Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आयुष्याच्या प्रवासातील दोन सोबती

    April 8, 2026

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026

    Dnyaneshwari : सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु…

    April 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आयुष्याच्या प्रवासातील दोन सोबती
    ललित

    आयुष्याच्या प्रवासातील दोन सोबती

    मयुरेश गोखलेBy मयुरेश गोखलेApril 8, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, सुख आणि दु:ख, आयुष्याचे सोबती, आयुष्याचे दोन सोबती, सुख दु:ख सोबती, दु:ख माझा सोबती, सुख माझा सोबती, आयुष्याची वाटचाल,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रस्त्याने चालत होतो… संध्याकाळची वेळ, हलकासा वारा… आणि मनात विचारांची गर्दी. अचानक वाटेत दोन जुने मित्र भेटले,  दुःख आणि सुख… दोघेही माझ्याकडे बघून हसले. थोडं आश्चर्य वाटलं!

    “कुठे चाललास?” त्यांनी विचारलं.

    मी सहज म्हणालो, “बस, आयुष्यात थोडं पुढे चालत जातोय!”

    दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि म्हणाले, “आम्हालाही तुझ्यासोबत यायचं आहे.”

    क्षणभर थांबलो. मनात विचार आला की, दुःख नकोच… फक्त सुख सोबत असलं तर किती छान होईल!

    हेही वाचा – संध्याकाळ, समुद्र आणि ती…;

    मी सुखाकडे पाहून म्हणालो, “तू चल माझ्यासोबत पण दुःखाला इथेच राहू दे.”

    सुख हसला… आणि शांतपणे म्हणाला, “मी एकटा कधीच येत नाही. जिथे मी आहे, तिथे दुःख कुठेतरी आसपास असणारच!”

    मी खूप समजावलं… खूप वेळ बोललो… पण सुख हट्टावर ठाम होतं.

    शेवटी पर्याय नव्हता — मी दोघांनाही सोबत घेतलं.

    प्रवास सुरू झाला…

    पहिल्या काही दिवसांत दुःख वारंवार माझ्या खांद्यावर हात ठेवायचं… कधी शांतपणे, कधी जरा जडपणे. कधी राग यायचा, कधी उदास वाटायचं… पण त्याच वेळी सुख कधी हसून, कधी एखाद्या छोट्या क्षणातून मला हलकं करायचं!

    हेही वाचा – तेरे बिना जिया जाए ना…!

    हळूहळू मला कळायला लागलं —

    दुःख मला मजबूत करत होतं…

    आणि सुख मला जगायला शिकवत होतं…

    आता जाणवतंय की, जर त्या दिवशी मी दुःखाला तिथेच सोडलं असतं, तर कदाचित मला सुखाची खरी चवच कळलीच नसती.

    आता आम्ही तिघेही सोबत चालतो… दुःख कधी पुढे, कधी मागे… सुख कधी उजवीकडे, कधी डावीकडे…

    आणि मी?

    मी फक्त चालत राहतो… कारण मला कळलंय की, जीवनाचा खरा अर्थ हा दोघांना स्वीकारण्यातच आहे.


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    मयुरेश गोखले

    Location: Nagpur, Maharashtra Renowned media anchor and presenter with extensive experience hosting special shows in Maharashtra Official anchor for two leading television channels Interacted with eminent personalities from social, political, and academic spheres Featured in programs like Shankhnaad, Manogat, Awaaz Maharashtracha and many more Creates regular content on YouTube, Facebook, and Instagram with a strong regional connect Known for creating educational, cultural, and historical video content A confident speaker with a natural command on stage and camera Experienced singer with a passion for Bhajans, Abhangs, Ghazals, and Sufi music Professor at Dharampeth College, contributing actively in the academic field Descendant of the legendary nationalist Namdar Gopal Krishna Gokhale Content creation and strategy for digital media platforms Email: mayuresh2609@gmail.com Phone: 9423100151, 8668489210

    Related Posts

    Bookshelf : …म्हणूनच पडघवली अमर साहित्यकृती!

    April 7, 2026 ललित

    नेहाला पाहिजे असलेले पद राजने नाकारले, पण…

    April 7, 2026 ललित

    झाले मोकळे आकाश…

    April 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : …म्हणूनच पडघवली अमर साहित्यकृती!

    By डॉ. अस्मिता हवालदारApril 7, 2026

    लेखक गो. नी. दांडेकर यांची ‘पडघवली’ कादंबरी खूप गाजलेली आहे. यावर आधारित एक हिंदी टीव्ही…

    नेहाला पाहिजे असलेले पद राजने नाकारले, पण…

    April 7, 2026

    झाले मोकळे आकाश…

    April 7, 2026

    न चुकलेली बस…

    April 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आयुष्याच्या प्रवासातील दोन सोबती

    April 8, 2026

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026

    Dnyaneshwari : सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु…

    April 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    April 8, 2026

    Bookshelf : …म्हणूनच पडघवली अमर साहित्यकृती!

    April 7, 2026

    नेहाला पाहिजे असलेले पद राजने नाकारले, पण…

    April 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 261
    • अवांतर 180
    • आरोग्य 98
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 377
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 540
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे…
    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे… अवांतर ही वेबसाइट!
    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.
    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!
    – मनोज शरद जोशी

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आयुष्याच्या प्रवासातील दोन सोबती

    April 8, 2026

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026

    Dnyaneshwari : सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु…

    April 8, 2026
    Most Popular

    आयुष्याच्या प्रवासातील दोन सोबती

    April 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.