Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : अगा प्रकाश आणि कडवसें, सूर्याचिस्तव जैसें…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : अगा प्रकाश आणि कडवसें, सूर्याचिस्तव जैसें…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 22, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय दहावा

    तेंचि मातें कैसें जाणिजे । ऐसें कल्पी जरी चित्त तुझें । तरी मी ऐसा हे माझे । भाव ऐकें ॥81॥ जे वेगळालां भूतीं । सारिखे होऊनि प्रकृती । विखुरले आहेति त्रिजगतीं । आघविये ॥82॥

    बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः । सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥4॥ अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः । भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥5॥

    ते प्रथम जाण बुद्धि । मग ज्ञान जें निरवधि । असंमोह सहनसिद्धि । क्षमा सत्य ॥83॥ मग शम दम दोन्ही । सुख दुःख वर्तत जनीं । अर्जुना भावाभाव मानीं । भावाचिमाजीं ॥84॥ आतां भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता । हे मम रूपचि पांडुसुता । ओळख तूं ॥85॥ दान यश अपकीर्ति । ते जे भाव सर्वत्र वसती । ते मजचि पासूनि होती । भूतांचां ठायीं ॥86॥ जैसीं भूतें आहातीं सिनानीं । तैसेचि हेही वेगळाले मानीं । एक उपजती माझां ज्ञानीं । एक नेणती मातें ॥87॥ अगा प्रकाश आणि कडवसें । सूर्याचिस्तव जैसें । प्रकाश उदयीं दिसे । तम अस्तूसीं ॥88॥ आणि माझें जे जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवाचें करणें । म्हणोनि भूतीं भावाचे होणें । विषम पडे ॥89॥ यापरी माझां भावीं । हे जीवसृष्टि आहे आघवी । गुंतली असे जाणावी । पंडुकुमरा ॥90॥ आतां इये सृष्टीचे पालक । तयां आधीन वर्तती लोक । ते अकरा भाव आणिक । सांगेन तुज ॥91॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : मी कवण केतुला, कवणाचा कैं जाहला…

    अर्थ

    तेच मला कसे जाणावे, असे जर काही तुझे मन इच्छा करील, तर मी असा आहे आणि हे माझ्यापासून झालेले निराळे पदार्थ असे आहेत, ते ऐक. ॥81॥ ते माझे विकार भिन्न भिन्न प्राण्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनून संपूर्ण त्रैलोक्यात पसरले आहेत. ॥82॥

    बुद्धि, ज्ञान, असंमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दु:ख, होणे, न होणे, भय आणि अभय, ॥4॥ अहिंसा, समता, तुष्टी, तप दान, यश, अपकीर्ति इत्यादी भूतांचे निरनिराळ्या प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात. ॥5॥

    त्यापैकी पहिली बुद्धी आहे असे समज. नंतर अगाध ज्ञान, असंमोह (सहज उपस्थित झालेल्या ज्ञेय गोष्टीकडे विवेकपूर्वक प्रवृत्ती), सहन करण्याचा स्वभाव म्हणजे क्षमा, आणि सत्य (ही समज). ॥83॥ मग शम (मनोनिग्रह) आणि दम (इंद्रियनिग्रह) हे दोन आणि लोकात असलेले सुख आणि दु:ख, आणि अर्जुना होणे आणि नसणे या सर्वांची माझ्याच विकारात गणाना कर. ॥84॥ आता अर्जुना, भय आणि निर्भयपणा, अहिंसा आणि समबुद्धी ही माझीच रूपे आहेत, हे तू जाण. ॥85॥ दान, यश आणि दुष्कीर्ति, हे जे विकार सर्व ठिकाणी राहतात, ते माझ्यापासून प्राण्यांच्या ठिकाणी उत्पन्न होतात. ॥86॥ जशी भूते वेगवेगळी आहेत, तसेच हे भाव वेगवेगळे आहेत, असे समज. त्यापैकी कित्येक भाव माझ्या ज्ञानात उत्पन्न होतात आणि कित्येक मला जाणत नाहीत, (माझ्या अज्ञानात उत्पन्न होतात). ॥87॥ अरे अर्जुना, प्रकाश आणि अंधार हे परस्पर विरुद्ध स्वभावाचे असूनही ते ज्याप्रमाणे एका सूर्यापासून होतात, सूर्याच्या उदयात प्रकाश दिसतो आणि सूर्याच्या अस्ताबरोबर अंधार होतो. ॥88॥ आणि माझे जे ज्ञान होणे अथवा माझे जे अज्ञान असणे, हे प्राण्यांच्या दैवाचे कर्तव्य आहे, म्हणून त्याप्रमाणे प्राणिमात्रांच्या ठिकाणी कमीजास्त प्रमाणात या विकारास व्हावे लागते. ॥89॥ याप्रमाणे माझ्या विकारात ही संपूर्ण जीवनसृष्टी सापडली आहे, असे अर्जुना समज. ॥90॥ आता या सृष्टीचे पालन करणारे आणि ज्यांच्या ताब्यात सर्व लोक वागतात ते आणखी अकरा भाव तुला सांगेन. ॥91॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ…;

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ…

    March 21, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : मी कवण केतुला, कवणाचा कैं जाहला…

    March 20, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    By Team AvaantarMarch 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा  महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा । मद्‍भवा मानसा जाता येषां लोक…

    Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ…

    March 21, 2026

    Dnyaneshwari : मी कवण केतुला, कवणाचा कैं जाहला…

    March 20, 2026

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 359
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn