 499
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn