आरेन
भारताच्या आयुष शेट्टी याने शानदार कामगिरी करत बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. अंतिम सामन्यात त्याचा प्रवास जागतिक क्रमवारीत दुसरा असलेला चीनच्या शी यू की याच्याविरूद्ध सरळ गेममध्ये पराभूत झाला. दिनेश खन्ना यांच्यानंतर अंतिम फेरी गाठणारा तो फक्त दुसरा भारतीय पुरुष एकेरीपटू ठरला. खन्ना यांनी 1965मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. यामुळे भारताची या स्पर्धेतील पुरुष एकेरी गटातील सुवर्णपदकाची 61 वर्षांची प्रतीक्षा कायम राहिली.
बिगर मानांकित आयुषसाठी ही स्पर्धा उल्लेखनीय ठरली. जागतिक क्रमवारीत 25व्या स्थानावर असलेल्या आयुषने या स्पर्धेत दमदार खेळ करताना जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला कुनलावत वितिदसर्न, चौथ्या क्रमांकावरील जोनाथन ख्रिस्टी आणि सातव्या क्रमांकावरील ली शी फेंग यांना नमवले होते. मात्र अंतिम सामन्यात शी यु ची याच्या दमदार खेळापुढे त्याचा निभाव लागला नाही. 20 वर्षीय आयुषला अंतिम फेरीत लय सापडली नाही. विद्यमान विश्वविजेता शी यू की यांच्याविरुद्ध तो 8-21, 10-21 असा पराभूत झाला.
हेही वाचा – IPL 2026 : परवानगी नसताना कोणी वापरला मोबाइल? कारवाई होणार का?
चिनी खेळाडू शी यू की याने कोर्टवरील हालचालींवर पूर्ण नियंत्रण ठेवत नेटजवळील खेळात वर्चस्व गाजवले आणि आयुषला चुका करण्यास भाग पाडले. यानंतर शी यू की याने मोठी आघाडी घेतल्यानंतर दडपणाखाली आलेल्या आयुषने नियंत्रण गमावले. पहिल्या गेममध्ये शीने सुरुवातीपासून आघाडी घेत 4-0 अशी मजल मारली. आयुषच्या स्मॅशमध्ये अचूकता नसल्याने तो 2—6 असा पिछाडीवर राहिला. त्यानंतरही शीने विविध शॉट्सचा प्रभावी वापर करत 11-6 अशी आघाडी घेतली. अखेरीस आयुषला आपल्या चुका महागात पडल्या आणि शी याने पहिला गेम सहज जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये आयुषने दमदार सुरुवात करत 3-1 अशी आघाडी घेतली. त्याने काही उत्कृष्ट बचाव आणि अचूक स्मॅशच्या जोरावर 7-2 अशी आघाडीही मिळवली. मात्र ही आघाडी टिकवण्यात तो अपयशी ठरला. शी याने जोरदार पुनरागमन करत 7-7 अशी बरोबरी साधली आणि नंतर 11-8 अशी आघाडी घेतली. यानंतर शी याने आपल्या अचूक आणि वैविध्यपूर्ण खेळाच्या जोरावर आघाडी वाढवत सामना 21-10 असा जिंकला. त्याने शेवटी सलग गुण घेत सामना आपल्या नावावर केला आणि आयुषचे ऐतिहासिक सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले.
हेही वाचा – एक थी बुलबुल…
दिनेश खन्ना खन्ना यांनी 1965मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. तर, चिराग शेट्टी-सात्विकसाईराज रंकीरेड्डी या जोडीने 2023मध्ये पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावले होते.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


